Deepali Mathane

Others

3.9  

Deepali Mathane

Others

निरागसता

निरागसता

2 mins
223


     निरागसता काय असते हो! जे होणार आहे आणि जे घडत आहे ते अगदी हसतमुखाने, तसेच कुणी आपल्याशी कसा वागतोयं यापेक्षा आपण चुकीचे वागू नये आणि जे जसं आहे तसचं एक्सेप्ट करायचं. आमच्या बालपणाचा काळ काहीसा असाचं होता.  काल आमच्या ताईनी आमचे बालपणीचे फोटो ग्रूपवर शेअर केले तेव्हा क्षणार्धात सगळं बालपण नजरे समोर उभचं ठाकलं.काही असे क्षण असतात ना *"अनमोल".* जे मनाच्या बंद तिजोरीत जपलेले असतात ते सगळे डोळ्यासमोर आले की आपण निरागसपणे हळवे होऊन जातो. कालचक हळूच मग नकळत *रम्य ते बालपण* म्हणत आठवणींच्या सागरात घेऊन जातं.........आणि मग मनं ती निरागस जाणीव शोधू लागतं.

   संपूर्ण परिवार एका फोटोत *ना श्रीमंतीच ढोंग ना गरिबीची लाजं* असा तो सुखाचा काळं. आजी-आजोबा, काका-काकू, चुलत -वुलत बहीणभाऊ सगळे जमले की खूप हशा पिकायचा. त्यातही जर कुणीही मोठे आम्हाला रागवले किंवा ओरडले तर राग चिडचिड होत नव्हती. उलट आदरयुक्त भीती वाटायची की परत आपण चुकीच नको वागायला.

  मोठ्यांनी काहीही काम सांगितलं तरीते करतांना हीन पणाचा भाव अजिबात नव्हता.अगदि पाय चेपून देण्यापासून तर डोक्याला तेल मालिश देखिल सहजच द्यायचों.

    आत्या, काका, मामा, मावशी अशी सगळी देखणी नाती प्रत्येकाने भरभरून जगावी. शेवटी काय येतं हो सोबत?.........आमच्या पारिवारिक फोटोतील ज्या व्यक्ती या भूतलावर नाहीत त्यांची कमी कधीच भरून निघणार नाही. पण त्यांच्या सोबतचे क्षण हे आयुष्याच्या संध्याकाळी देखिल सहज आठवतीलं . इतके जपून आहेत ते मनाच्या खोल गाभाऱ्यात कि कुठलीच धूळ त्यांना पुसटही करू शकणार नाही. प्रत्येकाच्या बाबतीतल्या असंख्य आठवणींचा ठेवा असा काही जगण्याच्या उमेदीसाठी पुरणार आहे की कधीच कसलं मळभ मनाला शिवणार नाही..............

   आठवणी तशा बऱ्याच सांगता येतील. शेवटी काय असतं न माणूस जे काही असं साठवून ठेवतोन , ते सगळचं निरागस असतं. त्यात डावपेच , राजकारण याचा अभावच आढळेलं आणि तो असावाच, असं मला वाटते. *शुध्द अंतःकरणाने केलेली कुठलीही क्रुती ही तुमचं कहीच नष्ट होऊ देत नाही. कुठून तरि त्या *(पॉझिटिव्ह वेव्हज्)* *सकारात्मक लहरी* नेहमी तुमच रक्षण करतात.

   असो! अस आहे मग सगळं .....तुम्हाला वाटते गम्मतं!...............वाटावीच actually कारण ते तुमच्या निरागसतेचं लक्षणं आहे...........


Rate this content
Log in