लॉकडाऊन डायरी #17
लॉकडाऊन डायरी #17


प्रिय डायरी,
आज सतरावा दिवस. आज लवकर जाग आली. आज माझा नाश्ता मीच तयार केला. टीव्हीवरच्या बातम्या पाहत बसले. थोडीशी चित्रकला केली. आणि नंतर मोबाईल होताच साथ द्यायला.
दुपारी पुन्हा जेवण. थोडा टीव्ही आणि झोप. आज मी झाडांना पाणी दिलं. भाजीची गाडी आली होती. मग आईने भाजी आणली आणि स्वच्छ धुवून ठेवून दिली. आज नातेवाईकांचे खूप फोन येत होते. अभ्यासाचं पुस्तक बऱ्याच दिवसांतून आज हातात घेतलं. पण पुस्तक मात्र त्याचं काम विसरलं नाही. उघडलं की झोप आणण्याचं!
रात्री पुन्हा मी भाजी बनवली. मग आमच्या गप्पा रंगल्या. शतपावली झाली. आता झोपायची तयारी. शुभ रात्री.