shubham gawade Jadhav

Others

4.0  

shubham gawade Jadhav

Others

मनाविरुद्ध झालेलं लग्न....

मनाविरुद्ध झालेलं लग्न....

6 mins
238


आज पुन्हा वैभवीचे आणि वैभव चे कडाक्याचे भांडण झाले .वैभवी खूपच रागात होती .वैभवी ने टेबलावरची फुलदाणी जोरात जमिनीवरती आदळलं त्याचे पार तुकडे तुकडे झाले .आता ती वैभव ला म्हणाली जोडून दाखव हे पहिल्यासारखे .वैभव तिझ्याकडे बघत निःशब्द झाला होता . तो काहीच बोलत नव्हता त्याची नजर शून्य झाली होती.त्याला माहित होतं की वैभवी आता ऐकण्याच्या मनःस्थिती नाही त्यावेळी त्याने शांत बसणे हे योग्य समजले .तिने परत वैभवला सुनावलं की तुझ्याशी माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालेलं लग्न ...आहे .

वैभव हे ऐकून सुन्न झाला. वैभव फुलदाणीचे तुकडे उचलून डस्टबिन मध्ये टाकत होता पण अचानक त्याच्या मनात काही आल आणि त्याने ते तुकडे एका प्लास्टिक च्या पिशवीत भरले .हताश झालेला वैभव जड हृदयाने ते सगळं पुन्हा पुन्हा आठवत होता की यात माझी काहीच चूक नाही .मी थोडीच बळजबरी केली होती माझ्याशी लग्न कर म्हणून आणि करायचं नव्हतं माझ्याशी लग्न तर मला तस अगोदरच सांगायचं ना .माझी यात काहीच चूक नाही .आता त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते .कसबसं त्याने स्वतःला सावरलं आणि आवरून दुपारच्या जेवणाचा डब्बा न घेताच तसाच ऑफिसला निघून गेला .वैभवीचा राग तोपर्यत शांत झालेला होता.आपण रागाच्या घरात वैभवला दुपारचा जेवणाचा डब्बा ही करून दिला नाही हे तिच्या लक्षात आल .पण आता खूप उशीर झाला होता तो कधीच निघून गेला होता .आपण असे वागलो याची तिला थोडीशी लाज वाटली .तिने पटपट आवरायला घेतलं .मस्त गोल गोल पोळ्या आणि भाजी बनवली .वैभवचा जेवणाचा डब्बा भरला आणि त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी निघाली .

                इकडे वैभव सकाळपासून खूप नाराज आणि दुःखी झाला होता.आज त्याच लक्ष्य कामात लागतच नव्हतं समोरचा पिसि तसाच चालू होता आणि तो खोल कुठेतरी विचारांच्या गर्तेत हरवला होता .त्याला मधेच वाटत होतं की आपण लग्न करून मोठी चूक केली आहे .वैभवीला दुसरं कोणीतरी आवडत असावं आणि कदाचित घरच्यांच्या दबावामुळे तिला आपल्याशी लग्न करावे लागले .त्यामुळेच ती आपल्याशी एवढं तिरस्काराने वागत असावी.साहजिकच काहीवेळा स्वतःच्या मनासारख्या गोष्टी नाही घडल्या तर स्वभाव आपोआपच चिडचिडा बनून जातो . कित्येक वेळा तर माझ्याही बाबतीत असच घडलंय .माझ्या ऑफिस मधले एम्प्लॉयी माझ्या मनासारखे नाही वागले तर मी रागावतोच ना . आपण खरच खूप मोठी चूक केली आहे असं त्याला मनोमन वाटू लागलं .आता आपण एक काम करू सरळ वैभवीला डिवोर्स देऊन टाकू म्हणजे ती हवं त्या मुलाशी लग्न करेल आणि सुखी राहील आणि माझं मी बघेल काय करायचं ते. ठरलं तर आज संध्याकाळी तुझ्याशी आपण बोलून घेऊ आणि एकदाचा काय असेल तो निर्णय घेऊ .एवढ्यात त्याच्या ऑफिसमधल्या केबिनच्या डोअर वरती क्नॉक क्नॉक असा आवाज झाला आणि विचारांच्या गर्तेत हरवलेला वैभव भानावरती आला .येस कंमिंग असं म्हणून तो सावरून बसला .त्याचा त्याच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नव्हता आपण स्वप्न तर नाही ना बघत असं त्याला मनोमन भासायला लागलं .वैभवी त्याच्या केबिन मध्ये त्याचा टिफिन घेऊन आली होती .आपण इतका वेळ विचार करत होतो तो चुकीचा होता काय असं वैभवला वाटायला लागलं .वैभव उठून उभा राहिला आणि आता वैभवीची आणि वैभवची क्षणभर नजरानजर झाली .वैभवला तिच्या डोळ्यात अपराधीपणा जाणवत होता .

                 वैभव ने तिला बसायला सांगितलं ती काही बोलायच्या आत म्हणाला "तुला सापडलं ऑफिस त्रास नाही ना झाला ?" तिचा स्वर आता एकदम खालावला होता एखाद्या अपराध्यासारखा ती हळूच म्हणाली " हो सापडलं".

वैभव - काय घेणार चहा की कॉफी ??

वैभवी - काहीच नको ?

वैभव - ओके .

वैभवी- आज घरी लवकर ये मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे.

वैभवची तिझ्या त्या वाक्याने पायाखालची जमीनच सरकली .

वैभवने नुसती मान डोलावली .वैभवी उठून जायला निघाली .

वैभव - थांब .मी येतो खालीपर्यंत सोडवायला .

