नियती -स्त्रीचा संघर्ष
नियती -स्त्रीचा संघर्ष


जानकीवर आज आभाळ कोसळले. तिच्या पतीचे ऑफिसमधून येतांना अपघातात निधन झाले. जानकीच्या लग्नाला फक्त नऊ वर्षच झाली होती. मोठी मुलगी राधा तिसरीत तर मुलगा आदित्य पहिलीत शिकत होते . निरोप आल्यावर खरोखरच तिच्या पुढे जणू आभाळ कोसळले दुःखाची परिसीमा झाली सर्व सासरचे, माहेरचे नातेवाईक गोळा झाले.सर्वानाच खूप दुःख झाले .
मृत्यूनंतर तेरा दिवसांनी सर्व आपापल्या कामाला लागले. सासू , सासर्यांनी जानकीला धीर न देता तूच आमच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत आहे. तूच अपशकुनी आहे .तू भांडली असेल म्हणूनच आमच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला असे तिच्या डोक्यावर खापर फोडले व यापुढे आमच्याशी तुझा आणि तुझ्या मुलांचा काहीही संबंध नाही असे सांगितले .आम्ही तुला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत करणार नाही आणि कुठल्याही संपत्तीतील वाटाही देणार नाही असे जाहीर केले.जानकी गप्प बसून ऐकत होती ती काहीही बोलली नाही.तिचे लोकही काहीही बोलले नाही.पण आईबाबा ,भावाने तिची साथ न सोडण्याचे वचन दिले.
जानकीचा पती विजय एका कंपनीत तुटपुंज्या पगारावर कामाला होता.त्याने नऊ वर्षात फक्त एक रूम किचन चा फ्लॅट घेतला. त्याचे हप्ते घर,मुले एवढा खर्च करून हातात काहीही पैसे उरत नव्हते म्हणून बचत काहीच नव्हती. जानकीही पदवीधर गृहिणी होती पण घराच्या बाहेर निघून नोकरी कधी केली नाही.मुले घरचं सांभाळत होती . माहेरीही त्यांचे त्यांना पुरेल अशीच परिस्थिती होती . विजयचा कुठला विमाही नव्हता म्हणून तिला काहीच पैसे मिळाले नाही. कंपनीतून थोडा पी. एफ. मिळाला.
तिच्या आई बाबांनी तिला घर विकून त्यांच्याजवळ राहण्याचा सल्ला दिला. पण तिला तो मान्य नव्हता कारण कर्ज असले तरी तिच्या पतीची शेवटची आठवण तिला विकायची नव्हती. म्हणून तिने आई,बाबा,भावाला फक्त काही दिवस हप्ते भरण्यासाठी मदत करा अशी विनंती केली व लगेच बायोडाटा बनवून नोकरीच्या शोधात निघाली पण कुठलाही अनुभव नसल्यामुळे नोकरी कुठे करावी हा प्रश्न होता.मग तिला वाटले आपण फक्त मुलंच घरी सांभाळली म्हणून शाळेवर नोकरी शोधावी. तिला एका शाळेवर डे केअर समन्व्यक म्हणून नोकरी मिळाली. वेळ सकाळी नऊ ते सहा होती.आणि पगार दहा हजार होता.काहीही पर्याय नसल्यामुळे तिने ती नोकरी पत्करली . मुलांची फी, घरखर्च, घराचे हफ्ते या साठी तो पगार अगदीच तुटपुंजा होता. त्यामुळे ती नोकरी व्यतिरिक्त अजून काही करता येईल का याचा विचार करत हो ती. तिने विचार केला कि काही लोकांना, कॉलेज च्या मुलांना जेवणाचे डब्बे लागतात. तर तेही राती एक वेळ तिने सुरु केले.सुरवातीला तिला एक दोन डब्बेच मिळाले. पण लगेच जेवणाची चव पाहून तिला भरपूर डब्ब्यांच्या ऑर्डर मिळाल्या तिला जाणविले कि यात भरपूर पैसे मिळत आहे.
आणि सकाळी डे केअरला नऊ वाजताच जात असल्यामुळे सकाळी डब्बे देता येत नाही साडे अकराला येण्याची तेथील डायरेक्टर कडून परवानगी घेतली तिचा प्रामाणिकपणा बघून तिथे तिला परवानगी मिळते .सहा महिन्यात तिच्याकडे खूप डब्ब्यांची मागणी येते व तिला डे केअरची नोकरी सोडावी लागते. ती आता घराचे हफ्ते,घरखर्च आरामात करून भावाचे आई वडिलांचे कर्जही आरामात चुकवू शकते. ती इंटरनेट वरून वेगवेगळ्या रेसिपिज शिकते. व नंतर वाढदिवस,डोहाळ जेवण यासारख्या छोट्या छोट्या पार्टीचे काँट्रॅक्टही घेते. तिचा व्यवसाय खूप वाढतो तिच्या हाताखाली स्टाफही ठेवते. व प्रतिसाद घेऊन मार्केटिंग करून स्वतःचे ऑफिस घेते.
बाहेर गावच्याही ऑर्डर्स स्वीकारते..तिचा व्यवसाय कालांतराने खूप मोठा होतो.ती स्वतःची गाडी घेते.मोठे घर घेते.हे सर्व ती तीन चार वर्षाच्या कालावधीतच करते.
तिचे सासू सासरे ज्यांनी तिला लाथाडले त्यांनाही तिची प्रगती समजते.नियतीने तिच्या नणंदेच्या पतीचे कुठल्या तरी आजाराने निधन होते.पण तरीही तिच्या नंदेचे सासू सासरे तिला नशिबाचा फेरा म्हणून पूर्ण साथ देतात. हे जेव्हा जानकीचे सासू सासरे बघतात तेव्हा त्यांना जानकीसोबत जे वागले त्याचा पश्चाताप होतो.व ते तिला भेटून माफी मागण्याचा निर्णय घेतात.
ते जानकीला भेटायला जातात. जानकी इतक्या दिवसांनी त्यांना बघून खुश होते.ते जानकीला ओल्या डोळ्यांनी माफी मागतात. त्यावर जानकी त्यांना म्हणते कि कदाचित त्यावेळी तुम्ही मला साथ दिली असती तर मी दुबळी झाले असती. व आयुष्यभर दुसऱ्यावर अवलंबुन असते पण जे मी आहे ते तुमच्या मुळेच करू शकले.त्यामुळेच मला उडण्याचे बळ मिळाले.
सासू सासर्यांना अजूनच अपराधी भावना होते आणि त्यांना नियतीचा घाला व कदाचित स्वतःच्या कर्मामुळे त्यांच्या स्वतःच्या मुलीवरही ती वेळ आली याची जाणीव होते...