SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

लक्ष्या (लक्ष्मीकांत बेर्डे )

लक्ष्या (लक्ष्मीकांत बेर्डे )

1 min
206


मुंबईत 26 ऑक्टोबर 1954 मध्ये लक्ष्मीकांत बेर्डेचा जन्म झाला. त्याला आपण लक्ष्या म्हणून ओळखतो. त्याला पाच मोठी भावण्ड होती. लक्ष्मीकांतला शाळेत असल्यापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्याने सुरवातीला लॉटरी ची टिकिट विकण्याचे काम केले.

नंतर काही वर्ष त्याने मराठी साहित्य संघात काम केले. तिथे काम करत असतानाच लक्ष्या ने टूर टूर ह्या व्यावसायिक नाटकात काम केले. त्यांनतर लेक चालली सासरला ह्या चित्रपटात काम केले. नंतर लक्ष्याने मागे वळून बघितले नाही. त्याने अनेक चित्रपटात कॉमेडी भूमिका मुख्य रोल मध्ये केल्या. त्याची अशीही बनवाबनवी चित्रपटात चार मित्रांना घर भाड्याने घेण्यासाठी फक्त विवाहित जोडप्यानाच घर भाड्याने मिळते त्यासाठी त्यात दोन मित्र स्त्री चा वेष धारण करून विवाहित होण्याचे नाटक करतात. त्यात तो लक्ष्मी ची स्त्रीच्या भूमिकेत वावरतो आणि घरी स्त्री आणि बाहेर पुरुष अश्या दोन कॉमेडी भूमिका खुपच लक्षात राहण्यासारखी आहे. आणि त्याकाळात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ह्या दोघांचेच मराठी चित्रपट सृष्टीत अभिराज्य होते.

त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत मैने प्यार किया ह्या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. आणि 90च्या दशकात त्याने बऱ्याच हिंदी चित्रपटातही काम करून एक आपली ओळख निर्माण केली. लक्ष्याने हम आपके है कौन, अनाडी, साजन अश्या बऱ्याच सुपर हिट हिंदी चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. हिंदी व मराठीत त्याने कॉमेडी भूमिका करून लोकांना खुप हसविले. असा हा सर्वांना चित्रपटातून पोट धरून हसविणारा लक्ष्या वयाच्या 50 व्या वर्षी किडनी च्या आजाराने 2004 मध्ये जग सोडून गेला व सर्वांना हुरहूर लावून गेला. 


Rate this content
Log in