*पावसाळा*
*पावसाळा*
पावसाळा आला की सुरूवात होते ती घरातील ठेवून दिलेले रेनकोट,छत्री बाहेर पडते. नीट स्वच्छ करून ठेवली जाते. पावसात भिजायची मजाच न्यारी. आबालवृद्ध, पक्षी, प्राणी सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहात असतात.
जूनमधे पावसाची सुरूवात होते आणि मुलांच्या शाळेची सुरूवात होते नवीन वर्ष, नेमके शाळेत जाताना व नोकरीनिमित्त बाहेर पडणारे यांच्या वेळेस पाऊस पडतो आणि मजा बघत बसतो. लोकांची त्रेधातीरपीट पाहतो.
लहान मुलांना पावसात कागदी नावा सोडायला खूप आवडतात.
पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पावसाळी सहल काढली जाते.
असा हा खट्याळ पाऊस. ज्या वर्षी खूप बरसतो त्या वर्षी ओला दुष्काळ. शेतकर्यांचे हाल, पीकांचे नुकसान. अन्नाची नासाडी होते. धरणे भरून वाहतात. मनुष्यहानी होते. पर्यावरण बिघडते. सृष्टी ओलीचिंब होते.
उलट पाऊस आला नाही तरी शेतकरी बेहाल होतात. पीकाला पाणी मिळत नाही,कोरडा दुष्काळ पडतो. धरणातील पाणी कमी पडते. जनजीवन विस्कळीत होते. यासाठी पाऊस हा प्रमाणातच पडायला हवा,पण निसर्ग आपल्या हातात नाही.