Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Aditya Kulkarni

Others


3.0  

Aditya Kulkarni

Others


माणूस सवयीचा गुलाम

माणूस सवयीचा गुलाम

2 mins 22.6K 2 mins 22.6K

साधारणत: 2002-03 चं वर्ष असेल ..

रायगड मिलीटरी स्कूल ला इयत्ता 6वी ला प्रवेश घेतला होता..

शाळा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी आई- बाबा सर्व व्यवस्था लावून गेले होते .

संध्याकाळी डॉर्म मधल्या सगळ्या मुलांशी ओळख करून घेतली . ब-याच जणांची घरच्या आठवणीमुळे रडारड चालू होती .8.30 ला जेवून आल्यावर थोडा टाईमपास केला.रात्री बरोब्बर 10.30 वाजता Lights off ची शिट्टी वाजली .

उद्यापासून एका नवीन आयुष्याला सुरुवात होणार या विचाराने झोप कधी लागली ते कळलंच नाही ..

सकाळी 4.45 ला रेक्टर " चलो , उठो " अशा आरोळ्या देत आणि आमच्या लोखंडी बेडवर त्याची "रामप्यारी " आपटत सगळ्यांना उठवायला आले .

त्या सगळ्या आवाजाने अगदी 20-25 सेकंदासाठी जाग आली पण रोजच्या सवयीमुळे " जरा झोपू अजून 5 मिनिटं " असा विचार करून डोळे आपोआपच मिटले गेले " .

अचानक जाग आली ...

नेमकं काय झालं माहित नाही , पण डोळे आणि मेंदू खाडकन उघडले गेले .

आजूबाजूला बघितलं तर सगळे जण आपापले कुल्ले पकडत इकडून तिकडे सैरावैरा पळत होते ....

आणि त्या क्षणी माझ्या पार्श्वभागातून जोराची कळ आली आणि मी पण त्यांच्या सारखाच पळायला लागलो होतो ...

कारण एकदा सुचना देऊनही आम्ही उठलो नव्हतो म्हणून दुसऱ्या वेळेला रेक्टरने झोपलेल्या सगळ्यांच्या पार्श्वभागावर त्याच्या

"रामप्यारी " काठीचा एक सणसणीत तडाखा लगावला होता , त्याचीच ती कळ होती .

त्यानंतर शाळा संपेपर्यंत एकदा ही मी सकाळी लवकर उठण्यावरून मार खल्ल्याचे आठवत नाही ..

कारण शिट्टी वाजण्याअगोदरच 5 -10 मिनीटे आधी आपोआप जाग यायची ..

हे सगळं सांगायचा उद्देश एवढाच की ....

आजही Emergency कारणास्तव ( मंगळवार , गुरुवार ,शुक्रवार ....कारण 7.40 ला मला लेक्चर सुरु करावं लागतं. ) सकाळी लवकर उठायचं असेल तर मी तो मार आठवून झोपतो आणि सकाळी आपोआप 4 ला जाग येते .


Rate this content
Log in