महाखंत
महाखंत
स्थानिय आकाशवाणी केंद्र,हे त्या - त्या परिसरातील शेतकयासाठी दैंनदिन कृषि कार्यक्रम प्रसारित करित असतात. प्रत्येक स्थानिय आकाशवाणी केंदामध्ये एक कृषि ईकाई असते. शेतक-याला कृषिला आवश्यक अशी माहिती देणाचा प्रयत्न आपल्या कृषि कार्यक्रमा मार्फत ती कृषि ईकाई स्थानिय भाषेत प्रसारित करत असते. आकशवाणीला हे सर्व कार्यक्रम तैयार करण्यासाठी अनेक सरकारी व गैरसकारी संस्थाची मदतीची आवश्यकता असते,. त्यासाठी आकाशवानीच्या प्रबंधन विभागाला निरनिराळ्या क्षेत्रातील विषेशग्यांची गरज भासत असते. त्यात कृषि वैज्ञानिक, तंत्र वैज्ञानिक, कृषि अधिकारी, हवामानशात्री,कुशल शेतकरी इत्यादी. या सर्वांचे योगदान असल्याशिवाय कृषि कार्यक्रम तैयार करने अवघड असते. या सर्वांच्या मदतीने तैयार केलेले कार्यक्रम ज्ञानवर्धक, लाभकारी,सुचना प्रधान ,शेतितंत्रज्ञान व नविन- नविन उन्नत शेतिची माहितीयुक्त असते.यासठी आकाशवाणी प्रबंधन काही उपाय-योजना करत असतात. अशीच एक समिती आकाशावणी केंद्रामध्ये कायम कार्यरत असते. ते सर्वांच्या मदतीने वर्षा भरासाठी, शेतक-यासाठी एक कार्यक्रम तैयार करतात. तयार केलेल्या कार्यक्रमला सर्व पक्षांची मान्यता असली पाहिजे यासाठी त्यांची एक सामूहिक त्रैमासिक बैठक बोलवण्यात येत असते. बरेच वेळ्या ही बैठक आकाशावाणीच्या कार्यालयात होत असते.आणी कधी-कधी ही वैठक या समितीचे जे अन्य सदस्य असतात ते आपल्या कार्यालयत पण आयोजीत करतात. अशाच एका बैठ्कीत मला हमानशात्री किंवा हवामान वैज्ञानिक म्हणुन माझा कार्यालयाने माझी नियुक्ती, वरोरा येथील कृषि महाविद्यालत होण्या-या आकाशवानीच्या बैठ्कीसाठी केली होती. त्यात माझे सहयोगी व एक ड्रावर पण होता. आयत्या बिळावर नागोबा, आपल्याला आता आनंदवनला ज्याण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्या संधीचा आपण नक्कीचा फायदा करुण घेतला पाहिजे. मी तसा प्रस्ताव माझ्या सहयोग़ीला पण दिला. तो म्हणाला जर एका गोट्याने दोन पक्षी मारल्या जात असेल तर यांच्या पेक्षा छान काय असु शकते ?.
ठरल्या प्रमाने आम्ही एकदम सकाळी कार्यालयत पोहचलो.मी बघितले की ड्रावर एक्दम सकाळीच आला होता. गाडी वैगरे साफ-सुप करुन आम्हची वाटच बघत होता. नंतर सरकारी आवश्यक कार्रवाई करुन आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. मध्यंतरी एका ठिकाणी नाश्यता वैगरे करुन मग समोरच्या प्रवासाला सुरुवात केली होती. आम्ही बरोबर बैठीकीच्या वेळेस नियत ठिकाणी वरोराल्या कृषि महाविद्यालयात पोहचलो होतो. नंतर लगच मिटिंग सुरु झाली. आकाशवानीच्या निदेशक ने आपल्या सुची प्रमाने सर्वांचा परिचय करुन दिला होता. परिचया सोबतच नाश्ताचा प्रबंध पन केला होता. नका नका म्हणा अन पायली भर आंबिळ चाखा. सर्वांना भुक लागली होती. नाश्ता करता-करता मागच्या मिटिंग मध्ये ज्या बिंदुवर चर्चा केली होती, व त्यावर सहमती झाली होती, त्याच्या प्रगतिवर प्रकाश टाकण्यात आला होता. सबंधीत पक्षांचे त्या अनुशंगाने प्रशंसा पन करण्यात आली होती.नंतर नविन मुद्दावर चर्चा सुरु झाली होती. त्यावर सबंधीत पक्ष आपले-आपले मत व्यक्त करत होते. अन्य पक्ष यात ते कशी मदत करु शक्तो या वर पण आपले विचार ठेवत होते. सगळ्यांचे एकमात्र उदिष्ट कृषि कार्यक्रमला कसे व्यवहारिक,शेतक-याला पोषक व लाभकारी होवु शकेल. त्यासाठी आपण कशे सहकार्य करु शकतो. जेने करुन कृषि उत्पादन वाढवायला मदत होईल !. त्यामुळे शेतक-याची आर्थीक बाजु भकक्म करता येईल या वर आपले विचार व अनुभव व्यक्त करत होते.