वैभवने तिला खाली पार्किंगपर्यंत सोडवलं .वैभवीने तिची स्कूटी चालू केली आणि निघाली .तिझ्या स्कूटीच्या आरश्यात वैभवच्या शांत मूर्तीला न्याहाळत होती .न्याहाळताना तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच चमक होती आणि ओठांवरती हसू होतं .

          वैभव आता ऑफिसमधली काम भरभर आटपू लागला .त्याला तिझे शब्द सारखे आठवत होते की आज "घरी लवकर ये मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे." त्याला वाटल जे आपल्याला वाटल डिवोर्स चं तसंच तिलादेखील वाटल असेल तेच बोलण्याकरता तिन लवकर यायला सांगितलं असेल नक्कीच .आता वैभव रडकुंडीलाच आला होता त्याला अगदी मोठ्याने रडावंस वाटतं होतं .तो सारखा घड्याळाकडे बघत होता .एरवी भरभर जाणारा वेळ आज मुद्दाम उशीर करत होता .सेकंड काटा तासकाट्याच्या गतीने धावत होता मुद्दाम .त्याची स्तिथी एखाद्या भेदरलेल्या सश्यासारखी वाटतं होती.त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता .मनातून तो खूप खजील झाला होता .

              इकडे वैभवीने घरी जाऊन मस्त वैभवच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवले होते . सगळ घर सजवलं होतं .वैभव आला की पाहून खुष झाला पाहिजे असा तिचा प्रयत्न होता .सकाळचं आपलं कृत्य आणि ते वाक्य खरच चुकीचं होत. लग्न जरी मनाविरुद्ध असलं तरी तो काही चुकीचा जोडीदार नव्हता . सकाळी आपण एवढं चुकीचं बोललो पण त्याने रागानेसुद्धा आपल्याकडे बघितलं नाही किंवा तोंडातून एक शब्द देखील काढला नाही .त्याच्यासारखा समजूतदार कोणच नाही आणि आताच्या जगात असा जोडीदार भेटणही खूप कठीण आहे .तिला तिझी चूक समजली होती .आपण जर त्याला हव्या असणाऱ्या गोष्टी बोललो तर तो नाही म्हणणारच नाही .वैभवी मनातल्या मनात खूष होऊन पटपट काम आवरत होती .तीही घड्याळाच्या काट्यांकडे सारखी सारखी बघत होती .तिला कधीच नव्हती अशी ओढ वैभवच्या येण्याची लागली होती .तेवढ्यात वैभवच्या कारचा हॉर्न वाजला .

                         वैभवच्या कानात आता सकाळचे शब्द घुमू लागले की हे माझ्या मनाविरुद्ध झालेलं लग्न ...आहे .जड पावलांनी तो घराची प्रत्येक पाहिरि चढत होता .डोअर बेल वाजवायच्या आत दरवाजा उघडला गेला .त्याला याच जरा नवलच वाटल. घरात जातो तर मंद मंद प्रकाश सगळीकडे अत्तराचा सुगंध येत होता आपण चुकीच्या घरात तर नाही ना आलो असं त्याला वाटल . पण समोर तर वैभवी होती मग दुसऱ्याच घर नक्कीच नाही .तिन हातातली बॅग घेतली हे चाललंय काय हे त्याला समजतच नव्हतं .त्याला तिने आवरून यायला सांगितलं जेवण तयार आहे .सकाळच्या प्रकाराची सारवासारव करण्यासाठी तर नसेल ना ही सगळी तयारी असं वैभवला वाटू लागलं .तो आवरून डायनिंग टेबल जवळ आला .त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ बनले होते .आता त्याची भूक आणखी खवळली गेली पण मनात सकाळचे शब्द येताच टी भूक कुठच्या कुठं पळून गेली .वैभवीही आता समोर येऊन बसली .मी बोलायला काही सुरवात करताच तिझ्या तोंडून शब्द बाहेर पडले सॉरी. मी तर अवाकच झालो मी म्हणालो "काय म्हणाली तू ?" तशी ती पुन्हा एकदा म्हणाली i am extremely sorry vaibhav .

मी सकाळी जे काही वागले ते खरच चुकीचं होतं .माझी अशी चिडचिड होतेय सारखी कारण मला पुढे शिकायचं आहे आणि एक चांगला जॉब ही करायचा आहे . माझं तस पहिल्यापासून स्वप्न आहे पण अचानक लग्न झालं आणि सगळंच बदलून गेल .माझं स्वप्न हे स्वप्नच राहील .म्हणून मी तुझ्यावर रागवत होते .मी सकाळी जे बोलले ते अगदी खरंय की हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालेलं लग्न ...पण तुझा स्वभाव वगैरे पाहून आता मला असं वाटतं आहे की मला योग्य जोडीदार भेटलाय .मलाच समजायला जरा उशीर झालाय आणि ती आता डबडबल्या डोळ्यांनी म्हणू लागली की वैभव मला माफ कर .

            आता सगळा प्रकार माझ्या लक्ष्यात आला की तिझी शिकायची इच्छा आहे .वैभव तिला बोलला की मला कधी अडचण नव्हती तुझ्या शिकण्याबद्दल आणि इथून पुढेही नसणार .उलट मला तर असं वाटतं होतं की तू तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण कराव .पण तू कधी बोलण्याचा चान्स दिलाच नाही .तुला पाहिजे त्या कॉलेज ला ऍडमिशन घे. माझ्या मनातली ना ना प्रकारची वादळ क्षणात दूर झाली .

इट्स ओके असं बोलला .झाल्या प्रकाराला पूर्ण विराम देऊ आणि इथून पुढे तुला काही हव असेल बोलून दाखवशील .तू जर असं स्पष्ट बोललीस तर मला समजेल ना की तुझ्या मनात काय आहे .वैभवीही मनोमन खूप खूष झाली . आणि म्हणाली सॉरी त्या वाक्यासाठी .


Rate this content
Log in