मी सुद्धा पक्षी असते तर
मी सुद्धा पक्षी असते तर


मी विचार करत बसली, तेवढ्यात मला पक्ष्यांचे मधूर निनाद ऐकायला आले. तेव्हा मनात विचार आला जर मी सुद्धा पक्षी झाले असते तर... किती मज्जा ना! मला पण इतर पक्ष्यांसारखे उडता आले असते.
मला ही संधी मिळाली तर आकाशात खूप लांब उडून झाडांवर घरट बनवेन. मुळात मला खूप आनंद म्हणजे सकाळी लवकर उठून शाळेत नाही जावे लागणार आणि अभ्यासाची गरजपण नाही. मला वाटायला लागले, मी जसे स्वप्नातच हरवले होते! अशा कल्पना मनात येऊ लागल्या.
अचानक उडताउडता जर पडले आणि मला लागले तर! कोण वाचवणार? माझ्यासोबत मैत्री कोण करणार? नंतर मला असे वाटले, नको, नको... परमेश्वराने दिलेले, हे मानव जीवनच खूप चांगले आहे.