Sagar Bhalekar

Children Stories

4.0  

Sagar Bhalekar

Children Stories

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय!

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय!

6 mins
945


माझी शाळा म्हणजे सरस्वती विद्यालय खरंच सरस्वतीचे मंदिरच जणू म्हणा. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन लोकांचा खूप मोठा वाटा असतो. एक आई, दुसरा आपल्या आजूबाजूचा परिसर आणि महत्वाचा भाग म्हणजे आपली शाळा. लहानाचे मोठे होत असताना जास्तीत जास्त आपला वेळ आपण शाळेतच घालवतो. आपल्या शाळेवर आपले पालक खूप मोठी जबाबदारी टाकत असतात. आणि सगळ्या शाळा ती जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळत असतात. म्हणून शाळा ही एक व्यक्ती आणि राष्ट्र घडवण्यात खूप महत्वाचे कार्य करते. आई म्हण्याची पूर्वी लहान असताना मी शाळेत जात असताना खूप रडायचो. पण आता शाळा बदलल्या आहेत की, लहान मुलं गाडी बसून आरडा ओरडा करत शाळेत जाताना त्यांना मजाचं वाटते.


मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय…. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय

रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचय

नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर

छान अक्षरात आपल नाव लिहायचय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन

नळाखाली हात धरून पाणी प्यायचय,

कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या

चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय

सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेळायचय,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल का?

हा विचार करत रात्री झोपी जायचय,

अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनंदासाठी ,

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.


माझा शाळेतील पहिला दिवस:- 

माझा शाळेतील पहिला दिवस मला आजही चांगलाच आठवतो. शहरातील एका चांगल्या शाळेत मला प्रवेश मिळाला होता.आठवडाभर आधीच सर्व तयारी झाली होती. नवा गणवेश, नवे दप्तर, नवी पुस्तके अगदी बूटमोजेही नवे ! आजीने मला देवांच्या पाया पडायला लावले. आजी आजोबा मला शाळेपर्यंत पोहोचवायला आले होते.शाळा घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर होती. शाळेच्या बाहेर पालकांची खूप गर्दी होती. काही मुले रिक्षाने, गाड्यांनी येत होती. तेवढ्यात एक मोठी स्कूल बस आली, त्यातून भरपूर विदयार्थी उतरले. सर्वजण गणवेशात. त्यामुळे दृश्य फारच सुंदर दिसत होते. मी वरवर धिटाई दाखवत होतो, पण आतून घाबरलेला होतो. तेवढ्यात घंटा वाजली आणि शाळेचे प्रवेशद्वार उघडले.माझ्या शाळेचा पहिल्या दिवसाचा एक किस्सा सांगतो, मला इतका वेळ घराबाहेर राहण्याची सवय नव्हती. सारखी आजीआजोबांची आठवण येत होती. मग शिक्षिकेने आम्हांला कविता म्हणण्याचा आग्रह केला. कोणीच पुढे येईना. तेव्हा बाईंनी मला टेबलाजवळ बोलावले आणि गाणे म्हणायला सांगितले. मी सर्व धीर एकवटून 'सरस्वती-स्तोत्र ' म्हटले. काय जादू झाली न कळे ! सर्व वर्ग हसू लागला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि शिक्षिकेने मला वर्गाचा मॉनिटर नेमले. असा होता माझा शाळेचा पहिला दिवस !


आमचे शिक्षक :

