" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

4.0  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

माणूस पैसा खातो..

माणूस पैसा खातो..

1 min
275


मी लहान असताना वाचलं, ऐकलं होतं की, माणूस पैसा खातो... तेव्हा मला त्यातले काही कळत नव्हते.वाटलं असे कसे शक्य आहे.. पुन्हा वाटलं..सर्कस मधले प्राणी शिकवल्या वर काही पण करतात.. तसं असेल एखाद्या सर्कशीत शिकलेल्या प्राण्यांप्रमाणे..

 पण आज पहातोय, विचार करतोय, डोळ्यांनी बघतोय, रोज ऐकतोय...खरंच माणूस पैसा खातोय...! नुसता खात नाही... किती ही खातोय.. या खात्याला मर्यादा तरी आहे का.. नाही या खाण्याला अजिबात मर्यादा नाही.. किती मोठी बिहारी आहे ही.. इलाज नसलेली.. इलाज करावाच लागेल या पैसे खायच्या बिमारीला...लय लय भारी बिमारी बाबा ही माणसाला...

नुसतं खातोय कुठे कशाची पर्वा न करता,लाज, अक्कल,शरम सारे विसरून.. हैवान,पशू बनुन प्रसंगी माणसं मारुन, लोकांना लुटून... नातीगोती माणूसकी कशाचीही पर्वा न करता.. माणूस पैसा खातोय...


कितीही उपाय करा..लई लईच वाईट ही बिमारी... पैसा खाणारा माणूस पैसा खाणे काही सोडत नाही... रोज ट्रॅप होतात, मोठं मोठे मासे गळाला लागतात..ईडीची कारवाई होते,सस्पेंड होतात.हजारो , लाखो रुपये पगाराची नोकरी गमावतात पण बिमारी ते बिमारीच... काही ही करा.. काहीही होवो पण माणूस पैसा खातो म्हणजे खातोच...

खरंच काही नवल नाही... पुन्हा म्हणू नका माणूस पैसा कसा खातो...

अहो कसा खातो म्हणजे काय...ती बिमारी आहे...मोठी बिमारी खरंच शपथ घेऊन सांगतो , आता तरी विश्वास ठेवा.. मी पाहिलं आहे.. खरं आहे खरं.." माणूस पैसा खातो...!"


Rate this content
Log in