Sarita Sawant Bhosale

Others

2  

Sarita Sawant Bhosale

Others

मासिक पाळी आणि जनजागृती

मासिक पाळी आणि जनजागृती

3 mins
1.0K


सुमित्रा नुकतीच शाळा संपवून आणि तीच समाजकार्य संपवून घरी आली तस जयुने प्रश्नांचा भडीमारच चालू केला तिच्यावर.. "अग सुमित्रा किती फिरतेस तू रोज गावभर...आधी शाळा करायची आणि मग हे काम तुझं. तुला वाटत का या बायका तू सांगितलेलं मनावर घेत असतील? त्यांना कळत असेल का काही? यातून त्या बाहेर पडतील अस खरंच वाटतंय तुला?" "जयु का नाहीत बदलणार ग त्या? त्याही बायकाचं आहेत..त्यांनाही त्रास होतो याचा. सांगतात की त्या मला त्यांनाही ही सवय बदलायची आहे पण इतक्या लवकर आणि सहज ते शक्य नसत. अग इतके वर्ष त्या मासिक पाळी आली की कपडाच वापरत असतात. सुरुवातच त्यांची त्या कपड्या पासून होते. मी स्वतः आमच्या गावी राहायचे तेव्हा तो अनुभव घेतलाय. पहिल्या वेळेला आपल्याला कुठे काय कळत असत ग..आईही तेच वापरायची मग मलाही तिने कपडेच दिले.

पाच सहा दिवस ते धुवून धुवून क्षीण जातो ग अगदी. आधीच पोट, कंभर दुखत असते त्यात त्या घरच्या प्रथा... इथे नका बसू,तिथे हात लावू नका पण भांडी आणि कपडे धुतलेली बरोबर चालायचं आजीला. पुढे कॉलेजमध्ये शहरात राहणाऱ्या मुलींकडून हे सॅनिटरी नॅपकिन/पॅड बद्दल कळाल. तेव्हापासून मी तेच वापरायची पण खरं सांगू, ते देखील विकत घ्यायला परवडायच नाही तेव्हा आणि वरून मेडिकल मध्ये जाऊन मागायची लाज. कित्येकदा तर पुरुष व्यक्ती मेडिकल मध्ये असेल तर तसच परत यायचं आणि शेवटी कपडेच वापरायचे. पुढे याविषयावर जनजागृती करायला एक ग्रुप आला होता. त्यांनी अस्वच्छ कपडा वापरायचे धोके,आत पसरत जाणारा तो संसर्ग, जनन आरोग्याविषयी वाढणाऱ्या समस्या आणि अखेरीस स्त्री तिचा जीवही गमावू शकते हे सगळं समजावलं तेव्हा ठरवलं आपणही कपडा वापरायचा नाही आणि दुसऱ्या कोणाला वापरूनही द्यायचा नाही . तेव्हापासून मी त्या ग्रुपशी जोडले गेले आणि मासिक पाळी, सॅनिटरी नॅपकिन्स याबद्दल जनजागृती करते. नोकरी पण ग्रामीण भागातच मिळाली म्हणून बर झालं कारण आज शहरात जवळ जवळ ऐंशी टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात तर ग्रामीण भागात तेच प्रमाण अगदी तीस टक्के एवढंच आहे. आजही इथल्या स्त्रिया घरच्या दबावामुळे म्हण किंवा मेडिकलमध्ये जाऊन उघडपणे मागणार कस या विचारांनीच कपडे वापरतात ज्याचा त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यांना जाऊन अगदी बेसिक पासून सांगावं लागत...समजवाव लागत की ज्यामुळे एक गर्भ वाढतो आपल्या पोटात..ज्याने नवीन जन्म होतो तीच गोष्ट घाणेरडी किंवा लपवण्यासारखी कशी असू शकते. तुम्ही आधी याला मुक्तपणे स्वीकारा, पूर्ण आत्मविश्वासाने डोळ्यात डोळे घालून मेडिकल मध्ये जाऊन पॅड मागा...तो पुरुष व्यक्तीही मोकळेपणाने व्यक्त होईल. त्याच्याही डोक्यातून या गोष्टींबद्दलचा न्यूनगंड निघून जाईल. सरकारने याबाबतीत ज्या काही योजना आणल्यात त्या बदलही त्यांना जागृत करावं लागतं. सरकारने फारच माफक दरात सॅनिटरी पॅड ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी उपलब्ध करून दिलेत हे बऱ्याच जणींना माहीत नसतं ते त्यांना सांगावं लागत. परिस्थिती आता हळूहळू बदलते. सध्याच्या पिढीतील मुली समजूतदार आणि नव्या बदलांना लवकर स्वीकारणाऱ्या आहेत त्यामुळे त्या सॅनिटरी पॅड वापरायला तयार होतात सोबत आईलाही तयार करतात. खर तर भारतातील ग्रामीण भागात अंधश्रद्धा, गैरसमज, स्वछतागृहे, मुलींचं अर्धवट शिक्षण, हुंडाबळी, कमी वयात लग्न अशा कितीतरी समस्या डोके वर काढून उभ्या आहेत. सगळ्यांबद्दल समाज प्रबोधन करणं गरजेच आहे. नकारात्मक विचार न करता हे बदलेलंच या विचाराने मी पुढे जाते आणि स्त्रियांना शक्य तितक्या बाबतीत जागृत करण्याचा प्रयत्न करते. एक दिवस नक्की पूर्णतः या समस्या स्त्रियांच्या आयुष्यातून लोप पावतील." "खरच बोलतेस तू सुमित्रा...या ग्रामीण भागातील स्त्रियांच्या समस्या खूप भयानक आहेत आणि त्यांना त्यातून बाहेर काढण्याच खूप मोलाचं काम तू करतेस. आतापासून मी ही तुझ्यासोबत असेन या चळवळीत😊". सुमित्रा आणि जयु दोघीही स्त्री समस्यांबद्दल जे अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत ते दूर करण्याच्या, त्यांना जागरुक करण्याच्या वाटेवर निघाल्या. जिथे आजची स्त्री मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिन्स, मेन्स्ट्रुअल कप सारखे पर्याय स्वीकारते तिथेच बऱ्याच स्त्रिया जास्त करून ग्रामीण भागात या पर्यायांपासून कोसो दूर आहेत. म्हणूनच शक्य होईल तेवढं प्रबोधन करण्याचा प्रयत्न आपणही करूया आणि या अस्वच्छतेपासून स्त्रीच आरोग्य जपुया.


Rate this content
Log in