मोठ्या बाईपासून आमच्या शाळेतल्या शिक्षकापर्यंत सगळ्या इतक्या चांगल्या होत्या की, आम्ही घरांपेक्षा शाळेतच जास्त रमायचो. मला कधीही छडी चा मार बसायचा नाही. मला आठवते कधीही मी अंगठा धरून किंवा कोंबडा करून उभा राहिलो नसेल. आणि अश्या भयंकर शिक्षा आमच्या शाळेत तर नव्हत्या. माझी आई सांगायची, तिच्या शाळेत ह्या अश्या प्रकारच्या शिक्षा होत्या तेव्हा मात्र आमच्या अंगावर काटा उभा राहायचा. पण ह्याचा अर्थ असा नव्हता की, आमच्या शाळेत शिस्तच नव्हती, असे मुळीच नव्हते. उलट आमच्या शाळेत शिस्त खूप कडक होती आम्ही काहीतरी मस्ती केली तरी आम्हला वर्गाच्या बाहेर जावे लागत असे. तशी आमची शाळा शिस्तीशीर मुलांची शाळा म्हणूच ओळखली जायची. कारण आमच्या बाईंना सांगावे लागायचे नाही. त्यांना फक्त कसे वागायचे हे आपल्या वागणुकीतून दाखवावे लागायचे.मला आठवतात, माझे गणित आणि भूमितीचे शिक्षक अनिल सावंत. अतिशय शांत आणि सज्जन माणूस. त्यांचा आवाज कधीही वाढत नसे. बाकी सगळे शिक्षक हातात पाठयपुस्तक घेऊन शिकवायचे. पण हे शिक्षक हातात पाठयपुस्तक न घेता शिकवायचे. आम्हला वाटायचे रोज घरून पाठयपुस्तक वाचून येत असावे. सावंत सरांची मुलगी आमच्याच वर्गात होती, पण तिला विचारणार तरी कसं?आणि त्यात नवल म्हणजे सावंत मास्तर खूप साधे भोळे होते की, विचाराची सोय नव्हती. त्यांच्या कापडयांना कधीही इस्त्री नसायची, कधी कधी तर त्यांची पॅन्ट उसवलेली असायची. त्यांची दुहेरी भूमिका होती, शाळेत असतील तर शिक्षक आणि इथून बाहेर पडले तर शेतकरी. 


आमच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेपासून करत असे. आम्ही सगळे वर्गामधून मधल्या हॉल मध्ये जमायचो. सरस्वती वंदने नंतर ओंकार आणि गायत्री मंत्र म्हंटला जायचा. मग त्या दिवशी वाढदिवस असलेल्या मुलाचे किंवा मुलीचे एक रोप आणि फुल देऊन अभिनंदन केले जायचे. नंतर आमच्या वर्गात जाऊन दिवस सुरु व्हायचे.आमच्या शाळेत एक से बढकर एक हुशार शिक्षिका आणि शिक्षक होते.त्यांना त्यांच्या विषयाची उत्तम माहिती होती. आणि शिकवण्यात तर त्यांचा हात धरणारे कोणीच नव्हते. ते फक्त धडे वाचून शिकवित नव्हते तर त्या अनुषंगाने जग भरची माहिती आम्हाला देत असे. त्यामुळे आम्ही फक्त पुस्तकी किडे न होता सर्व माहिती असलेले होतो. आम्हाला एका विषयाचा धडा शिकवताना त्याबरोबर इतर विषयातील पण माहिती देत असे.


शाळेतली "मधली सुट्टी"

शाळेत होतो तेव्हा पाचवा तासच्या शेवटच्या दहा मिनिटांकडे लक्ष सारखं घड्याळाकडे असायचं. कधी वाजतेय घंटा 'मधल्या सुट्टीची'.. शाळेतल्या सात तासाच्या अभ्यासात 'मधली सुट्टी'.. खूप जवळची वाटायची.. एकदम आपलीशी..पण. कधी कधी थकायला व्हायचं. तेव्हा आवर्जून आठवायची 'शाळेतली मधली सुट्टी'.. स्वच्छंद.. निरागस.. ते क्षण.. नेमकं असं काय होतं त्या क्षणांमध्ये?..जास्त काही नव्हतं.. ते क्षण स्वतःची ओळख विसरू देत नव्हते..मनसोक्त वावरता येतं होतं तेव्हा.. आजही काही अगदीच 'पारतंत्र्य' वैगेरे अस काही नाही.. पण स्वतःला घातलेली 'चौकट' मोडता येतं नाही..

पण पहिल्यासारखं सलग वाचायची सवय सुटली आता. हल्ली नोकरी आणि घर.. दोन्ही संभाळाव लागतं.. कसरत नुसती.. पण ट्रेन मधला वेळ मात्र शाळेतल्या मधल्या सुट्टी सारखा वाटतो. माझ्या एकट्याचा... नाही मिळाली जागा बसायला तरी 'तो वेळ मात्र.. त्या माझ्या शाळेतल्या 'मधल्या सुट्टी' पेक्षा कमी नाही'.. कारण ट्रेन मधले माझे मित्रसुद्धा माझ्या सारखे समदुःखी आणि रोजची ट्रेन ठरलेली.. रोज दुःखाच रडगाणं गाण्यापेक्षा.. करा पूर्ण तुमच्या 'हरवलेल्या मधल्या सुट्टीतली गंमत'..