आकाशावाणीचे प्रबंधक व अन्य उपस्थित अधिका-यानी,मैसम कार्यालय द्वारा वेळी-वेळी हवामानाची अचूक माहिती उपलब्द करत असल्यामुळे कार्यालयाला धन्यवाद दिला. मी पण त्यांना, याच्या पेक्षा अधिक तुम्हची, अर्थात कृषिची गरज असेल तर आम्हाला सांगा. तसा प्रस्ताव मी आमच्या उपमहानिदेशकास देवु शक्तो.त्यावर आवश्यक कार्र्वाई नक्कीच करता येईल अशे आश्वासन कार्यालयच्या वतीने मी दिले होते..नंतर कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी बाबा आमटे द्वारा केलेल्या निरनिराळ्या कार्यांची सविस्तर माहिती दिली होती. ते किती मोठे समाज सुधारक , सामाजीक कार्यकर्ता होते. जेव्हा, त्या काळात महारोग्याला त्याच्या रक्ताचे माणसे दूर लोटत असे. अशा अटी-तटीच्या काळात त्यांनी महारोग्यासाठी आनंदवन आश्रमाची स्थापना केली होती. व महारोग्यांना प्रेम,जिव्हाळा व त्यांचा उपचार करुन पालन-पोषण केले होते. नंतर संपूर्ण टिम प्राचार्या सोबत, दुपारच्या जेवना नंतर परिसरातील काही स्थान बघायला गेले होते. त्यापैकी एक महत्वाचे स्थान म्हणजे बाबा आमटे यांची समाधी होती.समाधी वर जावुन आम्ही सर्वांनी त्यांना श्रध्दासुमन अर्पन करुन, त्या थोर आत्माला नमन केले.
दुसऱ्या दिवशी आमचा सकाळी पूर्ण आनंदवन बघण्याचा कार्यक्र्म होता. आम्ही सर्वजन प्राचार्यांच्या मार्गदर्शणाखाली सगळ्याच स्थानांना भेट दिली होती. तीथे कसा महारोग्यांचा व्यवस्थित उपचर करण्यात येतो. काम न धाम अन भुईला भार समल्या जाणा-या महारोग्यान कडुन ,उपचर झल्यावर त्यांच्या कडुन कसे फळ-भाज्या सोबतच काही अन्न-धान्याची पण शेति करुन घेता येते. ह्याच महारोग्यांना ज्या समाजाने, मित्रांनी व रकताच्या रिश्तेदारांनी वाडित टाकलेल्या माणसाला पुन्हा मानुस बनवुन त्याच्या कडुन फळ-भज्यांचा व्यवसाय करायला लावुन त्याला आत्मनिर्भर करण्यात येत होते.रोज मरे त्याला कोण रडे, दुःखावलेले मनाला पुन्हा तरोताजे करुन जीवन हे किती सुंदर असते हे या आनंदवनाच्या शाळेतच शिकायला मिळते.
