DrSujata Kute

Others

3  

DrSujata Kute

Others

न्यूनगंड

न्यूनगंड

3 mins
400


समीक्षा अगदीच नकारात्मक पद्धतीने लहानाची मोठी झाली होती... 

समीक्षाला असं वाटायचं की आपल्याला काहीच येत नाही.

अभ्यासातही ती मागे होती... ती कुठलेही काम करायला गेली की सगळं उलटंच होत असे.... ती प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न करायची पण तिला प्रत्येक वेळी असे वाटायचं की आपल्याला काहीच येत नाही.... त्यामुळे ती काहीही काम करताना घाबरतच ते काम करायची... किंवा कधी कधी ते अर्धवट करत असे... तिला काही चांगले होईल असा आत्मविश्वास नव्हता... 


आत्मविश्वास नसल्याने समीक्षा प्रत्येक कामामध्ये मागे पडायची..तिला काम जमले नाही की साहजिकच तिच्या आई वडिलांची प्रतिक्रिया... कसं होईल समीक्षाचं?? तिला तर काहीच येत नाही अशी असायची.... 

समीक्षाला एक भाऊ होता "यश. " यश अभ्यासात खूप हुशार होता... वर्गात पहिला येत असे. 

त्यामुळे दोघांची तूलना होत असे... त्यामुळे समीक्षा मध्ये एक न्यूनगंड तयार झाला होता... आणि आपण असेच अपयशी आहोत असं तिला पक्क वाटायला लागलं होतं...


कसं बसं करत समीक्षा नुकतीच दहावी पास झाली होती आणि ते ही काठावर.... 

समीक्षाने मग काय अकरावीला आर्ट्स घेतले होते.... तिला तेही अवघड वाटायचे.... 

समीक्षाच्या आईवडिलांना देखील तिच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती.... त्यांना वाटायचं कसं बसं हिचं शिक्षण पूर्ण करू आणि तिचं लग्न लावून देऊ... पण तिला घरकामही जमणार नाही असं तिच्या आईला वाटत असे .. . 

 समीक्षा आणि तिचे आईवडील एके दिवशी यश च्या कॉलेज मध्ये गेले... यशची आंतर्विद्यालयीन स्पर्धा चालू होती... यश आणि त्याचा ग्रुप एक डान्स करणार होता.... त्याला चिअर करायला ते गेले होते.... तिथे नृत्य स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सुंदर नृत्य चालू होते... 


तिथे नृत्य स्पर्धेला आलेल्या एका ग्रुपने मात्र सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं... कारणही तसंच होतं कारण तो ग्रुप पूर्ण च्या पूर्ण अपंग विद्यार्थ्यांचा ग्रुप होता.... कुणाला एक हात नव्हता तर कुणाला एक पाय.....तो पूर्ण ग्रुप जेव्हा स्टेज वर आला तेव्हा सगळ्यांनी टाळयांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. साहजिकच सगळ्यांना त्या ग्रुप विषयी एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता.... पण जेव्हा त्या लोकांनी गाण्यावर थिरकणं सुरु केलं.... चांगल्या माणसालाही लाजवेल असा डान्स केला... जी त्यांची अपंग बाजू होती त्याच भागांचा वापर करून त्यांनी नृत्य केलं होतं.... आणि कुठलीच गोष्ट अशक्य नसते हे दाखवून दिलं.. अपंगांच्या ग्रुपचे नृत्य पाहिल्यावर समीक्षाला पहिल्यांदा असे वाटले की आपण आपल्या हातापायाने धडधाकट असून आपल्याला काहीच येत नाही.... आणि हे सगळे जण अपंग असूनही त्यांच्या नृत्यामध्ये ते अपंग आहेत असं चुकूनही वाटलं नाही.... 


नृत्य बघायला आलेले सगळे लोकं त्या अपंग असणाऱ्या ग्रुप सोबत सेल्फी घेत होते.... कारण तो ग्रुप आता सगळ्या प्रेक्षकांसाठी सेलिब्रिटी ग्रुप झाला होता.... मग समीक्षाही त्या ग्रुप जवळ सेल्फी काढायला गेली.... त्यातल्या एका मुलीला तिने विचारले..... हे तुम्ही कसं जमवलं?? म्हणजे तुम्हाला भीती वाटली नाही का की आपण पडू.... आपली फजिती होईल... 

तेव्हा ती मुलगी समीक्षाला म्हणाली अगं आम्ही अपंग आहोत हे तुमच्या दृष्टीने.... मला एक हात नाही पण मी लहानाची मोठी अशीच झाले ना.... उलट ही कमजोर बाजू माझी ताकद आहे...या अर्धवट हाताने मी असं काही करू शकते जे तुम्हाला जमणार देखील नाही... पण मला सवय आहे... आणि इतक्या सगळ्यांचं म्हणशील तर... आम्ही हे सगळं इच्छाशक्तीच्या जोरावर जमवलं.... आणि आपल्याला जमणारच असा आमचा विश्वास होता... आम्ही कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड पाळला नव्हता... 


आता समीक्षाने विचार केला आपण उगाचच छोटया छोटया गोष्टी मनावर घेतो.... जमत नाही म्हणतो..... पण या ग्रुपकडे पाहिल्यावर आपल्याला सगळं नक्कीच जमेल असं तिला वाटायला लागलं.... इतक्यात डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.... त्या अपंग ग्रुपला पहिलं तर यशच्या ग्रुप ला दुसरं बक्षीस मिळालं होतं... त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला होता... समीक्षा मात्र दोहेरी आनंदात होती.... कारण तिच्या भावाला बक्षीस मिळाले होते आणि एक नवीन सकारात्मक ऊर्जेचा स्रोत तिच्यामध्ये वाहत होता.... 


आता मात्र समीक्षाच्या फार कमी चूका व्हायला लागल्या होत्या... प्रत्येक गोष्ट तिला आता जमायला लागली होती... एखादी गोष्ट जमली नाही की समीक्षा त्या अपंग ग्रुप ला आठवायची.... त्या मुळे तिला आता सगळं जमायला लागलं होतं

 समीक्षाच्या ह्या बदलाचं घरच्यांना देखील आश्चर्य वाटायला लागलं होतं... पण सकारात्मक बदल असल्याने सगळेच खूष होते...बारावीला ती मेरिट मध्ये आली... सगळीकडे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता... 

तात्पर्य :कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये... तो सगळा मनाचा खेळ. 


Rate this content
Log in