माझी छोटीशी डायरी - भाग्यवान
माझी छोटीशी डायरी - भाग्यवान
माझी छोटीशी डायरी - भाग्यवान
दिनांक -: १२ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
तक्रार करणे आणि आयुष्यामध्ये कमजोरी शोधणे, खूपच सोपं काम आहे आपल्यासारख्या लोकांसाठी. ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टींसाठी रडत बसणे. आणि ज्या गोष्टी आहेत त्यांचा कधीच आपण आदर करत नाही आणि कधीच आनंदी सुद्धा राहत नाही.
पण आज खरंच मी देवाचे मनापासून आभार मानणार आहे. ह्या कठीण काळामध्ये माझ्याकडे राहायला घर,पोट भरून जेवायला आणि जीवन चालवण्यासाठी कामधंदा हे सर्व आहे. मी आणि माझा परिवार सुरक्षित आहे. जगणं अजून सुंदर बनवण्यसाठी माझ्या घरात खूप सुविधा आहेत. ह्याच्याहून आयुष्यात अजून काय पाहिजे मला, काहीच तर नाही.
लोकांना कोरोनाशी लढताना बघतो, तेव्हा मला माझ्या बेकार तक्रारीची लाज वाटते. कितीपण गरीब बहीण भाऊ असू दे, एक जागी कोरोना पासून मरण्याची भीती आणि दुसऱ्या जागी उपाशीपोटी मरण्याची भीती. आपल्या सगळ्याकडे सगळ्या सुविधा आहे, आणि ज्याचे परिवार कोरोनाशी लढून पण सुरक्षित आहे. ते सगळे खूप भाग्यवान आहेत.
तक्रारी कितीही कमी असल्या आपल्या आयुष्यात, आराम तेवढाच मिळतो.
धन्यवाद
सागर भालेकर