मुलगा हवा की मुलगी?
मुलगा हवा की मुलगी?
आजच्या युगात कोणाला ही मुलगी हो असे सांगितल्यावर राग येतो, त्यांना हवा फक्त मुलगा (वंशाचा दिवा) घराला पुढे चालवणारा, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला लोक तयार असतात. त्यासाठी गर्भलिंग चाचणी ते गर्भपात करतात. जुना काळात जर एखाद्या स्त्रीला सतत मुलगी होत असेल तर तिचा पती मुलगा होण्यासाठी दुसरी पत्नी सुद्धा करायचा, हा फक्त गैरसमज आहे. एका शास्त्रज्ञाने मुलगाच होणार किंवा मुलगी होणार असे दोन रसायनांचा शोध लावला, त्यामुळे लोकांना मुलगा हवा यासाठी त्या रसायनांची मागणी होती, परंतु दुसरे रसायन मुलगीचे होते ते कुणीच मागत नव्हते.यामुळे भरपूर मूलं वाढतील पुढे मुली कमी होतील याचा विचार त्याने केलाच नाही. तो फक्त त्याने लावलेल्या संशोधनावर खुश होता.
ही गोष्ट त्याच्या एका पर्यावरण रक्षक मित्राला कळाली, त्याने त्या रसायनाची चोरी केली व त्याच्या बाटलीत पाणी भरून दिले. पुढे त्या पर्यावरण रक्षकाने एका खेड्यात जाऊन नकली दाढी मिशी लावून स्वामी बाबा नावाने मुलगा व मुलगी होण्याच्या प्रसाद देऊ लागला. त्याच्याकडे लोकांची गर्दी होऊ लागली मागणार ती किंमत देऊन फक्त मुलगा होण्याचा प्रसाद बाबांकडे मागत होते, तर कोणी ही मुलगी होण्याच्या प्रसाद मागत नव्हते. इकडे या शास्त्रज्ञाच्या रसायनाच्या लोकांना काहीच फरक पडत नव्हता लोक त्याची टिंगल करू लागले. तिकडे बाबा चांगलाच लौकिक झाला मग तोच शास्त्रज्ञ एक दिवस बाबाकडे गेला, तेथील गर्दी, लोक व त्यांची फक्त मुलगा होण्याची प्रसादाची मागणी हे पाहून तो आश्चर्यचकित झाला. बाबा ने त्याला ओळखले परंतु शास्त्रज्ञ बाबा रुपी मित्राला नकली दाढी व मिशी मुळे ओळखू शकला नाही. सर्व गर्दी गेल्यावर तो बाबा पुढे आला, बाबा ने त्याला विचारले तुला मुलगा हवा की मुलगी, त्यावर तो बाबाला म्हणाला बाबा प्रसादाने हे कसं शक्य आहे, त्यावर बाबा रुपी मित्राने नकली दाढी मिशी काढली त्याचा असली रूप आपल्या मित्राला पाहून तो आश्चर्यचकित झाला. मग त्या मित्राने त्याला लोकांची मुलगा होण्याची मागणी, मुलगी कोणालाही नको हे असंच चालू राहिलं तर निसर्गाचा समतोल बिघडणार, भविष्यात प्रत्येक जण मुलाची मागणी करणार तर त्यांच्यासाठी लग्नाला मुली कुठून आणणार, त्यासाठी हे रसायन भविष्यात मानवजातीवर मोठा आघात करणार हे त्या शास्त्रज्ञाला कळाले. त्याने मित्राकडचे रसायन व स्वतःकडील रसायन फेकून त्याच्या सर्व नोट्स जाळून टाकल्या. पर्यावरणावर येणारी वाईट परिणामापासून पृथ्वीला वाचवले आज गर्भलिंग चाचणी मुलीचे गर्भपात मुलाचा हट्ट यापायी भरपूर मुलांना लग्नासाठी मुली करता भटकंती करून सुद्धा मुली लवकर भेटत नाहीत. त्यामुळे मुलगा मुलगी एकसमान असे मानून आपण सर्वांना समानता दिली पाहिजे.
मुलगा मुलगी एकसमान, उंचावतील देशाची मान.