मला लहान पनाचे ते दृष्य आठवते. आमच्या समोर एक कुटुंब राहत होते.त्या कुटुंबात दोन मुली , एक मुलगा व आई राहत असे. ती बाई कपाळाला कुंकु पण लावत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला ती विधवा आहे असे सर्वांना वाटत होते.पण नंतर त्याच्यां कडे एक माणुस येत असे. तो त्या घरचा मालक होता. मग त्या बाईचे पितळ उघडे पडले होते. त्याला महारोग झाला होता. म्हणुन त्य बाईने त्याच्याशी संबंधविच्छेद केला होता. तो कदाचित आनंदवनलाच आपाला इलाज करत असावा. त्याच्याशी मुलगा सोडुन कोनिच बोलत नसे. ज्या बाईने सात जन्म संबंध टिकवण्याचे वचन दिले, तिने त्याच्या कडे पाठ फिरवली होती.म्हातारा नवरा, अन कुंकाला आधार, आधारहिण झाला होता.पण घर प्रमुखात अजुन प्रेमाची धुक-धुकी जीवंत होती. पण तीला त्याचे महत्व नव्हते. त्याला महारोग झाल्याने तीचे अष्टकोणी वाटोळेच झाले आहे असा तीचा गैर-समज होता.म्हणुन तीने त्याचा मरण्याच्या आधीच तो मरण पावला आहे असे गृहित धरले होते.
मी कॉलेज मध्ये असतांना आमच्या मित्र मंडळीत बाबा आमटेंच्या कार्याची नेहमी चर्चा होत होती. ऐवढे मोठे साहसी ,अदभुत कार्य करण्याची शक्ती बाबांना कोणी दिली व ति प्रेरना कशी शेवट पर्यंत टिकुन ठेवली होती. याचे रहस्य काय असावे. या वर चर्चा होत होती. तेव्हाच काही मित्रांना त्याच्यां मित्र मंडळी , नातेवाईका कडुन काही माहित मिळाली होती. ते, सांगी-वांगी सांगत होते.बाबा आमटे जेव्हा कॉलेज मध्ये शिकत असे. तेव्हा त्यांचे प्रेम एका मुलीवर होते.व घरच्या लोकांचा विरोध असल्यामुळे ते दोघे पळुन जावुन त्यांनी लग्न केले असे सांगत असे.याची खरी माहिती कोणी त्यांच्या जवळच्या व्यक्तिने कधी उघड पने केली नाही. किंवा असे कुठे वाचन्यात पण माझ्या आले नाही. पन साधनाताईला बघण्याची माझी व माझ्या मित्र मंडळीची फार इच्छा होती.ताईचे पण बांबाच्या कार्यात तितकेच मोठे अतुल्य योगादान आहे. अर्धांगीनी म्हणुन ताईने बाबाना जो सबळ पाठिंबा दिला होता.व त्यांच्या प्रत्येक कार्यात, प्रत्यक्ष व अप्रत्येक्ष सहयोग केला होता. त्यामुळेच बाबा इतके मोठे, जगा वेगळे महान कार्य आपल्या जीवनात करु शकले होते.
मी नेहमीच आकाशवाणीच्या कृषि मिटिंगला जात असल्यामुळे आकाशवानी मधील काही महिलांची माझी चांगली ओळक झाली होती.त्यांच्या पैकी काही महिला या दौऱ्यात पण होत्या.मी त्यांना सहज विचारले, बाबा आमटे तर गेले आहे.पण साधना ताई तर हयात आहे ना ?. जरी त्यांचे दर्शन आपल्या नशिबात नव्हते, तरी आपण कमीत-कमी त्यांच्या अर्धांगीनीला भेटुन काही पुण्य प्राप्त करु शकतो. त्यांचा आर्शीवाद नक्कीच घेवु शकतो. माझ्या विचारांशी सर्वच सहमत होते. ताईंना तसा आम्ही निरोप पाठवला होता. त्यांनी दुपार नंतर मिळन्याचे कबुल् केले होते. ठरल्या प्रमाने आम्ही काही ठराविक मंडळी त्यांना भेटायला गेलो होतो. गेल्यावर आम्ही त्यांना आपला परिचय दिला.त्यांच्या सोबत बरीच चर्चा झाली होती. मी त्यांना बघत होतो. त्यांचे ते नैसर्गिक सुंदर रुप,मधुर भाषा,व उच्च विचार बघुन भारुन गेलो होतो. घर भर रंभा आणि पाण्याचा नाही थेंबा. फार देखने, सुंदर व्यक्ति नेहमी आपल्यातच मग्न असतात.सर्व असतांनाही ताईने बांबाच्या या कार्यात, ती तन-मन लावुन शामिल झाली होती. मला आता पकका विश्वास झाला होती कि हिच ती प्रेरणा आहे. ज्याच्यामुळे बाबांनी ऐवढे महान कार्य करण्याचे शिवधनुष्य उचले होते. एकटा चना भाड नाही फोडु शक्त याची खात्री झाली होती. त्यांचे सर्वच मुले, सुना व नातु बहुतेक महारोग्याचींच सेवेत आहे. ते सगळे डॉकटर आहेत. त्यांच्या ज्येष्ठ मुलगा, प्राकाश याने तर आदिवासींच्या सेवेचा उचांकच गाठला आहे. तो आपल्या परिवारा सोबत,खोल,डाट जंगलात जंगली प्राण्या सोबतच वास्तव्य करित आहे. त्याच्या सोबतीला जंगली प्राणी असतात.
