Tukaram Biradar

Children Stories

2  

Tukaram Biradar

Children Stories

लालच

लालच

2 mins
73


विजयपुर नगरीचा राजा यशोधन नावाचा राजा राज्य करीत होता. तो अत्यंत प्रामाणिक व दयाळू होता. त्याच्या पराक्रमाची कीर्ती सर्वदूर पसरली होती.त्याच्या राज्यात सोने, चांदी, नाणे व संपत्ती भरपूर होती.एवढे असूनही राजाचा लोभ काही कमी होत नव्हता.

    तो देवाची खुप भक्ती करत होता. एके दिवशी राजा यशोधन देवाची तपश्चर्या करण्याचा विचार केला. आणि तो ती तपश्चर्या केली. देवाची त्याच्यावर क्रपा झाली. देव पावला. देवही त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाला. त्या राजाला देव म्हणाला, " मी तुझ्या तपश्चर्यवर खुश आहे. तुला काय हवे ते मागे".राजा यशोधनाचा मुळ लोभी स्वभाव जागृत झाला.

     तो परमेश्वराला म्हणाला, " हे प्रभू , मला असा वर दे की मी ज्या वस्तुला हात लावीन ती वस्तू सोन्याची होऊ दे. " देव तथास्तु म्हणाला. आणि निघून गेला.त्याला हवा तो वर मिळाल्याने तो अतिशय खुष झाला. तो आपल्या तलवारीला स्पर्श केला ती तलवार सोन्याची झाली. तो खुप खुष झाला. .    तो अनेक वस्तू ला हात लावत होता ते ही सोन्याची होत होते. मग नकळत त्याचा हात त्याच्या पत्नीला लागला तर ती पण सोन्याची झाली. मग तो चिंतेत पडला. काय करावे हे त्याला कळेना. तो काय करावे म्हणून मुलाला बोलावले मुलगा जवळ येऊन त्याचा हात धरला आणि तो ही सोन्याचा झाला.

    तो परत चिंतेत पडला. पुन्हा देवाची आराधना करु लागला. देव प्रसन्न झाले व म्हणाला तुला काय हवे ते मागे. तेव्हा तो ही हकीकत सांगितले व मला पूर्वीप्रमाणे कर. तेव्हा तथास्तु म्हणून देव निघून गेले. पुन्हा त्याची पत्नी व मुलगा अगोदर सारखे झाले..   


Rate this content
Log in