मृत्यू एक अटळ सत्य
मृत्यू एक अटळ सत्य
मृत्यू एक अटळ सत्य आहे. खरंच जगात आजपर्यंत ते कोणालाही न चुकलेलं...तरीही माणूस किती हाव करतो.मा़झे माझे म्हणत आयुष्यभर पुंजी जमा करत राहतो.कोणाचा मृत्यू कुठे आणि कसा होईल हे आजपर्यंत कुणीच सांगू शकत नाही.जसा जन्म तसा मृत्यू हा प्रत्येक सजीव जीवाला येणारच हे त्रिकालाबाधित सत्य..पण आज लोकं हे सत्य स्विकारायला उरलेच नाहीत, काहीजणांना तर मृत्यूचं भय पण वाटत नाही.म्हणून जातात काहीजण व्यस्नांच्या आहारी....तर कांहीं जण माझं कोणीच काही करू शकत नाही याच अहंभावामध्ये जगत असतात...जर जगात मानवाला किंवा अन्य जिवाला मृत्यू आला नसता तर या पृथ्वीवर रहायला जागा पण राहिली नसती.इतकी गर्दी आजपर्यंत झाली असती...
देवाजिच्या आले मना
तेथे कोणाचे चालेना.....!!
या उक्तीप्रमाणे माणसाला मृत्यू आला की आपलं काम झालं.मृत्यूला आजपर्यंत कोणीही अडवू शकले नाही...ना शकणार..देह नाशवंत सारा...केला उगीचच पसारा...आपला जीव म्हणजे हवेचा एक पाण्यावरती बुडबुडा...कधी जाईल काहीच सांगता येत नाही...मग लोकं म्हणतात "अहो ती बाई काल,परवाच भेटली.चांगली ठणठणीत होती.कसं काय झालं?" आपले शरीर म्हणजे जशी एखादी उशीच आहे..वरून जशी खोळ असते तशी आपली चामडी असते...ज्याचा कांहीं जणांना खूप गर्व असतो.ती ही एक दिवस मातीत जाणार...शरीरातली हाडं म्हणजे उशीमधला कापूस अगदी काही दिवसांनी खिळखिळी होवून जाणार...पण माणसाला आहे तोपर्यंत केवढा गर्व,कसला अहंभाव... मृत्यू आल्यानंतर आपला जीव आपले हे शरीर सोडून एक दिवस निघून जाणार..पण जगात राहते ती फक्त आठवण ती ही कांहीं काळापुर्ती...एक दोन व पिढ्यापर्यत त्यानंतरचा माणसाचा,नावाचा प्रवास संपला...
कांहीं माणसं मरतामरता वाचतात.अगदी शेवटची घटका मोजणारी माणसं परत जगायला लागतात अशी अनेक उदाहरणे आहेत... तेव्हा कोणाच्या तरी तोंडून निघतं "देव तारी त्याला कोण मारी" अगदी समीप मृत्यू आला असून देखील तो वाचतो...या जन्म मरणाच्या फेरीतून प्रत्येक जीव कसा अलगद अळवावरचे पाण्यासारखा सर्रकन निघून जातो...मानवी जीवन जगताना सोबत राहतो तो चांगला स्वभाव,चांगले संस्कार,चांगले आचार विचार.. म्हणून क्षणभंगुर जीवन जगताना कधी कोणाला दुखवू नका,कधी कोणाची टिंगल टवाळी करू नये,अपंगाला किवा त्याच्या व्यंगत्वाला टिका करू नये,एखाद्या पती मरण पावलेल्या महिलेला हिणवू नका....त्या सर्वात त्या़चा काय दोष?
एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर अजिबात तिच्या दैवाला डागण्या देवू नका...ही विधवा किंवा हीने आपला नवरा गिळला असे महाभयंकर शब्द वापरू नका....कारण इथं जायचे तर सर्वालाच आहे...कोणी आजपर्यंत असा जन्मला नाही की त्याला मृत्यू येणारच नाही...असल्या फुकटच्या गर्वात राहु नका...आज आत एका घडीचा विश्वास नाही माणसांचा माणसाच्या जीवनावर... म्हणून कधी कोणाला विनाकारण श्राप देवू नये...घ्यायचाच असेल तर आशिर्वाद घ्या,पुसताच आले अश्रू एका विधवा भगिणींचे पुसा,करताच आली मदत तर आंधळ्या पांगळ्यांना करा...सेवाच करायची तर देशाची करा...घरातील सासू सा-याची करा...पण कधीच कोणाला दुखवू नका.....कारण....
दोन घडीचा डाव
त्याला जीवन ऐसे नांव"
या उक्तीप्रमाणे आपले जीवन हे क्षणभंगुर आहे हे लक्षात ठेवा... मृत्यू ला भिऊ नका असं प्रत्येकजण म्हणतो.पण स्वतला प्रत्येकाला त्याचा जीव किती प्रिय असतो... त्यामुळे ख-या अर्थाने जीवन जगायला शिकावं...तिथच जिवनाचे खरे मर्म लपलेले आहे...सर्वात महत्त्वाची गोष्ट अहंभाव,मीपणा,अहंकार,गर्व, सोडून द्या...एक दिवस हे सर्व सोडून रिकाम्या हाताने जायचं आहे हे लक्षात ठेवा... म्हणून दुस-याची निंदा करणे सोडून द्या...प्रत्येकाचा आदर करा, माझ्याकडून समोरच्याला किती सुख देता येईल.कशी मदत करता येईल याचा विचार करा... आणि कितीही श्रीमंत असाल तर संपत्तीचा गर्व करू नका...संततीचा विचार करा...त्याला चांगले शिक्षण द्या आणि योग्य संस्कार करायला शिकवा....तरच गुन्हेगारी थांबेल अन्यथा गुन्हेगारी वाढायला वेळ लागणार नाही....
छोट्याशा आयुष्यात आपल्या आरोग्याला जपावं...कधीतरी एखाद्याचं दुःख वाटून घ्यावं...एखाद्या अनाथाला मदतीचा हात द्यावं....येणा-या प्रत्येक क्षणाचे फक्त साक्षीदार व्हाव....असं माणसाचा वर्तन रहावे.....
करता आले तर थोडे वाचन दिवसामाजी करता आले पाहिजेत....माणसात देव पहावा....तरच खरा देव तुम्हाला आशिर्वाद देईल यात तीळमात्र शंका नाही...चांगल्या आचारांनी विचारांनी आपल्या जीवनाचं रंगमंच रंगवून जावं...
"होता आलं कधी तर
जाईजुई व्हावं
भ्रमरासोबतच कधी
इतरांनीही सुगंध द्यावं..."