Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Mahesh V Brahmankar

Others


2  

Mahesh V Brahmankar

Others


माझी कहाणी

माझी कहाणी

3 mins 122 3 mins 122

1 सुरुवात करावी ती बालपणापासून, जन्म चोपडा तालुक्यातील हातेड या मामांच्या गावी झाला.

2 मुळगाव दस्केबर्डी ता चाळीसगाव, वडिलांचा, व आजोबांचा व्यवसाय किराणा व शेती.

3 शाळेत इयत्ता 1ली पासुन तर 11 वी पर्यंत वर्गात परीक्षेत सर्वप्रथम आलो, व 12 वीला केंद्रात सर्वप्रथम आलो. त्यांनतर B Pharm व MBA पर्यंत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. म्हणून अभ्यासात हुशार व स्वभावाने काटकसरी होतो.

4 स्वभावाने शांत होतो पण परिस्थिती वर व संकटांवर मात करण्यासाठी मात्र काही वेळेला शिघरकोपी पण झालो.

5 वेळेनुसार व परिस्थिती नुसार माणसाने बदलायला हवे, हेही तेवढेच खरे.

6 आई वडील, 1 भाऊ, 1 बहीण, पत्नी व 2 मुले असा परिवार

7 आई वडील यांनी अतोनात कष्ट करून शिकवले कारण तेव्हा परिस्थिती सर्व साधारण होती. व आजही आम्ही एकमेकांसाठी उभे आहोत.

8 पत्नीनेही मला माझ्या सावली सारखी साथ दिली.

9 आता नाशिकला 7 वर्षांपासून स्थित असुन औषधाच्या कंपनी मध्ये नोकरी करत आहे.

10 आयुष्यात यश, अपयश दोघे सारख्या प्रमाणात पाहिले.

11 मला सहजासहजी काही मिळाले नाही,प्रत्येक गोष्टीत संघर्ष करावा लागला, व संघर्षात्मक मी त्यात विजय ही मिळवला.

12 संघर्षात्मक विजय हा जेवणातल्या लोणच्याप्रमाणे असतो, ज्याला पाहिल्यावर माणसाच्या तोंडी पाणी सुटते व ते अजून खावेशे वाटते, त्याच प्रमाणे संघर्षात्मक विजय हा नेहमी आपल्याला हवा हवासा वाटतो व आपण पुढच्या विजयासाठी प्रयत्नशील राहतो, कारण तो विजय आपल्याला सहज मिळालेला नसतो.

13 नोकरी व शिक्षणासाठी, धुळे, जळगाव, मलकापूर, मुंबई, सोलापूर,औरंगाबाद, नाशिक, खोपोली या सर्व भागात फिरलो, म्हणून वेगवेगळ्या अनुभवातून खूप काही शिकलो.

14 नोकरी करता करता छंद (Hobby) ही जोपासत आहे, कविता, सुविचार, लेख, चित्रपट कथा, गाणी, शेर इत्यादी प्रवासाच्या व रिकाम्या वेळेस लिहीत असतो.

15 शिवा बागुल मराठी दिगदर्शक निर्मित एस के आर्ट्स चा सदस्य आहे.

16 स्वप्न बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवावीत, माझी स्वप्न काही पूर्ण झाली काही बाकी आहेत.

17 काही मिळवण्यासाठी मी रात्रीचा दिवस करू शकतो तो माझा सगळ्यात चांगला गुण, व तोच गुण माझी उरलेली स्वप्न पूर्ण करेल असे मला वाटते.

18 जिद्द, चिकाटी आणि मेहनत या तीन गोष्टी माझ्या यशाचे सूत्रधार आहेत.

19 b Pharm final year ला मी class representative असताना university चे 9 credit points ,प्रत्येकाला मिळवून दिले, व त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना कुणाला पासिंग साठी तर कुणाला स्कॉरिंग साठी झाला.तसेच college opening पहिलीच batch होती म्हणून कॉलेज ला ही भरपूर अडमीन कामांसाठी मदत केली

20 नेतृत्व गुण पहिल्या पासुन उपजत व त्याचा फायदा सगळ्यांसाठी पुरेपूर करायचा प्रयत्न वेळोवेळी करत गेलों.

21 स्वाभिमान, आत्मविश्वास व माणुसकी हे माझ्या आयुश्याचे तत्व.

22 संकट माझ्या आयुष्यात खुप आली पण त्यांच्या वर मात करत आजही जगतो आहे तेही ताठ मानेने.

23 जगण्यासाठी श्वास हवा, यशासाठी आत्मविश्वास हवा, व कुणाची तरी साथ मिळण्यासाठी विश्वास हवा.

24 जे काही मिळाले त्यात खुप समाधानी आहे, म्हणून खुप सुखी आहे.

25 तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार , या पंक्तीने आयुष्याच्या वाटेवर चालत राहिलो.

26 चांगल्या रस्त्याला गतिरोधक व चांगल्या माणसाला विरोधक असतात म्हणून त्यातही विरोधक हे आपल्याला कायम जागरूक ठेवतात, व आपल्या यशात जेवढा परिवाराचा, मित्रांचा तेवढाच विरोधकांचाही वाटा असतो म्हणून खचलो नाहीं लढत गेलो.

27 एवढे सांगून माझी इथपर्यंतची कहाणी संपवतो,


सगळ्यांना सांगु इच्छितो की संकटाना घाबरू नका लढत रहा यश तुमचेच,मला रेडिओ पांझरा ने माझी कहाणी या उपकमा्द्वारे मला लिहिण्यास संधी दिली, धन्यवाद.


Rate this content
Log in