मायेची ऊब
मायेची ऊब
मनस्वीच्या घरात नवीन पाहुणा येणार म्हणून सगळे खुप आनंदात होते. तिचे दिवस पूर्ण भरत आले होते. तिला त्रास होऊ लागल्याने त्वरित हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आल. सोबत तिच्या सासु आणि नवरा होता. लाॅकडाउन ची परिस्थिती होती. ती माहेरी जाऊ शकली नाही. तिचे आई आणि बाबा कसतरी परमीशन काढुन आपल्या लेकीला भेटण्यासाठी येणार होते. पण त्याच दिवशी मनस्वीच्या बाबांना खुप ताप होता. दोघांनीही आपली कोरोना टेस्ट केली असता ती पाॅझीटीव्ह आली. आई तर रडायला लागली आता कस जाव ? आणि काय कराव ? तिला मनस्वीची आई म्हणून काळजी होती, तर इकडे मिस्टर पाॅझिटीव्ह म्हटल्यावर तिची आई खचुन गेली. भाऊच ऑनलाईन काम सुरू होत. तेव्हा त्याने आईला धीर दिला. दोघेही बाबांची काळजीपोटी तिथेच थांबले. मनस्वीचा भाऊ पवनने त्याच्या मेहुण्याला फोन करून त्यांची सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी उलट समजून घेतल, पवनने मनस्वीला बाबांबद्दल सांगू नका, ती हळवी आहे सांगितल. मनस्वीचा पती जयेश त्यांनीही आपल्या पत्नीला तिचे वडील कोरोना पाॅझीटीव्ह असल्याच सांगितल. तिनेही परीस्थिती समजुन घेतली. वेळच तशी होती. सासुने तिला आईसारख समजुन घेतल. सगळ सांगितल आणि एक आधार दिला. सगळ ठीक होईल सांगितल. तेव्हा कुठे मनस्वीची हाॅस्पिटीलमध्ये तिला वाटणारी भिती कमी झाली. सासुच्या प्रेमळ शब्दांनी तीला धीर मिळाला. पहीली वेळ असल्याने घाबरत होती. नवराही तिची खुप काळजी घ्यायचा. तो तर तिथेच थांबुन होता.
मनस्वीची कोरोना टेस्ट पाॅझीटीव्ह आली. त्याच रात्री मनस्वीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिला ती आई झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्या सासुला आणि नवर्याला त्या गोड इवल्याशा परीला पाहुन खुप आनंद झाला. त्यांच्या घरात सासुला मुलगीच नव्हती. मनस्वी आणि जयेशला मुलगीच हवी होती. जयेशने तर आधीच सांगितल होत... " मला पहीली मुलगी झाली तर मी स्वतःला खुप लकी समजेन... " देवाने त्याची इच्छा पूर्ण केली होती. एक गोड परी त्यांच्या जीवनात आली होती. त्याला तिला पहील्यांदा बाप म्हणुन हातात घेताना तो क्षण त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रु आले. मनस्वीला त्याने तब्येतीच विचारल, पण ते मोबाईलवर कारण ती पाॅझीटीव्ह होती. तिलाही बर वाटल. त्याच अस हळव होण तिही पहील्यांदा बघत होती. कोरोनामुळे तो बाळ आणि तिची काळजी खुप घेत होता. कन्याप्राप्ती झाल्याचा आनंद त्यांना झाला, परंतु बाळाची तब्येत नाजुक असल्याच सांगण्यात आल. तिला पुढील उपचारांसाठी हाॅस्पिटलमध्ये दहा बारा दिवस काचेमध्ये ठेवल होत. त्यावेळेस मनस्वीला डिस्चार्ज देण्यात आला होता. बाळाला घरी सोडण्यात आल खर पण मनस्वी पाॅझीटीव्ह असल्याने आणि बाळाची तब्येत ठीक झाली होती तरी कोरोनाबाधित मातेपासून बाळाला दुर ठेवण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला होता.
कोरोनाच्या परिस्थितीमध्ये त्या दिवसांत मनस्वीला ती आई झाली याचा आनंद होताच, पण तिच बाळ ती पाॅझिटीव्ह असल्याने तिच्या पासुन दुर होत, तिला तिच्या इवल्याशा परीशी खुप काळजी वाटत होती. एक आई म्हणुन बाळ दुर असल्याच दुःख तर होतच त्यात घरच्यांचे सर्वांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. मनस्वीचे पती, सासु सासरे सगळे हाॅस्पिटल मध्ये ये- जा करत होते. खुप काळजी घेत होते. तरीही ते पाॅझीटीव्ह आले. त्यांना सर्वांना घरीच ठेवण्यात आल होत. आधीच मनस्वी बाळाची आई पाॅझिटीव्ह असल्याने आता बाळाला ठेवायच कुणाकडे सर्वांना चिंता लागुन राहीली होती. काळजी वाटत होती. तेव्हा शेजारी राहणार्या मैत्रिणीला हे समजल की मनस्वी पाॅझिटीव्ह आहे आणि तिच्या नवजात बाळाला तिच्यापासुन दुर ठेवायला सांगितल आहे. तिने लगेच तिच्या घरच्यांशी बोलून मनस्वीच्या बाळाची जबाबदारी घेतली. त्याला मायेची उब दिली. प्रेमाने त्याची काळजी घेऊ लागली. सांभाळू लागली. मनस्वी बरी होईपर्यंत तिच्या मैत्रिणीने आर्याने या मुलीला छान सांभाळल... देवासारख धावून येणार्या आणि कोरोनाबाधित मैत्रीणीच्या नवजात बाळाला या मैत्रीणीने मायेची ऊब दिली. मनस्वीने बर झाल्यावर आर्याचे खुप आभार मानले. आर्याने बाळाला सुखरूप मनस्वीकडे सुपुर्द केल.... तेव्हा दोघींच्याही डोळ्यांत अश्रू उभे राहीले... तेव्हा आर्याने तिला डोळे पुसायला लावले... आणि बाळाला तिच्या हातात दिल्यावर, मनस्वीने बाळाला जवळ घेतल्यावर तिला खूप आनंद झाला.
