ललित
ललित
माझ्यासमोर मुठा नदी शांत पणे वहात आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हाच्या किरणांनी न्हावून निघालय सूर्याची कोवळ्या किरणांची पिलावळ नदीत वारयाच्या झोतासह सैरभैर नाचत आहेत घारी बगळे कावळे पाण्यावर भिरभिरत आहेत मधूनच एखादी घार आपले विस्तीर्ण पंख पसरवून चोचीने आपल भक्ष मिळवून पुन्हा आकाशात गिरकी घेत आहे.परंतु बगळयांच्या झेपेला मर्यादा आहेत ते पदीपात्रातच भोवताली घिरट्या घालतात मधुनच पोपटाचा थवा आपल्या गोतावळ्यासह नदिपलयाडच्या वैकुंठाभोवती असलेल्या प्रचंड विस्तारालेल्या झाडीतुन ऊठून आकाश मार्गाने चाललाय कुठे चालले असतील हे सारे? तो तेजाचा गोळा हळू हळू वर सरकतोय तसतशी नदीची काया पलटत आहे दोन राखाडी रंगाच्या सुंदर बगळ्यांची जोडी कितीतरी वेळ एकाच जागेवर घिरट्या घालत आहे एक घार केव्हाची किनारयावर शांत पणे बसली आहे का ?बसलीय ती काय विचार करत असेल पाण्याच्या पृष्ठभागावर आपलं सावज येतय आणि कधी मी त्याला फस्त करतेय या विचारात नसेल ना ?सुर्याची किरण आता तापली आहेत त्याच्या झळांनी पाणि ऊष्ण होऊ घातले की काय?पक्षांची लगबग कमी का झाली?
नदीपात्रात मी कीती दिवस रोज येते रोज नव काहीतरी पहायला अनुभवायला मिळत ईथ .आनंद, समाधान, मनशांती, मिळते मुक्त मोकळं हलक वाटत जगाच्या अफाट पसारयातून स्वताःची सुटका झालयासारखं स्वतंत्र वाटतं. किती सुंदर आहे हा परिसर पलीकडे दाट झाडात वसलेल वैकुंठ स्मशान धाम या जगातल्या शेवटाची व अज्ञाता च्या सुरुवातीची आठवण करून देतं मुकतीतली शक्ती दाखवून देतो.पाण्याच्या लहरीसह प्रकाश किरणही वाहून नेतेय का हि नदी किती आणि काय काय सामावलेय तिच्यात जिवंत माणसांच्या जगातला राडारोडा,घाण कचरा सारंच तो माणुस मेलयावर त्याची हाड अन राखसुदधा हिन आपल्या पोटात सामावून घेतली किती गाळ सामावुनही तीन वहान नाही सोडलं अखंड वहातेय वहातच आहे युगानुयुगे त्या सागराला जाऊन मिळायचय ना तिला त्याच्या ओढीपुढे तिला सार तुच्छ नगण्य शुन्य भासतय का?आपल्या ऊदरात कित्येक जींवाना आसरा दालाय तीन असंख्य जीव तीच्या आधारानं जगत आहेत जीवः जीवेतः जीवनमः हि उक्ती सार्थ करत आहेत अन्न साखळी मजबुत करत आहेत .काही वेळातच पक्षांची हालचाल मंदावली नदीच पात्रही शांत झालं सुर्य ही ऊदास होऊन कोवळी किरण काळवंडली .पक्षांचा किलकिलाटही,हळू वार झाला एकदम गलगलाट थयथयाट करणारया पक्षांना ही काय झाले अचानक कळेना एक घार केव्हाची एकटीच पाण्यावर घिरट्या घालतीये तीही मंदगतीने तीचा साथीदार कि तो कोण कळेना परतु सोबत घिरट्या घालायच सोडुन नदीच्या कठडयावर केव्हाची बसलीय शांत पणे पाण्यावर एकदोन घिरटया घेउन तिचा साथी तिच्याजवळ जाऊन काहीतरी इशारा करत आहे कदाचित् रूसलेलया तिला मनवत असावा कावळे,बगळे दिसेनाशे झाले पोपटाचा एक मोठा समुह पुन्हा ऊंच आकाशातुन हजारोंच्या संख्येने रोज एलतीरावरून पैलतिराकडे गेला मग काय झाले कळेना कि आज त्यांचा कापिला लवकरच व विभकतपणे निघाला होता का ?अन्ना च्या शोधात मी वांरवार नदिपलयाडच्या वैकुठाभचवतीच्या दाट झाडीकडे पहात तिथेच माझी काकू माझी आई, माझे अप्पा, माझे वडील,आणि माझा भाऊ माझा मित्र तिघांनाही तिथ विसावा दिला होता कायमचा! एक दिवस मी ही ........मृत्यू एक शाश्वत सत्य नाही तेच सत्य अंतिम आदी दोन्हीचे सत्य
