Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sanjay Raghunath Sonawane

Others


4.0  

Sanjay Raghunath Sonawane

Others


पायाळू

पायाळू

2 mins 242 2 mins 242

आकाशात काळेभोर ढग जमा झाले होते. पाखरांचे थवे आकाशात घिरट्या घालत होते. फूल पाखरे इकडून तिकडे उडत होती. बेडकांचा डराव डराव आवाज सतत ऐकू येत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता.झाडे जोरजोराने डोलत होती. कित्येक झाडे मुळासहित उपटून पडली होती.कित्येकांच्या घरावरचे पत्रे वाऱ्याने उडाले होते.लोक घाई घाईने घर गळु नये म्हणून प्लास्टिकचा कागद घरांवर चारी बाजूनी बांधत होते.ढगांचा गडगडाट आवाज सारखा चालू होता.सारे आकाश प्रकाशमय झाले होते. सगळीकडे अंधार पसरला होता. अचानक वीजेचा कडकडाट आवाज व्हायचा.अंधारात असलेले रान प्रकाशमय व्हायचे. पाऊस येणार ह्या भीतीने सारे शेतमजूर गावाकडे पळत सुटले होते.गुराख्याने गायी नेहमी पेक्षा लवकर घरी पाठवल्या होत्या. मुकी जनावरे जीव वाचविण्यासाठी गावाकडे पळत होते.अचानक वीज कुठेतरी चमकताना दिसायची तिच्या सोबत तिचा घाबरवणारा आवाज. ती जमिनीवर येतांना भीती वाटायची.ती आपल्या अंगावर तर पडणार नाही ना?अशी सारखी भीती मनात होती.वीज कडकड आवाज करून कोसाळली होती. कुठे तरी नुकसान झाले हे निश्चत असायचे. वीज अंगावर पडू नये त्यासाठी देवाचा धावा सुरु असायचा. सुखरूप पोहचलो की देवाने वाचविले असे समजायचो.


 वीज घरात येऊ नये म्हणून आई लोखंडी पकड दारात ठेवायची.मी लहान असेपर्यंत तांब्याची गोल रिंग पायात होती.त्यामुळे वीज अंगावर पडत नाही असी समजूत होती.

  पायाळू म्हणजे बालकाचा जन्म पायाकडून होतो. मी पायाळू असल्याने निरक्षर आई आमची काळजी घेत होती. तिने तू पायाळू आहे हे लहान वय असताना सांगितले होते. पायाळू माणसाला विजेची लई भीती असते. झाडाखाली उभे राहू नये नाहीतर वीज झाडावर कोसळते.ही आईची समजूत होती.त्यामुळे वीज चमकली की कुणाच्या तरी झोपडीत जाऊन बसायचे. पाऊस उघडल्यावरच गावात यायचे असी सांगायची.पायाळू माणसाचा उपयोग एखाद्याला पाठीत चमक भरली की ती चमक घालविण्यासाठी व्हायचा. त्यामुळे मला गावात चमक काढण्यासाठी फार मागणी असायची. पाठीची चमक घालविण्यासाठी पाय पाठीवरून पाच वेळा घसरत न्यायचो.त्यामुळे मी पायाळू आहे हे साऱ्या गावाला माहिती होते.


अचानक पाऊस सुरु झाला. तासभर पाऊस पडत होता. तेव्हढया पाऊसाने सारे शिवार जलमय केले. शेतात चिखल झाला होता.तसाच चिखल तुडवित अनवाणी पायानी बाया माणसे पाऊस उघडल्यावर गावात उशिराने पोहचली होती. काही पक्षी आपल्या पंखावरचे पाणी झटकत होती. काहीपाखरे निवाऱ्याला बसली होती. गावात लवकरच चूल्ही पेटल्या होत्या. त्या दिवशी उन्हात तापलेली माणसे गार वाऱ्यात शांत झोपली होती. पावसाने सगळ्याना त्या दिवशी सक्तीने सुट्टी दिली होती.


Rate this content
Log in