कथा विज्ञानाची
कथा विज्ञानाची




विज्ञान म्हणजे सजीव निर्जीव दोघांची अतूट मैत्री.
हे दोघे एकमेकांशिवाय राहूच शकत नाही.जगाला ते अज्ञानातून दूर करत आहे.अंधश्रद्धा दोघांना अजिबात मान्य नाही.विज्ञानाला जीवंत माणसाशी,प्राण्यांशी,झाडे,पक्षी,डोंगर,नदी ,समुद्र,हवा,पाणी यांच्याशी मैत्री करायला खूप आवडते.त्यांची मैत्री एव्हढी अतूट आहे की ते एकमेकांशिवाय जगूच शकत नाही.कोणी जादूटोणा करायला लागले की त्यांची तळ पायाची आग मस्तकाला जाते.खोटे भविष्य सांगून आपल्याच बांधवांचे शोषण करणार्या लबाड व ढोंगी लोकांचा विज्ञानाला खूप राग येतो.
एक दिवस विज्ञान बोलला,तुमच्यात हिम्मत आहे ना?मग शत्रूना जादू टोण्याने का मारत नाही.आपले सैनिक वाचतील.त्यांचे कुटूंब,आई वडील यांची कायमची चिंता जाईल.देशाला सरंक्षण खात्यात जास्त खर्च करायची गरज पडणार नाही.तोच पैसा जनतेच्या विकासकामात कामी येईल.देशाला युद्ध तसे परवडणारे नाही.पण आजपर्यंत मला कोणी सिद्धच करून दाखविले नाही.
अहो एव्हढेच काय मी त्याना सांगितले तुम्ही लग्न करताना ज्योतिष बघायची गरज नाही.कारण आजही माझे अनेक बांधव लग्न जमवताना राशी भविष्य पाहतो.
व मंगळ,शनी,राहू,केतू आहे म्हणून सुंदर मुले मुली लग्ना पासून वंचित ठेवतो.त्यांचे वय निघून जाते.नंतर दोघांचे लग्न लवकर होत नाही.वय जास्त म्हणून वधू,वर तसेच राहतात.
मला त्यांना हेच सांगायचे आहे खरे ते बोला.आपल्या एकटयाच्या फायद्यासाठी अनेक पिढ्या बरबाद करू नका.त्यापेक्षा ते निरोगी आहे की नाही हे पाहण्यासाठी रक्त चाचणी घ्या.दोघांना राशी भविष्यापेक्षा परवडेल.दोघे निरोगी असतील तरच लग्न करा.अन्यथा लग्न करू नका..दुसरे मला असे सांगायचे आहे की court marriage करताना कोणते भविष्य पाहिले जाते हो?तरी लोक सुखी संसार करत आहे ना?कमी खर्चात लग्न.कायद्याची दोघांना सुरक्षितता.आई वडील त्यामुळे सुखी राहतील.त्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचविले तर ते चिंतामुक्त जीवन जगतील.
बरेच जण तर मी बघतो,लुबाडू भोंदूबाबा कडे जातात.ते सांगतील ते ऐकतात .मागतील ते पैसे देतात.
स्री चे शारीरिक शोषण करतात.पण शिकलेले सुशिक्षीत लोक माझ्या सहवासात राहून भोंदू बाबांच्या सांगण्याला बळी पडतात.निरपराध प्राण्यांचे बळी देण्यास भाग पाडतात.काही ठिकाणी तर स्वताःच्या मुलांना बळी देण्यास त्यांच्याच आई वडीलांना सांगितले जाते.अशी आई वडील बाबांच्या सांगण्यावरून क्रूर पद्धतीने खून करतात.ह्याच गोष्टीचा मला राग येतो.आपण शिकून अज्ञानासारखे का वागतो?आपली बुद्धी आपण का गहाण ठेवतो?
असो आता इथून मागे ज्या चूका झाल्या त्या पुढे करू नका.मी कर्तुत्वावर,कर्मावर,बुद्धीवर विश्वास ठेवतो.जात,धर्म सांगून हे पाखंडी लोक हुशार व विद्वान माणसांचे कर्तुत्व लपवण्याचा प्रयत्न करतात.आपल्या भविष्यातील पिढ्या ह्या माझ्यासोबतच राहिल्या पाहिजे.मी त्यांना चुकीचे मार्गदर्शन कधीच करणार नाही.फसवणार नाही.माझा विश्वास प्रयोग आणि निष्कर्ष यावर असतो.म्हणून प्रत्येक पिढीने,जनतेने स्व:ता बदलले पाहिजे.आदर्श महाराष्ट्राचे,देशाचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा माझ्यासोबत राहिला पाहिजे.
तरच भारताचे विकासाचे स्वप्न पूर्ण होइल.Tv ,mobile यांत्रिक उपकरणे, लोहमार्ग,विमान मार्ग,जलमार्ग माझ्यामुळे शक्य झाले की नाही.स्वताःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा.लोक काय म्हणतील ते मनावर घेऊ नका.चुकीचे मार्गदर्शन करणार नाही?मोठमोठ्या आजारांपासून
वाचविण्यासाठी मानवाला माझ्याशिवाय पर्याय नाही.सर्व मानव मी सुखी करू शकतो.जगाने माझ्या आधारे अनेक शोध लावले आहे.अनेक शास्रज्ञानी माझा आधार घेतला आहे.पृथ्वी,आकाश,पाताळ सगळीकडे मीच भरलेलो आहे.माझ्याशिवाय ह्या जगात कोणतीच शक्ती नाही.सत्य हाच माझा आधार आहे.खोटे बोलणे मला आवडत नाही.