STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

पावभाजी (लघुकथा )

पावभाजी (लघुकथा )

1 min
306

सायलीची शाळा सुटली. सायलीने पटापट खडू,डस्टर ड्राॅवरमध्ये ठेवल आणि पर्स घेऊन घराचा रस्ता पायाखाली तुडवत झपाझप पावले ती टाकू लागली.

तोंडाला चागंलीच कोरड पडली होती तिच्या. पोटातले कावळे ही भलतेच कोकलत होते असा भास तिला होत होता. सायलीला जाताजाता रस्तावर पावभाजीची गाडी दिसली आणि तिला प्रबळ इच्छा झाली कि पावभाजी खाऊन घ्यावी का?

पण कसलं काय झटकन आईचा चेहरा समोर आला आणि तिच्या लक्षात आले की आपण घरी गेल्या शिवाय आई काही जेवायला घेेणार नाही. मग काय मन मारून तशीच ती घरात पोहचली. भूक तर खूप लागली होती. हात पाय धूूवून ती स्वयंपाक घरात आली आणि गॅसवरच्या कढईत डोकावता डोकावता घरात सुटलेला वास घेऊनच ती खूप खूूश झाली. तिला कळेच ना कि मला पावभाजी खायची आहे हे आईला कसे कळले. मनात तर प्रचंड उकळ्या फूटू लागल्या होत्या. इच्छा पूर्ण झाली म्हणून आनंद झाला होता सायलीला.  


साहित्याला गुण द्या
लॉग इन