मुलगी काळाची गरज...
मुलगी काळाची गरज...
मुलगी म्हटलं कि बऱ्याचदा नकोशीच वाटते... मुलीला जन्म देणारी आई ही एक स्त्री असुनही तिला ही मुलगी नकोच असते... का...?? पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा, जुनाट रूढी... आणि त्यात भरडल्या गेेलेल्या तुमच्या आमच्या सारख्या स्त्रिया...
एक काळ असा होता जिथे मुलाला वंंशाचा दिवा मानलं जायचं आणि मुलीला पायखालची वहान समजलं जायचं... एकीकडे मुलगा म्हणजे सर्वस्व असायचं आणि दुुुसरीकडे त्याच रूढी - परंपरेेत मुलगी म्हणजे कवडीमोल... शून्यत्व...
अशाच काळात काही अशाही स्त्रिया जन्मल्या ज्यांनी स्वःकर्तृत्वाने समाजात योग्य ते बदल घडवून जुनाट रूढी - परंपरांना मोडीत काढले आणि स्त्रियांकडेेे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवला...
आजच्या काळात मुुुुलगी ही पायाखालची वहान नसुुन मुलगी ही काळाची गरज आहे... कारण मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी त्या दिव्याला तेवत ठेवणारी मुलगी ही त्या दिव्याचीच वात असते...
असं म्हणतात कि मुलगी शिकली आणि प्रगती झाली... एक मुुुलगी शिकली कि पुर्ण घर - परिवार शिकतं कारण मुलगी ही संस्कारांची खाण असते...
मुलगी ही एकाच नात्यात गुरफटलेली नसते ती एकाच वेळी अनेक नाती जपत असते आणि ही नाती जपत असताना तिचा प्रवास हा खुुप संघर्षमय असतो... कधी ती आपल्या आई - वडिलांची मुलगी म्हणुन जगत असते... कधी ती आपल्या भावंडांची बहिण म्हणून जगत असते तर कधी सुन म्हणून जगत असते... तर कधी आई म्हणुन जगत असते... अशी अनेेक नाती ती जपत असते...
जेव्हा ती आपल्या आई - वडिलांची मुलगी म्हणुन जगत असते तेेेव्हा ती आपल्या आई - वडिलांना खुप जीव लावते, आपल्या आई - वडिलांच्या स्वप्नपुुर्तीसाठी अपार कष्ट घेते, वृृृद्ध आई - वडिलांचा सांभाळ करते आणि भविष्यात ही ती त्यांची सावली होऊ पाहते...
जेव्हा तीच मुुलगी आपल्या भावंडांची बहिण म्हणुन जगते तेेेव्हा ती बहिण होण्याआधी एक चांंगली मैैैत्रीण होण्याचा प्रयत्न करते, आपल्या भावंडांंनाही जीवापाड जपते, त्यांंच्या आवडीनिवडी बद्दल जागृत असते...
जेव्हा तीच मुुलगी सुन म्हणून जगते तेव्हा ती आपल्या सासू - सासर्यांची तितकीचं काळजी वाहते, त्यांचाही आधार होते...
आणि जेव्हा ती आई होते तेव्हा मुलाच्या जन्मापासून ते ते इवलसं बाळ मोठं होईपर्यंत त्याचं सारं काही तीच करत असते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी या म्हणीनुसार ती आपल्या चिल्या -पिल्यांवर मायेेेचा पाझर तर फोडतेच पण त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्यात ही कुुठेच कमी पडत नाही...
अशी सगळी नाती जपत असताना तिचा बाहेरच्या जगाशी संंपर्क हा येतोच आणि या बाहेरच्या जगाशीही तिचा एक आगळाच लढा असतो...
आणि या बाहेरच्या जगात वावरताना तिला एक स्त्री म्हणुुन जगावं लागतं... आजच्या काळातील स्त्री ही स्वतंत्र असली तरीही तिची होणारी पिळवणूक अद्याप ही पुर्णपणे नाहीशी झालेली नाहीए...
या जुनाट रूढी - परंंपरेेेमुळे आजही स्त्रियांची अवहेेलना होते, कमी वयात एखाद्या मुलीचं लग्न एखाद्या प्रौढाशी लावून देेेेणे जेेणेकरून तिला कमी वयात वैधव्याला सामोरं जावं लागणं...जेणेकरून तिला सतीप्रथा, हुंडाबळी आणि गर्भपात या सारख्या रूढींमुळे तिचा विनाकारण बळी घेणे अशा काही कारणास्तव आज स्त्रियांंची संख्या ही खुप कमी झाली आहे...
पण तरीही आजची स्त्री ही एक डॉक्टर, वकिल, इंजिनियर व पायलट देखील होऊ शकते... आजच्या वाढत्या लोकसंंख्येनुुसार मुलांची संख्या ही जास्त असुुन मुलींंची संंख्या ही खुपच कमी आहे आणि म्हणूनच आजच्या काळात मुुलींची उणीव भासत आहे...
मुलगी ही मनमिळाऊ आणि सर्वगुणसंपन्न असते. आजची मुुलगी ही उद्याच भविष्य घडविते आणि म्हणूनच मुलगी ही काळाची गरज आहे...
