Rashmi Nair

Others

1  

Rashmi Nair

Others

निरोप

निरोप

3 mins
760



       स्मितेश जेव्हा ऑफिसला पोहोचला तेव्हा त्याला हार्दिककडून चांगली बातमी मिळाली. त्याने आधीच जाण्याची तयारी केली होती आणि मुमेंट ऑर्डरची वाट पाहत होता. ते मिळताच त्याने दिल्लीच तिकीट काढले. मुंबईचे दिवस संपुष्टात येत होते. शेवटच्या आठवड्यात त्याच्या मित्रांनी त्याला बदलीची पार्टीला मागितली. त्याने मोठ्या आनंदाने पार्टी दिली. त्याला कुणाची पार्टीची अपेक्षा नव्हती.

   पण त्याचा सहकर्मचारी ब्रिजेश स्वतःच पार्टी देईल असा आग्रह धरला. स्मितेश नकार देऊ शकला नाही .तो नाही पण हो बोलू शकत नव्हता किंवा हो पण बोलूही शकत नव्हता. ब्रिजेश काही दिवसच  त्याच्याबरोबर होता आणि नंतर त्याची बदली दुसर्‍या विभागात झाली . स्मितेश त्याला इतका ओळखत नव्हता. प्रत्येकाला तो चांगलच मानत होता. एके दिवशी ब्रिजेश स्मितेशला कॅन्टीनमध्ये दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित करतो. स्मितेशला काही हरकत नव्हती, बृजेशच फक्त दहा वेळा कॉल करतो आणि म्हणतो, "तू ठीक दोन वाजता कॅन्टीनला ये आपण तिथेच जेवतो. स्मीतेश विचारात पडला" दुपारच्या जेवणाची वेळ एक ते दोन वाजेपर्यंत होती. भूक लागल्यास स्मितेशनला काय करावे हेच सुचेनासे झाले ? एक तास तो जेवायच स्वप्नच पाहत राहिला.

      मग अडीच वाजण्याच्या सुमारास त्याला पाहून आश्चर्यचकित झाले की त्याला लंच पार्टी साठी बोलावणारा ब्रिजेश आपल्या भावा समेत इतर मित्रांसह आरामात बसुन जेवत बसला होता. स्मितेश आश्चर्यचकित झाला की .ब्रिजेश समोरच्या खुर्चीवर बसतो आणि म्हणतो की "मी चुकीच्या वेळी तर आलो नाही." "नाही, तू योग्य वेळी आला आहेस बस " असं म्हणत बृजेश निर्लज्जसारखा हसतो.

       "तुला अजून थांबावं लागेल, डिलिव्हर बॉय तुझ्यासाठी ऑर्डर घेऊन येत आहे" हे ऐकून स्मितेश म्हणाला " पार्टी संपली ? " तो म्हणाला, "नाही" "स्मितेश म्हणाला " पण कदाचित तूझे जेवण झालं वाटत ? "तो अजूनही त्याच निर्लज्जपणे म्हणाला," मी घरुनच जेवण आणले आहे. "पण स्मितेशला कळल नव्हतं की जेव्हा तो पार्टी करतो म्हणाला तर त्याच्यासाठी थांबायला पाहिजे होते त्याच्याबरोबर जेवण करायचं नव्हतं? तर पार्टी करायची काही गरज नव्हती त्याच्या मनांत हा विचार आला की त्याने ब्रिजेशला विचारले की त्याने हे असं कां केले ?पण विचारू शकला नाही कारण त्याचा मोठा अधिकारी भाऊ जगदीशही ​​त्याच्याबरोबर जेवत होता.अति शेवटच्या क्षणी त्याला कोणाशीही पंगा घेणं पटत नाही. तो काही न बोलता आलेल पार्सल उघडले .पाहुन त्याला आश्चर्य बाटले . पार्सलमध्ये फक्त एक नुसत गाजर कांदे आणि काकडीचे कापच होते त्याला काही चवपण नव्हती किंवा चटणी नव्हती. स्मितेशने जड मनाने थोडे खाल्ले, पण नंतर तो खाऊ शकला नाही. त्याला दुसरे काहीही ऑर्डरपण करता आले नाही कारण तोपर्यंत कॅन्टीनचे जेवणही मिळणे बंद झाले होते. त्याला मनातल्या मनांत राग येत होता पण नाईलाज होता . 

        त्याने पाहिले की त्याच्या खात्यातील एक शिपाई जेवत आहे . त्याला स्मीतेशने सालद देऊन टाकले . हे पाहून बृजेशने विचारले " काय झाले?" तो म्हणाला , "खूप जास्त झाल " म्हणायला भाग पडले होते, वाया गेलं तर असलेल्या पैशांची वाया जातील म्हणुन . स्मितेशचे उत्तर ऐकून ही ब्रिजेशवर काही परिणाम झाला नाही. स्मितेशचा संयम मोडू लागला. तो गप्प राहुन ब्रीजेश त्याच्या विभागात कधी जाईल याची वाट पहात होता . तो काहीही त्याला बोलु शकला नाही कारण त्याचा मोठा ऑफिसर भाऊपण अजून त्याच्याबरोबर होता.     इतक्यात बृजेशचा फोन वाजला आणि "सॉरी मॅन" म्हणत तो निघून गेला. तो निघताच स्मितेश एखाद्या पिंजर्यातुन सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे पळून गेला.

       दुसर्‍या दिवशी त्याला हार्दिक भेटला . जेव्हा त्याला हे कळले तेव्हा त्याला पण आश्चर्य वाटले की तो ब्रिजेशवर खुप संतापला होता . हार्दिकला सर्व काही सांगून झाल्यावर स्मीतेशच मन जरा हल्क झालं . तिची मनःस्थिती सुखद बनवण्यासाठी हार्दिक त्याला म्हणतो, "चल, चल. आपण फिरायला जाऊ।" स्मितेश काही न बोलता त्याच्या सोबत निघून गेला. चालत असताना दोघे "सन्मान रेस्टॉरंट" च्या समोर आले. हार्दिक म्हणाला - "चल, बाहेर काय उभा आहे? चल आत जाऊ या आपण मस्त पार्टी करुया. " तो दोघे आत जेवायला गेले . 



Rate this content
Log in