STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Others

3  

ANJALI Bhalshankar

Others

निसर्ग आणि मानसं

निसर्ग आणि मानसं

3 mins
663

माणूस जन्माला येतो तोच मुळात,परतीची वाट घेऊन मधला काळ तर आंदण असतं.निसर्गाने, दिलेल, आपल्या जन्मा दात्यांच्या मार्फत. या अखंड अनंत,विशाल ब्रम्हांडातलया लाखो ग्रहापैकी, एक असलेल्या पृथ्वीचं,व्यासपीठ आपल्यासाठी असतं जिथं आपल्या सारखे कोट्यावधी जीव, एकाच वेळी श्वास घेत, असतात.आणि सृष्टीचे हे चक्रही कोट्यावधी वर्षांपासून अविरत सुरू आहे.कितीक पीढया आलया, आणि काळाच्या ओघात नष्ट झाल्या. मानव सोडून ईथल्या प्रत्येक जीवाला त्याचे भान व जानं असावी.त्यांना कळतातं मर्यादा !आणी जगण्याच्या अदाही.त्यांना त्यांची हददही कळते ,आणि हुददाही. निसर्ग चक्र कळते कधी कुठे थांबावे, सृष्टीतुन काय व कीती घ्यावे हेही समजते.माणसासारखा आत्मकेंद्रीत प्राणि मानुसच असेल कदाचित्. निसर्गाने विविध रंगी,नटलेल,पुस्तकच जणू अपलयाला बहाल केलय ते वाचता आल पाहिजे. हि सृष्टी एक जादूची नगरी आहे. त्यातली सर्वात मोठी जादू म्हणजे मानसाच शरीर आहे.ज्या शरीरातलया प्रत्येक अवयवांचे, कार्य अगदी सूक्ष्म,अशा लाखो पेशींच्या समुहातलया शेवटच्या पेशीच सुद्धा!काही पेंशीचा जन्म आणि मृत्यूच चक्र अल्पायुषी, असूनही नेटाने आपलं ठरवून दिलेलं कर्तव्य पूर्ण करीत असते मगच मृत पावते ती.आपल्या मेंदुत अशाही पेशी असाव्यात, ज्या आपलया भावविश्वाचे नियंत्रण करतात. प्रेम राग, अहंकार इर्षा,अंहमपणा अलिप्तता, इ.वृत्तीचे प्रतिनिधित्व करतात ज्याचे,पुढे सुख,दुख, द्वेश, लोभ,लालसा,कर्मठ वृत्ती मान, सन्मान, त्याग, कर्तव्य, मोह मत्सर इत्यादी निरनिराळ्या व्यक्तीसापेक्ष क्रिया, प्रतीक्रीया मध्ये वेगवेगळ्या रुपात प्रकटीकरण होत असेल.कदाचित हे सार निसर्गातलया त्या प्रत्येक घटक व जीवासोबतही, घडत असेल जो श्वास घेत आहे जिवंत आहे .परंतु मानुसं यातल्या प्रत्येक गोष्टीत अग्रस्थानी असेल.मानुस स्वार्थ आला की,एकटयान आणि त्याग समूहाने अशा दुहेरी वृत्तीने जगत असतो माझ्या आता पर्यंतच्या माहिती प्रमाणे ही गोष्ट तंतोतंत खरी असावी.

माझ्या घराच्या परीसरातून वाहणारया मुठा नदीच्या पात्रात सकाळी असंख्य पक्षी, जसे की पोपट,बगळे कबुतर,साळुंखे, कोकीळ,टिटवी, घार, व खंडया मागच्या कित्येक सकाळी पहात आहे.हे सारे जण समुहान रोज पाणयावरून नदीच्या या काठावरून त्या काठावर अगदी शिस्तीत जातात अगदी आकाशात रेखीव शेकडो हिरव्या टिपकयांची रांगोळी काढलीय असे ते पोंपटांचे थवे दिसतात तेच, कबुतर , साळुंखे अन बदकांचेही. ते पांढरे शुभ्र बगळे नदीच्या दोन्ही बाजूंच्या कठडयावर एका रांगेत डोळे बंद करून पंरतु सावधपणे आपलं सावज टिपणयाच्या बेतात बसतात.घारींचा समुह उंचावरून थोडं खालच्या दिशेने पाणयाजवळ आलया की विखुरतो दोन दोन च्या किंवा एकट्याने पाण्यावर घिरटया घालतं आपापल अन्न शिस्तीत, मिळवितात पुन्हा उंचावर समुहान एकत्रीत पणे दूर आकाशात भ्रमण करतात. कबुतर मात्र काठावरचं आपापल्या भाऊबंदकीची,साथ न सोडता एकत्रीत सहभोजन करतात नेहमीच.

मधूनच झाडांच्या छोट्या छोट्या वाळलेल्या काळयाकुट्या चोचित घेऊन जातात. एकावेळी एकच मात्र. असे हे वेगवेगळ्या जातीचे पशुपक्षी या नदी च्या परिसरात गुण्यागोविंदाने नांदतात.आकाश मार्गाने हजारोंच्या संख्येने एकत्रीत पणे प्रवास करतांना दुसर्या प्रकारचे पक्षी समोरून आले तरी ते भांडत नाहीत एकमेकांना वाट करून देतात नाहीतर आपापल्या ठरलेल्या वेळेतच आगमन निगर्मन करित असावेत. पाण्यातले अन्न मिळवितानाही ते वेगळ्या प्रवर्गातलया गटात मिसळत नाहीत किंवा, ऐकमेकास शह देण्याचा, वर्चस्व वादाच्या भानगडीत पडत नाहीत. आपापल्या भावभावकीत ते रमतात पंरतु दुसर्याला श्रेष्ठ, कनिष्ठ छोटा, मोठा असल काही समजुन पिळवणूक करायला किंवा सत्ता गाजवायला ते जात नसावेत. हे फक्त माणसांनाच जमते असे त्यांना पाहून वाटते. नित्यनेमाने पक्षी येतात निवांत पणे आपापले अन्न , काटयाकुटया मिळवितात. अगदी ठरलेलया वेळेत.बाजुच्या घनदाट झाडीतुन असंख्य पोपटाचा एकच कलकलाट येतो अगोदर मागाहुन ती हिरव्या टिपकयांची रांगोळी ऊंच आकाशातुन नदीच्या पल्याड दूर दूर कोठेतरी नित्य नेमाने जात असते. तेव्हा माणसाला हि शिस्त कधी येईल क? या पक्षांचे गुण माणुस घेईल का? असे अपले ऊगाचच वाटून जातं...


Rate this content
Log in