शाळेत खेळाचे महत्त्व :

नुसता खेळच नाही, तर इतरही गुणांची शाळेत कदर केली जाते होती आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याला घडवले जाते होते.काही विद्यार्थी अभिनयात हुशार होते,काही गाण्यात, तर काही वादनात हुशार होते. काही भाषण करण्यात तर काही विनोद सांगण्यात हुशार होते.आमची शाळा रत्नपारख्याची नजर ठेवून विद्यार्थ्यांना निवडत असे आणि घडवत असे. त्यामुळे आमची शाळा ही गुणी मुलांची खाण आहे. आमच्या शाळेतील किती तरी मुले आज राष्ट्राचे वैभव आहे ते अशा द्रोणाचार्य शिक्षकांमुळेच! त्यामुळे आमच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून सगळ्या गावाची धडपड चालू असे.पण ह्याचा अर्थ असा नाही की आमची शाळा फक्त श्रीमंताची मुळे शाळेत घेते असे. उलट आमचे शिक्षक गावा गावातून फिरत असे आणि पाडे ,वस्त्या अगदी झोपडी मधील सुध्दा हुशार मुळे हेरून त्यांना फुकट शिक्षण देऊन त्यांचे व त्याबरोबर त्यांच्या घरच्याचं आयुष्य घडवित असे. त्यापैकी कित्येक जण डॉक्टर , इंजिनियर , शास्रज्ञ आणि कलेक्टर झालेले आहेत.


गावातील बहुतांशी कुटुंब आता मुंबईला स्थायिक झाली आणि त्यामुळे त्यांची मुलेही मुंबईतील हाय-फाय अशा इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला गेली…त्यामुळे शाळा बंद करण्यापलीकडे कोणताच पर्याय नव्हता… अगदी एक-दोन विद्यार्थी गेल्या वर्षापर्यंत होती मात्र ती हि माध्यमिक शिक्षणासाठी दुसरीकडे गेली..आता मात्र गावातील माझी प्राथमिक शाळा येणाऱ्या-जाणाऱ्या एसटीकडे डोळे लावून पाहत असते…गप्प..शांत..तुटल्या-फाटल्या अवस्थेत पडून असते शाळा… गावावरून शिकून आल्यावर या मुंबईत नोकरी मिळण्यासाठी वणवण करावी लागते म्हणूनच गावातील अनेकजण आप-आपल्या पोराबाळांना मुंबईला शिकवतात..त्यातल्या सर्वांनाच परवडते अशातला भाग नाही…. मात्र आपल्या पोरांच्या आयुष्याचा विचार करून ते आणतात मुंबईला आणि रात्रीचा दिवस करून मेहनत करतात आणि शिकवतात…माझ्या गावासोबत आजूबाजूच्या अनेक गावांची हीच परिस्थिती….. काही मोजके लोकं फक्त मुंबईत चांगले स्थायिक आहेत… बाकी सगळे सकाळी सहापासून रात्री बारा पर्यंत अंगमेहनत करून जगतात… अशी अनेक करणे आहेत शाळा ओसाड पडायला…


आता माझ्या या शाळेच्या दूरवस्थेला कारणीभूत कोण ? गावातील लोकं ? ज्यांनी आप-आपल्या मुलाबाळांना मुंबईला शिकायला आणले कि सरकार ? ज्याने उत्तम दर्जाचे शिक्षण दिले नाही म्हणून येथील लोकांना मुंबईतील शाळा ‘सुंदर ’ वाटली… जाऊ दे ना… कोणी का असेल याला जबाबदार…. पण शेवटी शाळा बंद झाली ती झालीच… आता पुन्हा सुरु होणे कठीणच वाटू लागले आहे…आणि जर सुरु झाली तरी कोण असणार आहे तिथे शिकायला ? पाणावलेल्या डोळ्यावरून हात फिरवला आणि एसटी स्टॅंडच्या दिशेने परत फिरलो… थोड्याच वेळात एसटी आली. एसटीमधून जोपर्यंत शाळा दिसत होती तोपर्यंत वळून वळून शाळेकडे पहिले…. शाळेची पाहिलेली दूरवस्था अजूनही डोळ्यासमोरून जाता जात नाही…


Rate this content
Log in