मैत्री
मैत्री


ए पागल क्यु हात लगाया ? एक आई बगिच्यात खेकसलीच अंगावर ऐवून एकदम निरांजन च्या, आणि हे लांब बसून त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्यावर नजर ठेवणाऱ्या रेवती ने अचूक टिपले आणि ऐकले ही. ते वाक्य एखाद्याने तिच्या कानात तप्त रस ओतावा असे झोंबले. क्या हुआ? असं विचारतं ती धावतच घटनास्थळी हजर झालीपण. अरे कुछ सिखाओ अपने लडके को, मेरी बेटी को छुआ उसने. ठीक है मै समझाती हु उसे पर एक बात बताईये, उसने सिर्फ नकल उतारी है ना बाकी बच्चों की, उसने कीया क्या बस ताली ही तो दी हाथ पें. रेवती बोललीच, कारण ती रोजच्या हया अश्या तक्रारींना वैतागली होती. तिचा मेंदू फुटायची वेळ आलेली. रोजच तेच ते आपलं. तिने चरफडत मनात बोललं.
शेवटी कोणा कोणाला समजावणार होती प्रत्येक वेळी. सगळ्यांना आपलं तेच ते सांगत बसायचं, ती एकच गोष्ट किती वेळा परत परत सांगत बसायची प्रत्येकाला. ती अक्षरशः कंटाळली होती.पण काय करणार आहोत आपण असं स्वताःशीच पुटपुटत एका हाताने निरांजनला खेचत घराच्या दिशेने चालायला लागली. चल लवकर आज नेहा मावशीकडे जेवायला बोलावलं आहे चल. मग घरी येवून दोघं छान तयार होऊन निघाले सुध्दा.
नेहा रेवतीची जिवश्च कंठश्च मैञिण, अगदी रेवती काही नाही बोलली तरीही नेहा तिच्या मनातलं ओळखणारी. तिचा आनंद, दुःख जाणून घेणारी आणि वाटून घेणारी पण. कुठलीही आणि कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता. तिला कधिही नैराश्य यायचा अवकाश, तिच्या बरोबर बोलून तिला एक प्रकारची प्रेरणा आणि उमेद मिळायची नेहमीच. इतकं छान नातं होतं त्यांच.
रेवतीने दरवाजाची घंटी वाजवली. आदराचं स्वागत करत हसत मुखाने नेहाने दरवाजा उघडला. ये ना रेवती बस ,आलेच मी,नेहा बोलली .रेवती निरांजनला सोबत घेऊन आली होती, त्याला कुठे ठेवणार होती घरी एकटं. दोघेही सोफ्यावर विराजमान झाले. अग रेवती हयाला कशाला आणलंस बरोबर, घरी ठेवून यायचंस ना, तेवढाच तुला स्वताःला वेळ मिळाला असता, लिना तिची दुसरी मैञिण रेवतीला म्हणाली. अगं लिना कोणाच्या जिवावर सोडून येऊ गं,कोण समजुन घेत नाही त्याला.हो खरंय तुझं.एव्हाना निरांजन महाराज आई साहेबांचा डोळा चुकवून इतर मूलं खेळत असलेल्या खोलीत पसार झाले होते, आणि आई साहेब सख्यां बरोबर गप्पा मारण्यात गुंतून पडल्या होत्या.
थोडया वेळाने एका मुलाचा मोठयाने भोकाड पसरून रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला,मग कोण रडतय ते बघायला सगळयाच धावतच गेल्या आतमध्ये. सुजित सौम्या चा म
ुलगा रडत होता, निरांजन ने त्याला ढकलून दिलं होतं. रेवती आवर निरांजन ला तु, आणत नको जाऊस नाहीतर, किती वेळा ढकलतो तो सुजितला, नाहीतर रेवती निरांजनला सोबत घेऊन येणार असेल तर मला कोणिही बोलवायच नाही, मी येणार नाही जर हा असा मुलगा येऊन माझ्या मुलाला सारखा ढकलणार असेल , वेडपट कुठला.
काय म्हणालीस तु सौम्या, निरांजनला वेडपट? वेडपट नाहीये तो, आणि कोणा बद्दल काही माहिती नसताना काहीही बोलु नये पण तुला तर माहीत आहे ना ग तरीही तु असं बोलते नशीब समज तुला असा मुलगा नाही, तु तर एक दिवस मानसिक ञास सहन केला नसतास नेहा ताडताड बोलली. का माझं मुल का असं असतं हिनेच काही पाप केलं असेल म्हणुन तिच्याच पदरी पडलंय असं मुल! पुरे झालं तुझं सौम्या ही असली मागासलेली विचारसरणी आहे तुझी? शी! मला लाज वाटते की तु माझी मैञिण आहेस. अगं लहान मुल आहे ते, दहा वर्षाच्या शरीरात पाच वर्षाच्या मुलाच मन म्हणजे निरांजन, आहे तो थोडा मागे मनाने ,पण त्यालाही हक्क आहे सगळंच सामान्य पणे करण्याचा ,पण काय आहे ना सौम्या तुझ्यासारखया बोथट मन आणि मेंदू असलेल्यांना ह्या जन्मात नाही कळायचं, माणुसकी आहे ना ? की ती पण विकून खाल्लीस ? काय करायचं त्या आईने, बाहेर पडूच नये का तुमच्या सारख्या लोकांसाठी ,करतेय ती सगळेच प्रयत्न आणि करून झाले आहेत सुध्दा, आहे तुझ्यात हिम्मत तिच्या एवढं सोसण्याची? आहे? जा घरी जाऊन जेव तुझ्या ,आणि तोंड नको दाखवू परत, मैत्री@संपली. कॉम, कायमचा रामराम. नेहा संतापून बोलली. सौम्या रागाने तोंड वाकडं करून निघून गेली.
रेवतीने तिच्या प्रिय मैञिणच्या खांद्यावर डोकं ठेवून , अश्रूंना वाट मोकळी करून दिली . रेवतीला ती साक्षात देेेवच वाटली .नेहा बोलली , तु असल्या बिनडोक लोकांकडे बिलकुल लक्ष नको देऊ. सोपं नाहीये जे तू करते आहे, सामर्थ्यवान माणसालाच जिवनात अश्या अडचणी येतात आणि तू त्यावर मात केली आहे आणि करशीलच यापुढेही. तुझ्यात सर्वात जास्त धैैैैर्य आणि संयम आहे. हे बघ मी प्रत्येक वेेळेस तुझ्या बरोबर असणंं शक्य नाही, पण मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभी असेन ,तु आवाज दे आणि ही मी आलेच ,आणि नेहा ने हलकं स्मित केलं रेवती कडे पाहून, चला जेवायला घेऊया भुक लागली आहे मला. हो, हो चल, मला पाव भाजी ची भूक लागली आहे आधी तीच वाढ मला, रेवती बोलली. हो हावरट राव तुुुलाच वाढते नाहीतर पोटात दुुुखलच माझ्या आणि दोघीही नेहमी प्रमाणे फिदीफिदी हसत राहिल्या.