STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

मृत्यू

मृत्यू

1 min
89

  जीवन मिळाले त्याला मृत्यू अटळ आहे.पण हा मृत्यू समीप दिसतो तेव्हा त्या माणसाच्या मनात किती उलघाल होत असेल.बोलता येत नाही.सहन करता येत नाही.तरी सहनशिलता दाखवावीच लागते.

  डाॅक्टरी इलाज संपलेले असतात.नातेवाईकांनी आजारापुढे हात टेकलेले असतात.पैसा पाण्यासारखा वाहिलेला असतो.पण दैवाचा खेळ कोणालाही समजलेला नसतो.आपला माणूस हवा म्हणून आपण डाॅक्टर जे सांगतील ते करतो.त्याची शाहानिशा पण करत नाही.खरचच आपल्या माणसाला त्या औषधोपचाराची गरज आहे का?हे ही पाहत नाही.डाॅक्टर म्हणजे जीवदान देणारा दुसरा देवच मानतो आपण.

  सर्व इलाज करून थकलो की मग देवाच्या आहारी जातो. पण काहीही उपाय होत नाही.उपयोग होत नाही.

   आपल्या माणसाचा मृत्यू दोन ,तीन महिन्यावर येवून ठेपलाय असे जेव्हा डाॅक्टर सांगतात त्या वेळी पायाखालची जमीन सरकते. डोके सुन्न होते.विचार खुंटतात.पण अशा वेळी धीराने घेवून त्या माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात.

  प्रक्टिकल राहणे कठीण असते पण राहावे लागते हे ही तितकेच खरे आहे .

   आता जर माणसाचा अचानक मृत्यू आला तर...खूप चुटपूट लागून राहते.नातेवाईकांंना सावरणे कठीण होते.कालांतराने सावरावे लागतेच हे तितकेच खरे आहे.

  मला इतकेच सांगायचे जीवनी आलात तर भरभरून जगून घ्या.हे जीवन पुन्हा नाही.आपली कर्तव्य पूर्ण करता करता आपली स्वप्ने अपूर्ण ठेवू नका.हे मला आत्ता समजायला लागलेय.वयाची पंचावन्न वर्ष निघून गेल्यावर .पण आता जगायचे ठरवलेय आपल्या इच्छा न मारता आनंदी जीवन जगायचे.

   स्वैराचार नाही पण स्वतंत्र विचारांनी जगायचे.आजचा दिन आनंदात,खुखात घालवायचा.हाच आनंद सभोवताली पसरवायचा.

   जीवन दिले आहे देवाने

   मृत्यूही तोच तर देणार

   या वसुंधरेवर वसुधा आता

   आनंदाने जीवन फुलवणार....

तर मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही.जीवन जगा,आनंद घ्या,आनंद लुटा.

  आनंद या जीवनाचा

  सुगंधापरी दरवळावा

  पाव्यातला सूर जैसा

  ओठातुनी ओघळावा.....


Rate this content
Log in