क्वालिटी टाईम
क्वालिटी टाईम
समिधा पूर्ण पने डिप्रेशन मध्ये गेली होती,खरं तर ती डिप्रेशन मध्ये जाईल असं काही घडलंच नव्हतं.समिधाचा नवरा शेखर खूप काळजी करत होता.... तो एक एक गोष्ट आठवून बघत होता.... आपलं काही चुकलं का? आपण समिधाला कधी काही दुखावलं का? पण त्याला कुठेच चुकीचं वागल्याचे आठवत नव्हते......
शेखर आणि समिधाचं लग्न म्हणजे अगदी रीतसर कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमाने सुरु झालेलं....... दोघेही लग्न ठरल्यावर एकमेकांना भेटले.... समिधा तशी दिसायला खूप सुंदर होती, गोरीपान, सूंदर हरिणी सारखे डोळे, लांबसडक केस शेखर तर पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला होता....समिधालाही अगदी हवं तसं स्थळ मिळालं होतं त्यामुळे ती ही खूप खूष होती.... शेखर अगदी गावातील धनाड्य लोकांपैकी एक होता.... त्याच्या कडे बंगला, गाडी, घरामध्ये नौकर चाकर असं सगळं होतं..... तो बिल्डर होता.... समिधाने फक्त तोंड उघडले की तिला हवे ते मिळत असे..... त्यामुळे ती अगदी आनंदी होती.... तिची सासरची मंडळीही प्रेमळ होती.... कधी तिला कोणी दुखवत नसे....... घरात सगळ्यांची ती लाडकी होती ... तिचे माहेरचे नातेवाईक म्हणायचे पोरीने नशीब काढलं.....
लग्नानंतर सहा महिन्यातच समिधाला दिवस गेले त्यामुळे आता तिला व तिच्या घरच्यांना खूप आनंद झाला होता..... बाळाचे आगमन झाले मुलगा झाला आणि समिधा आपल्या संसारात रममाण झाली... आता तिचं बाळ चार वर्षाचं झालं होतं.... ते शाळेत जाऊ लागलं होतं..... बाकी सगळं करायला नौकर चाकर होतेच......
शेखर... समिधाच्या विचाराच्या तंद्रीत असतानाच दारावरची बेल वाजली...... शेखर ने दार उघडले तर समिधाची मैत्रीण रसिका आली होती..... रसिकाला पाहून समिधाचाही चेहरा खुलला.... खरं तर रसिका शेखरला भेटायला आली होती..... त्याच्या प्रकल्पा मध्ये तिला तिच्यासाठी टू बी एच के घर घायचे होते.... त्याची रीतसर माहिती काढण्यासाठी ती आली होती....
रसिकाने शेखर कडून टू बी एच के फ्लॅट ची माहिती घेतल्यावर ती समिधाला म्हणाली काय गं समिधा किती दिवस झाले आपण भेटलो नाही, बोललो नाही तू तर विसरून गेलीस या सक्ख्या मैत्रिणीला.... इतकी गुंग झाली का आपल्या संसारात?? त्यावर समिधा म्हणाली अगं तसं नाही.... मला काही करावेच वाटत नाहीये.... माझे मन कश्यातच लागत नाहीये.... सतत आजारी असल्यासारखं वाटतंय..... झोपून रहावंस वाटतंय.... आज डॉक्टरांकडे गेले तर ते म्हणत होते की मला काही शारीरिक आजार नाही, मी डिप्रेशन मध्ये आहे.... पण मला देखील कळत नाहीये की असे का?? बिचारा शेखरही परेशान झाला आहे.....
रसिकाने मग सहजच बोलता बोलता समिधाचा दिनक्रम विचारून घेतला...... आणि शेखरला म्हणाली.. भाऊजी मला फक्त आठ दिवस द्या बघुयात समिधाच्या प्रकृतीत काही सुधारणा होते का ते?? अट मात्र एकच तिला माझ्यासोबत रोज सकाळी नऊ वाजता यावे लागेल आणि पाच ला तिला मी घरी सोडेल.... शेखरला दुसरा काही पर्याय दिसत नव्हता म्हणून त्याने आणि समिधाने ती अट मान्य केली....
