*कथेचे महत्व*
*कथेचे महत्व*


शाळा म्हटली की परीपाठ आला.परीपाठात बोधकथा आलीच.रोज एक कथा सांगून मुल्यसंस्कार जोपासायचे.
घर,समाज या ठिकाणी सुद्धा कथेचा संस्कार जोपासण्यासाठी केला जातो.
उदा... घरात लहान मुले खेळकर,खोडकर, मस्ती करणारी अशीच असतात. आजी,आई,आजोबा हे तीघे या मुलांना संस्कार देण्याचे काम कधी कृतीतून तर बरेचदा कथेतून करत असतात. मुलेही त्यांच्या देखरेघीखाली घडत असतात.
शाळेत विविध बोधकथा,संस्कारकथा,रामायण,महाभारतातील कथा सांगितल्या जातात. शिवरायांसारख्या शूरवीरांच्या कथा सांगितल्या जातात. तसेज थोर पुरूषांच्या कथा,त्यांची जयंती,पुण्यतीथी साजरी करून त्यांचा परीचय कथेतून करतात.
या सर्वामुळे मुलांना इतिहास समजतो.गोष्टीतील मतीतार्थ समजतो.आपण कसे वागावे ,कसे वागू हे समजते.
अशा रितीने आपल्या अध्यापनात देखील पाठ शिकवताना त्या आधी पाठाबद्दल कथा सांगितली अथवा कथेतून शिकवले तर मुलांच्या लगेच लक्षात राहते.म्हणून कथेचे महत्व खूप आहे.