वाघ,साप,कुत्रा, व अन्य प्राणी त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत.जंगलात राहणारे आमचे आदिवासी बंधु जेव्हा आजारी पडतात. व रुग्णाचा आजार त्यांच्या जवळ असलेल्या औषधीने बरा होत नाही, अशा परिस्थितित भयंकर आजारी पडलेल्या आदिवासी रुग्णाचा इलाज फुकट डॉ ,प्रकाश करतात. आदिवाशी युवक भयंकर आजारी असलेल्या रुग्णाला खाटीवर डॉकटरांच्या घरापाशी न सांगता आणुन ठेवतात.नंतर डॉकटर आपाल्या विधीनेव उपलब्ध साधनांच्या उपयोग करुन रुग्णाचा उपचार करतात.ही तर त्यांची सिमा पार मानव सेवा आहे. काही धर्मिक षडयंत्रकारी,मानवाला भिती दाखवुन त्याच्या कडुन आजच्या विज्ञान युगात कर्मकांडी धार्मिक संस्कार करुन, त्याची फसवणुक करुन आर्थीक लाभ करुन घेत आहे. अज्ञानी,भाउक, भित-या भक्तान कडुन करुन घेतात. त्यामुळे धनाड्य होत चालले आहे.व भक्त अजुन लाचार,गरिब असाह्य होत आहे.आनंद वन हे भ्रष्ट धार्मिक कर्मकांड करना-यासाठी एक आदर्श आहे.हा आदर्श त्यांनी अंगिकारावा.स्वतःला मानव सेवेशी जोडावे.धार्मिक कर्मकांड व अंधश्रदा समाजातुन काढुन टाकाव्या. हे त्यांनी स्वतःच केले तर फार लवकर यातुन पिडीत भक्त बाहेर पडतील!.
बाबा आमटे यांच्या या महान कार्यासाठी त्यांचे कितीही कौतुक,गुनगाण, स्तुति केली तरी ती कमीच आहे. त्यांच्या या मानव सेवेने ते अमर झाले आहे. तरी या देशातील,व जगातील लोकांनी त्यांचा आपल्या परिने सम्मान करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यातील काही प्रमुख पुरस्कार, गांधी शांती पुरस्कार, महाराष्ट्रभूषण, रॅमन-मॅगसेसे, पद्मविभूषण, पद्मश्री इत्यादी.
बाबांचा जन्म हिंघणघाट ईथे वर्धा जिल्यात झाला होता. माझा पण जन्म वर्धा जिल्हातच झाला होता. त्यांची कर्मभूमि वरोरा हे गांव वर्धेपासुन खुपच जवळ आहे. आम्ही काही मित्रांनी वर्धेला कॉलेज मध्ये शिकत असतांना, बरेच वेळा आनंदवनला जाण्याचा प्रयत्न केला होता.पण तो नेहमीच काही कारणा मुळे फिसकट होता. बांबाना जिवंतपणी भेटू शकलो नाही याची मनाला खंत आहे. जसे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणसाला जर या जगात नेहमीसाठी आपल्याला जिवंत राहावयाचे असेल तर अशे काही असामान्य कार्य करावे की लोक आपल्या नेहमी त्या कार्यासाठी आठवण करतील. जसे बाबा आमटे यांनी केले आहे. जर असे कार्य आपण करु शकत नसेल तर अशा व्यक्ति विषयी आपण लिखाण करावे म्हणजे वाचणारेसुद्धा तुम्हाला विसरणार नाही. असाच काही अल्पसा प्रयत्न मी केला आहे.