दुसऱ्या दिवशी समिधा तयार होऊन रसिकाची वाट बघत बसली.... रसिका आली आणि दोघी तिच्या स्कुटी वर बाहेर पडल्य
ा.... खूप दिवसांनी असं समिधा स्कुटी वर फिरत होती... समिधाला स्कुटीवर खूप मोकळे आणि छान वाटत होते.....
संध्याकाळी समिधा घरी आली ते अगदी आनंदी चेहऱ्याने.... तिचा चेहरा खूप खुलला होता... नकळत गाणे गुणगुणायला लागली... आज मै खूष हूं, तुम ही बोलो मै हूं खूष क्यू... वाह शेखरला तर असे वाटायला लागले की रसिकाने काय जादूची कांडी फिरवली.. तरी त्याला धाक होता की आजचा दिवस छान गेला पण उद्या??
असाच कार्यक्रम आठवडाभर चालू राहीला आणि समिधा एकदम पहिल्यासारखी.... पाहिल्यापेक्षाही जास्त छान राहायला लागली... जणू काही ती डिप्रेशन मध्ये गेलीच नव्हती..... शेखरला खूप आश्चर्य वाटले.... त्यानी रसिकाला विचारले आम्ही इतके प्रयत्न केले तिला या डिप्रेशन मधून बाहेर काढण्याचा पण काहीच फरक पडत नव्हता....तू असे काय केलेस?
रसिका म्हणाली आम्ही दोघी अगदी लहापानापासूनच्या मैत्रिणी.... आम्ही जसे मोठे झालो तसे दोघींचे काही स्वप्न होते समिधाला खूप श्रीमंत नवरा हवा होता तर मला श्रीमंतीपेक्षा मला जिथे नौकरी करता येईल असं घर हवं होतं..... दोघिनाही अगदी मनासारखे सासर मिळाले.... मला शिकवण्याची आवड होती आणि मी शिक्षिका झाले..... आणि मला माझ्या आवडीचे काम मिळाल्याने मी त्यात व्यस्त झाले..... समिधाचे पण तसेच झाले तिला तिच्या मनासारखं घर मिळालं..... तुमचं पिल्लू शाळेत जाईपर्यंत ती व्यस्त होती पण नंतर एकदम रिकामी झाली... म्हणतात ना खाली दिमाग शैतान का घर तसं काहीतरी....
मी समिधाला तिचा रोजचा दिनक्रम विचारला तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे तिने तिच्याकडे इतका रिकामा वेळ असूनही स्वतः साठी वेळच दिलेला नव्हता..... मला तिची आवड तिचा छंद माहिती होता म्हणून मी फक्त इतकेच केले समिधाच्या हातात कुंचला दिला आणि कागद.... आणि रोज एका नवीन निसर्गरम्य ठिकाणी सोडत असे.... ती ते निसर्गरम्य ठिकाण कागदावर उमटवत असे..... असे म्हणत रसिका ने पैंटिंग्स चा भला मोठा बंच शेखर समोर ठेवला....
इतकी सुंदर चित्रे..... समिधा तू कधी सांगितले नाहीस.... शेखर म्हणाला.... समिधा म्हणाली मी आपल्या संसारात इतकी व्यग्र झाले की मी पैंटिंग करते हेच विसरून गेले होते.... थँक्स टू रसिका तिने आठवण करून दिली....
समिधाने परिस्थितीजन्य बरीच बोलकी चित्रे काढली होती..... त्यातून ती कुठल्या कुठल्या परिस्थितीतून गेली किंवा तिला काय हवे आहे हे कळत होते.... जसं की शाळेत जाणारा मुलगा, एकटीच बसलेली स्त्री, छोटेसे बाळ, तिने पाहिलेला निसर्ग रम्य परिसर वगैरे. ....
शेखर ने रसिका चे मनापासून आभार मानले.... आणि म्हणाला आम्हाला कदाचीत कळलेही नसते हिचे सुप्त गुण आणि आम्ही हिला डिप्रेशन मधून बाहेर काढू शकलो असतो की नाही माहिती नाही....
रसिका म्हणाली खरंतर प्रत्येकाने आपल्या स्वतःला quality time द्यायला हवा ना.... तेव्हाच मन निरोगी राहील....मन निरोगी तर शरीर निरोगी राहील....
लेख आवडल्यास like करा, share करायचा असेल तर नावासहित share करा.