मैत्रिणी
मैत्रिणी
अनघा आणि समिधा या लहानपणापासून मैत्रिणी असतात. दोघीही एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकतात. त्या शेजारीच राहतात.त्यामुळे दोघीही लहानपणापासून सोबतच खेळतात,सोबतच अभ्यास करतात. दोघीही अभ्यासात खूप हुशार असतात. कधी शाळेत अनघा पहिली ,तर कधी समिधा पहिली येते. त्यांची मार्क्स ची होड असते. त्या दोघी फक्त अभ्यासातच नाही तर इतर अनेक गोष्टीतही पण हुशार असतात. दोघींच्या सर्व आवडीनिवडीही सारख्याच असतात. त्यामुळे त्या दोघींचे खूप पटते. व त्यांच्या मैत्रीचा सर्वानाच हेवा वाटतो.त्या दोघीही सर्वगुण संपन्न असतात त्या दोघींना चित्रकला, नृत्य याचे सोबतच वर्ग असतात.व त्या प्रदर्षितही सोबतच करतात.
पण दहावीत गेल्यावर अनघा अभ्यासात थोडा कंटाळा करते. समिधा नेहमी तिला समजविण्याचा प्रयत्न करते.पण ती ऐकत नाही. समिधा मात्र एकटी खूप अभ्यास करते.समिधा जेव्हा अनघाला काही समजावयला किंवा अभ्यासाला अनघाच्या घरी जाते तेव्हा ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. त्याचा परिणाम असा होतो समिधाला दहावीत ९६% मार्क्स मिळतात तर व ती मेरिटमध्ये येते . अनघा मात्र ७१% मार्क्स मिळवून पास होते,पण अनघाला स्वतःला कमी मार्क्स मिळालेल्या दुःखापेक्षा समिधाला मिळालेल्या मार्क्स चे जास्त कौतुक वाटते व तिला खूप आनंद होतो. अकरावीला दोघीना वेगवेगळ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळते पण दोघींचेही विषय सारखेच असतात. दोघीही मॅथ्स, सायन्स घेतात.पण अकरावीला गेल्यावर अनघाला तिची चूक समजते व समिधांचे न ऐकण्यामुळे वेगळ्या कॉलेज मध्ये जाण्याचा पशश्चताप होतो. आणि समिधाही दुसरे कॉलेज मिळून आणि स्वतःच्या मार्क्सचा अभिमान न बाळगतात मैत्रीत कुठलीही खंत पडू देत नाही. ती तिला सोबत घेऊन अभ्यास करते व सर्व अनघाला समजवून सांगते. अनघाची यावेळी समिधांचे सर्व काही ऐकते याचा परिणाम दोघींनाही बारावीत सारखेच मार्क्स मिळतात. व दोघीही इंजिनीरिंगला एकाच कॉलेजला एकाच शाखे बरंच मध्ये ऍडमिशन घेतात. तिथेही भरपूर सोबत अभयस करतात. दोघींचेही पुण्यात वेगवेगळ्या कंपनीत कॅम्पस सिलेक्शन होते. म्हणून दोघीही वेगळ्या कंपनीत असल्या तरी सोबत रूम करून रहातात. आपल्या हॉबीज जपतात. एकमेकांना सांभाळून घेतात. एकमेकींची काळजी घेतात. नंतर कालांतराने समिधांचे लग्न होते व लग्न झाल्यावर एका वर्षातच तिला मुलगा होतो पण मुलाची काळजी घ्यायला घरी कुणी नसल्यामुळे व ती थोडी भावनिक असल्यामुळे नौकरी सोडते. काही दिवसांनी अनघाचेहीलग्न होते पण ती तिला मुलगी झाल्यावरही घरी सांभाळायला बाई ठेवून नौकरी चालू ठेवते. त्यामुळे अनघाची नौकरी घरच्या जबाबदाऱ्या यामुळे दोघींच्या भेटी कमी होतात. व लग्नानंतर त्याची घरेही लांब असतात. फक्त आठवड्यातून एकदा फोनवर कधीतरी त्या बोलतात. समिधा मुलगा सहा सात वर्षाचा होईपर्यंत त्यात पूर्णपणे रमते पण हळूहळू मुलाची शाळेची वेळ वाढते व तो त्याचा अभ्यास आणि कलासीस यामध्ये गुंततो त्यामुळे जास्त वेळ बाहेरच राहतो त्यामुळे तो दहा बारा वर्षाचा झाल्यावर समिधा ला घर खायला उठते , उदासीनता येते. एवढ्या दिवस घरी राह्ल्यामुळे बाहेर पडून नौकरीच्या आत्मविश्वासही कमी होतो. फोनवर बोलताना अनघाच्या समिधाची उदासीनता व आत्मविश्वास कमी होण्याची जाणीव होते . तेव्हा अनघा तिला प्रत्यक्ष भेटते व खूप समजावते व समिधांचे गणित पहिलेपासून चांगले असल्यामुळे त्याचे क्लासेस घेण्याचा सल्ला देते. समिधा चा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळल्यामुळे ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते. म्हणून अनघा स्वतःच्या नवऱ्याला विश्वासात घेऊन समिधाच्या बाजूला घर घेते व स्वतःची मुलगी व तिच्या मुलीच्या वर्गातील काही मुली समिधा कडे कलाससाठी पाठविते. हळूहळू समिधाच आत्मविश्वास वाढतो. ती मुळात हुशारच असल्यामुळे तिच्या कलासला थोड्याच अवधीत मिळतो. व ती दहावी बारावीचेही वर्ग सुरु करते. स्वतःची जागा घेऊन कलास सुरु करते त्यात स्टाफही घेते. तिच्या कलासला ऍडमिशन मिळण्यासाठी अवघड होते एवढी तिची प्रसिद्धी होते. पुण्यामधून दुरदुरून मुले तिच्याकडे प्रवेश घेण्यासाठी येतात . हे सर्व अनघाच्या प्रयत्नामुळे साध्य होते व समिधाला तिचा हरविलेला आत्मविश्वास परत मिळतो.
अश्या प्रकारे ह्या दोघी मैत्रिणी एकमेकींना दोघींच्याही बिकट परिस्थिती साथ देतात. त्यात कुठल्याही प्रकारचा स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि मैत्रिणींच्या अपयशाची लाज न बाळगता साथ देतात.व आपल्या मैत्रीचे नाते जपतात.
मैत्रीचे नाते असेच असावे ज्यात गर्व,अभिमान न बाळगता मित्राला त्याच्या बिकट परिस्थितीत त्याच्यातील कमतरतेची जाणीव न करून देता त्यातून वर येण्याचा प्रयत्न करावा.