Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

SWATI WAKTE

Others


3  

SWATI WAKTE

Others


लग्नगाठ

लग्नगाठ

1 min 306 1 min 306

जन्माच्या गाठी ह्या स्वर्गात निर्माण झालेल्या असतात असे म्हणतात.. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला तरी ज्याच्याशी वर गाठ बांधलेली असते तोच जोडीदार आपल्या आयुष्यात येतो असे असले तरी गाठी बांधताना काही गोष्टी प्रकर्षाने बघायला पाहिजे त्या म्हणजे समजूतदारपणा, निर्णय क्षमता आणि आपला जोडीदार हा आपण कसे आहे हे लक्षात घेऊन निवडायला पाहिजे. दुसऱ्याशी तुलना करून जोडीदार निवडणे मूर्खपणाचे आहे...


अशीच ही कथा पूजाची आहे. पूजा एक साधारण दिसणारी, शिक्षणात साधारण असलेली मुलगी असते आणि तिचे लग्न हे दिसायला देखणा, हुशार, चांगल्या हुद्द्यावर असणाऱ्या महेशशी होते.. पूजाला तिच्या नवऱ्याचा अभिमान असतो पण जेव्हा लोक त्याला चांगले म्हणतात आणि त्याची बायको म्हणून हिच्याकडे हीन भावनेने बघतात तेव्हा तिला न्यूनगंड निर्माण होतो. आणि महेशविषयी संशयी भावना निर्माण होते..सतत ती त्याचा संशय घेते.. त्याचा फोन चेक करते आणि विनाकारण वाद करते.. त्याला मित्रांसोबतही वेळ घालवू देत नाही.. ह्याचा परिणाम महेशला घरी येण्याची इच्छा होत नाही तो जास्तीत जास्त बाहेर राहायला लागतो. आणि एकदा असाच विचार करत घरी येताना त्याचा अपघात होतो आणि त्याचा अर्धा पाय कायमचा तोडण्याची वेळ येते..


पूजाबद्दल त्याच्या मनात खूप द्वेष निर्माण होतो.. पूजाला तिच्या वागण्याचा पश्चाताप होतो पण आता वेळ निघून गेली असते आणि आता ती महेशची पूर्ण काळजी घेत झालेल्या गोष्टीविषयी माफी मागते.. महेश तिला माफ करतो पण कायमचा अपंग होऊन त्याला न केलेल्या गुन्ह्याची किंमत चुकवावी लागते...


Rate this content
Log in