" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

नेहरू बोलतोय

नेहरू बोलतोय

2 mins
753


नेहरू :: होय, मुलांनो होय,मी चाचा नेहरू , देशाचं पहीले पंतप्रधान, पं.जवाहरलाल नेहरू बोलतोय..

 तुम्हाला माहिती आहे मुलांनो मला मुलं नी फुलं खूप आवडायचं...का बरं.. फुले म्हणजे निसर्गाचं सौंदर्य,कोमल,ताजी, टवटवीत, सुगंधीत, मुलं ती ही निरागस.. मुलं हीच खरी राष्ट्राची. संपत्ती.. देशाचं भवितव्य,, राष्ट्र निर्माते उद्या चे आधार स्थंभ..ह्या मुलांच्या हातीच देशाचं भवितव्य अवलंबून आहे . म्हणून तुम्हा मुलांवर माझा खरा विश्र्वास...

खरं सांगू का मुलांनो,या प्राणप्रिय भारतमातेवर..या मायभूवर.. माझं खूप खूप प्रेम.. म्हणूनच या मायभूच्या कल्याणासाठी सारं आयुष्य समर्पित केलं.. देशासाठी जगावे देशासाठी मरावे अशी शपथ घेऊन च गांधी, नेहरू घराण्याने मायभूची नितांत सेवा केली..

पारतंत्र्यातून मुक्त झालेल्या देशासमोर अनंत समस्या असताना देशाचं विकासाचं स्वपन साकारनं सोपं नव्हतं..पण आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला मान सन्मान मिळवून देऊन दारिद्र्य, बेकारी नि विषमते बरोबर लढता लढता अखंड भारत टिकवून ठेवून न्याय, निती, समता, बंधुता निर्माण करणं सोपं नव्हतं..

नियोजन नी अमंलबजावणी च्या जोरावर,ग्रामिण भारताचा खरा विकास, शेती नी शेतकरी संपन्न झाला पाहिजे यासाठी सर्वस्व पणाला लावले..

आज देश महासत्ता व्हावा.हेच माझं खरं स्वप्न आहे... देशातील विषमता, दारिद्र्य, बेकारी, भ्रष्टाचार, दहशतवाद, आतंकवाद समूळ नष्ट व्हावा..नी सुजलाम सुफलाम, महासत्ता म्हणून भारताचा उदय व्हावा.. हे माझं स्वप्न आहे.. उज्ज्वल भविष्यासाठी नी मायभूच्या सेवेसाठी शतदा जन्म झाला तरी कमीच.. म्हणून म्हणतो..

मायभूच्या या पोटी

मी जन्म पुन्हा घेईन

फेडीण पांग सारे

जयगित सदा गाईन..


म्हणूनच म्हटलं होतं

माझ्या देहाची मुठभर रक्षा.. गंगेत टाकावी,उरलेली रक्षा उंच विमानातून ज्या शेतात शेतकरी काबाडकष्ट करून सोनं पिकवतो त्या शेतात टाकावी...

शेवटी एकच म्हणेन..


स्वर्गासारखा पवित्र इथे मानवी समाज दिसावा

अन् सर्व जगात महान माझा

भारत देश असावा...


जगू मरु आम्ही देशासाठी

देऊ आमचे प्राण,

सर्व जगात महान

हा माझा हिंदुस्थान...


सर्वस्व अर्पण चरणी

देऊ बलिदान,

सर्व जगात महान

हा माझा हिंदुस्थान...


Rate this content
Log in