" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3.5  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

कुठे गेले राजकारणी..

कुठे गेले राजकारणी..

2 mins
136


कुठे गेले राजकारणी .. लखपती, करोडपती, अब्जाधीश...?


निवडणूक साधी सरपंचाची, ग्रामपंचायतीपासून, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, कारखाना, विधानसभा, लोकसभा कोणतीही असो शेकडो, हजारो समर्थक, लवाजम्यासह, रॅली,बॅनर, झेंडे, गाड्या, बॅंड... नको नको ते उचापती करणारे, चमचे घेऊन, घरोघरी, दारोदार, गल्लोगल्ली हात जोडून, पाया पडणारे, मतांची भीक मागत झोपडी पर्यंत जाऊन दारु, मटण, पैसा वाटत आश्र्वासनांच्या खोट्या वल्गना करणारे, विकासाचं गाजर दाखवून, जनता नी देशाला लुटून खुर्चीसाठी साम,दाम, दंड,भेद सर्व काही अवलंब करून सत्ता, खुर्ची मिळवून पिढ्यानपिढ्या चं पाप साठवून ठेवणारे किती राजकारणी या वाईट काळात आपल्या गोरगरीब जनतेची साधी विचारपूस तर करतं आहे का ? 


किती राजकारण्यांनी आमदार, खासदार,मंत्री, सरपंच यांनी गोरगरीब जनतेची,त्यांच्या उपासमारीची, भुकेची साधी विचारपूस तर केली का ? निवडणूक काळात दारू, मटण, पैसा वाटणारे ढोंगी ,गद्दार आज उपाशी मरणाऱ्य जनतेसाठी का कुठे फिरताना,मदत करताना दिसत नाहीत ?


माणुसकीच्या नात्याने शेजारी, पाजारी, गोरगरीब, बेरोजगार,उपाशी जनतेची जे कोणी खरी सेवा करत असतील त्यांना साष्टांग दंडवत... पण या राजकारण्यांच काय? आज या वाईट काळात सर्व राजकारणी स्वत: जीव वाचवण्यासाठी लोक जीव जाताना, लोक उपाशी मरताना बघत बसले आहेत.


बिचारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिन रुग्णसेवा करत आहेत. सुरक्षाकर्मी, पोलीस बांधव स्वत:ची बायको, पोरं आई, वडील सारं सोडून माणुसकी, मानवता जपत आहेत... हे सारे पाहून तरी कोणत्या राजकारण्याचे डोळे उघडले का? जनतेची सेवा करणारा डॉक्टर, पोलीस कोरोनाग्रस्थ होतोय...स्वत:चा जीव धोक्यात घालतोय यांच्यासाठी तरी कोणी थोडी माणुसकी दाखवेल का?


आतंकवादी, दहशतवादी यांच्याशी लढताना,सिमेवर जवान शहीद होत आहेत , मातृभूमी साठी बलीदान देत आहेत.. यांच्यासाठी तरी कोणी राजकारणी काही करेल का ?


काळ वाईट आहे. प्रत्येकाला आपलं मरण दिसत आहे. अपेक्षा आहे आधाराची, सहानुभूती, मदतीची, लोक भूक,भूक म्हणून, ओरडत आहेत..उपासपोटी मरत आहेत. अशा या वाईट काळात या लोकांना, देशाला लुटून घरं भरणारे ढोंगी ,स्वार्थी लखपती, करोडपती, अब्जाधीश राजकारणी, गोरगरीब जनता उपाशी मरताना पहात बसले आहेत... आपल्या आपल्या मतदारसंघात, जनतेसाठी घरोघरी, दारोदार, गावोगावी आज कोणी का फिरत नाही ? गेले, कुठे गेले ते हात जोडून,पाया पडणारे राजकारणी गेले तरी कुठे..? लोकांचं मरण आज कोणत्याही राजकारण्यांना का दिसत नाही..ते गेले तरी कुठे..?


Rate this content
Log in