Supriya Jadhav

Others

4.9  

Supriya Jadhav

Others

'माझ्या लिखाणामागची प्रेरणा'

'माझ्या लिखाणामागची प्रेरणा'

2 mins
561


चांगलं लेखन येण्यासाठी उत्तम वाचन असायला हवं. ही वाचनाची आवड माझ्या वडिलांनी मला लावली. मी सातवीत होते. चाफळच्या श्री समर्थ विद्यामंदिरात शिकत होते. तेव्हा वक्तृत्व स्पर्धांच आयोजन केलं होतं. मी स्पर्धेत भाग घ्यावा म्हणून माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहित केलं. महात्मा गांधींविषयी बोलायच होत.तेव्हा माझ्या शिक्षक असलेल्या वडिलांनी मला विविध पुस्तकातून गांधिजींविषयी माहिती वाचायला सांगितली व त्यावरून भाषण कसे लिहून काढायचे ते शिकवले.व ते सादर कसे करायचे ते ही सांगितले.या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला.त्यामुळे माझा हुरूप वाढला आणि वक्तव्यात मी चांगली पारंगत झाले.

         चाफ‌ळ गावात लायब्ररी होती.सातवीत असल्यापासून मी त्या वाचनालयातील पुस्तके वाचली.जास्त बालसाहित्य वाचलं आणि तेव्हापासून मला वाचनाची चांगली आवड लागली ते आजपावेतो.अन या पुस्तकांनी माझ्यावर सुसंस्कार तर केलेच त्याबरोबर माझे लेखन कौशल्य ही विकसित झाले.

         निबंध लिहण्यासाठी माझ्या वडीलांनी मला मी हायस्कूलमध्ये होते तोपर्यंत मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी उत्तम निबंध लिहू शकत होते. वर्गात शिक्षकांनी एखाद्या विषयावर निबंध लिहण्याचा गृहपाठ दिला तर इतर मुलीमुले निबंधाच्या पुस्तकातून लिहून आणत ,मी मात्र स्वत: निबंध लिहीत असे. कधीकधी माझी निबंधाची वही वर्गभर फिरत असे.

       काॅलेजमध्ये प्रवेश केल्यावर माझे काॅलेजच्या मासिकात ही लेख छापुन आले.बी.एड् ला असताना मी 'वैनतेय' या काॅलेजमधल्या मासिकाची संपादक होते. तेव्हा शिक्षक ही विद्यार्थ्यांच्यातले गुण हेरून प्रोत्साहन द्यायचे.'सत्यवादी नावाचा एक पेपर माझा भाऊ आन्ना घरी आणायचा. त्यापेपर मध्ये पुरवणीत विवीध विषयावर लेखन मागवले जायचे त्यात मी स्वत: रचलेले उखाणे प्रसिध्द्.

      पुढे लग्नझाले, मुलं झाली अन् मुलांमध्ये रमूण गेले.लिखाण थांबले. आईही मला लिखाणासाठी सतत प्रेरणा द्यायची पण क्वचितच हातून लिखाण घडायचं.

           मी तेव्हा चिपळूनला रहात होते.'दैनिक सागर' हा स्थानिक पेपर तेव्हा घरी येत होता.त्या पेपर मध्ये माझे काही लेख प्रसिध्द् झाले,पण जास्त लेखन हातून घडले नाही कारण मी माझ्या मुलींवर जास्त लक्ष केंद्रित केले होते.

   ‌ मी २००६ला पनवेल मध्ये रहायला आले , मुली मोठ्या झाल्या होत्या. त्यांच्यातही माझी ही कौशल्य उतरली आहेत.त्यांना माझं कौशल्य माहित होतं.पण मीच लिखाणाला वेळ देत नव्हते.

     एके दिवशी मी काहीतरी तशाच सिरीयस कारणाने उदास होते.माझ्या मोठ्या मुलीने हे सगळे ओळखले अन् तिनेच माझ्या मनाची समजुत आईच्या मायेने घातली , अन् "तू किती छान लिहतेस ,पुन्हा एकदा तू लिहायला सुरुवात कर" असे सांगून मला लिखाणाची प्रेरणा दिली.अन अशा प्रकारे माझा सोनचाफा ब्लॉग सुरू झाला. माझ्यातल्या लेखन कौशल्याला खर्या अर्थाने पुन्हा सुरुवात झाली ,माझी मोठी मुलगी शरयू ने दिलेल्या प्रेरणेमुळे.बऱ्या

पैकी लिहतेय,वाचकांच्या पसंतीस. माझे लेख पडताहेत.अन मला ही लिखाणातून मनाला समाधान मिळतंय.तेच जास्त महत्त्वाचं असं माझ्या मुली,माझे पती म्हणतात,कौतुक करतात अन् हातून लिखाण घडते.माझ्या ब्लॉगचे पहिले वाचक माझे पती असतात.

    मला लिखाणाला पहीली प्रेरणा माझ्या वडिलांनी दिली.नंतर आई,शिक्षक आणि मधल्या बर्याच वर्षाच्या काळाने आता माझी मुलगी शरयू ने प्रेरणा दिली अन् हातून बर्यापैकी लिखाण झालंय. पुन्हा एकदा गत चार वर्षांपासून लिहतेय.

    वाचकांना हा लेख नक्की आवडेल अशी आशा करते.‌

(विवीध साईट वर ब्लॉग लेखनाच्या स्पर्धा असतात. पण मी माझ्या कुटुंबियांना पहिले प्राधान्य देते.अन त्यातून वेळ मिळेल तेव्हाच लिहीते.मी मोठी लेखिका नाही,पण लेखनाच्या छंदातून मला मानसिक समाधान मिळत.हेच मला जास्त महत्त्वाचं वाटतं.)


Rate this content
Log in