SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

लोक काय म्हणतील (भय

लोक काय म्हणतील (भय

3 mins
878


काव्या अकरावीतली मुलगी.तिची आज सायकॉलॉजिस्ट शी अपॉइंटमेंट आहे.. ती आई बाबांसोबत तयार होऊन जाते.. एक फॉर्म वर माहिती भरल्यानंतर तिघांना डॉक्टर आत बोलावतात.. तर डॉक्टर प्रथम काव्याला विचारतात काव्या तु कोणत्या वर्गात आहे ती सांगते अकरावीला.. कोणती ब्रांच तुझी. काव्या सांगते विज्ञान.. तुला काय व्हायचंय.. मला काहीही कळत नाही. मला कशातच इंटरेस्ट वाटत नाही.. मला सर्व काही निरर्थक वाटते.. माझे कुणी मित्र मैत्रिणी नाहीत. मला वाटते आपण जगावे तरी कशासाठी.. काहीही करण्याची इच्छा होत नाही सतत मरून जाण्याचे विचार मनात येतात.. मला वाटते शेवटी काहीही करून मरायचेच आहे तर मग आताच मरून जावे.. डॉक्टर म्हणाले बेटा मरण एव्हडे सोपे नाही मरणानी कुठलेही प्रॉब्लेम सुटत नाही.. मरणानंतरही एक आपल्याला कदाचित काही गोष्टीचा सामना करावंच लागतो. आपल्याला देवानी काहीतरी चांगल्या उद्देशाने जन्म दिला. तो भरभरून जगायला पाहिजे.. काव्या ढसाढसा रडायला लागते.. डॉक्टर तिला समजावतात व दुसऱ्या दिवशी फक्त तिच्या आई बाबांना बोलावतात.. आणि तिचा प्रॉब्लेम विचारतात.. आई बाबा सांगतात की आम्हाला दोन मुले आहे सौम्या आणि छोटा भाऊ. लहानपणापासून काव्या खुपच अबोल आहे. तिला कुणी मैत्रिणी नाहीत ती कुणाशी बोलत नाही ती लोकांशी बोलायला माहित नाही का पण घाबरते. आम्हाला वाटले हिचा स्वभावच आहे म्हणून आम्हीही जास्त तिला बदलण्याचा प्रयत्न केला नाही.. ती शाळेत जाते आणि एकटी घरात बसते कधी बाहेर खेळायला जात नव्हती. अभ्यासात बरी आहे पण मेहनती नाही त्यामुळे खुप चांगले नाही पण बरे मार्क्स असायचे.त्यामुळे विज्ञान शाखेला प्रवेश दिला पण आता म्हणते मला शिकायचे नाही कॉलेज मध्ये जायचे नाही.. मला नाही आवडत.. कारण विचारले तर सांगते की मला अबोल घाबरट असल्या मुळे मैत्रिणी नाहीत म्हणून मी एकटीच राहते आणि मला सतत वाटते की सर्व लोक माझ्यावरच हसतात मग मला न्यूनगंड येतो.. तिला खुप समजावले की कुणाला घाबरायचे नाही स्वतः हुन बोलायचे पण ती आमचे ऐकत नाही..मग डॉक्टर दुसऱ्या दिवशी फक्त काव्याशी बोलतात तेव्हा तिला तिचा प्रॉब्लेम विचारतात.

तर ती सांगते की मी शाळेत लहान असल्यापासूनच मला लोकांशी बोलायची भिती वाटते सतत वाटते की आपण काही बोललो तर लोक काय म्हणतील हसतील काय हे मला मी तीन चार वर्षाची पहिल्यांदा शाळेत गेली तेव्हा पासूनच वाटते.. म्हणून मी शाळेत कुणाशीही न बोलता घाबरून राहायची.. खुप शाळेत एकटे वाटायचे पण तरी जायची.. पण असे तुला का वाटते की तु काही बोलली तर लोक हसतील घरी मी लहानपणी आधी काही बोलली तर आईबाबा म्हणायचे बघ तुला तु अशी लोकांसमोर बोलली तर हसणार जोरानी रडले तरी म्हणायची लोक हसतात गप्प बस तेव्हा पासून माझ्या मनात भिती बसली. शाळेत मुलींचा ग्रुप असायचा पण मी एकटीच रहायची.. कुणीही मला वाढदिवसाला सुद्धा बोलवायचे नाही. मी कुठल्या ही कार्यक्रमातही भाग घेत नसे रस्त्यावरून शाळेची रॅली काढली तर मी एकटीच रांगेत असायची माझ्या बरोबर कुणीही चालायचे नाही. मी शाळेतील दिवस काढले पण आता मी कॉलेज मध्ये नाही असा अपमान सहन करू शकत नाही..

डॉक्टर तिला म्हणाले पहिली गोष्ट तु लोकांचा विचार करणे सोडून दे.. तुला जे वाटते तेच करायला शिक. आणि कुणी हसतील वगैरे हा विचार सोड हसले तर हसु दे.. बिनधास्त रहायला शिक.. लोक हसले तुला वाटते त्याप्रमाणे तरी काय होईल काहीच नाही हसतील दमून जातील गप्प बसतील तु लोकांचा विचार करशील तर नुकसान तुझेच होईल तुला ज्याच्याशी जसे बोलायचे तसे बोल नसेल बोलायचे तर नको बोलू पण आपण बरोबर बोलतोय की चुकीचे आणि आपण नाही बोलले तर हा विचार सोड चांगला अभ्यास कर.. एखादी हॉबी जप.. तर तुला समजेल की आयुष्य किती सुंदर आहे डॉक्टरांनी तिला मेडिटेशन ही शिकविले आणि तिच्या आई बाबांनाही तिची मैत्रीण बनून तिला समजावून घेण्याचा सल्ला दिला..

काव्याने डॉक्टरांचा ऐकावे जनाचे करावे मनाचे हा मंत्र आत्मसात केला लोकांचा विचार न करता मैत्री करेल की नाही ह्याचाही विचार न करता बिनधास्त अभ्यास करायला लागली.. फावल्या वेळात चित्रकलेचा छन्द जोपासला.. आणि पुढे अभ्यास करून एम . बी. बी एस डॉक्टर झाली...

डॉक्टरांचा मोलाचा मंत्र ऐकून ती एक प्रसिद्ध डॉक्टर झाली..

ऐकावे जनाचे करावे मनाचे हा मंत्र अनुसरू लागली...


Rate this content
Log in