क्षमा करूया
क्षमा करूया
*क्षमा करणे चांगलेच पण विसरणे त्याहून अनेक चांगले*..
माणूस माणसाशी आजकाल माणुसकी धर्मानं वागत नाही. प्रत्येक माणसाकडून काही ना काही छोट्या,मोठ्या चुका ह्या होतच असतात. कोणताही माणूस परिपूर्ण नाही.
समाजामध्ये वावरताना एखाद्या माणसाला आपला स्वभाव आवडतो. आपले विचार आवडतात,तर एखाद्याला आपले विचारही आवडत नाही, आपला स्वभावही आवडत नाही.
असेच माणसांमध्ये गैरसमजांमधून माणुसकी धर्म लयाला चाललेला आहे. संवादामधून वाद कधी निर्माण होतील हे सांगता येत नाही. आणि हा वादाचे स्वरूप म्हणजे मग मारामारी, भांडण हे काही चांगले नसते.
कोणताही नातेसंबंधात, मित्रत्वामध्ये अथवा समाजामध्ये वावरताना आपला इगो घरी ठेवून जावे. समाजातील माणसांमध्ये आपल्या योगाला अजिबात स्थान नसते. जेवढे तुम्ही नम्र वागाल तेवढे तुम्ही इतरांना प्रिय व्हाल.
दुसऱ्याला नावे ठेवणे आधी स्वतः आपण कसे आहात ते पाहूया. आपल्याच चुका आधी शोधूया. स्वतः शिकावे मग जना सांगावे. या उक्तीप्रमाणे आपण वागूया.
जर भांडणे लय असं गेली मी खूप असं गेली तर... शब्द शस्त्रांचा वापर, हत्यारांचा वापर न करता डोके शांत ठेवावे. आपले कुठे चुकले का हे शोधून काढावे. समोरचा जरी चुकला असेल त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. आणि नाहीच त्याला समजलं काही तर स्वतः शांत बसावे क्षमा मागून गप्प बसावे. त्याने क्षमा मागितले तर अतिउत्तम. पण शक्यतो समोरचा क्षमा मागणारा नसतो. अगदी एखादाच आपल्याला सॉरी म्हणून गप्प बसतो. अशा वेळेस स्वतः सॉरी म्हणून गप्प बसावे. सॉरी हा शब्दांमध्ये खूप अर्थ दडलेला आहे. दोन अक्षरी शब्दांमध्ये एवढा ताकद आहे की समोरचा माणूस आपला नम्रपणे विचार करू लागतो.
आणि तुमच्या मधील वाद नाही संपला, तुमच्यामध्ये समेट नाही घडला तर अशावेळी सरळ ती गोष्ट विसरून जाण्याचा प्रयत्न करावा विसरणे फार कठीण असते पण विसरले तर आपले नातेसंबंध, समाजातील स्थान आणि मित्रात्वातील स्थान आबाधित राहते हे मात्र शंभर टक्के खरे आहेत.
मग अशावेळी समोरच्याला क्षमा करावी नाहीतर सरळ काही गोष्टी विसरून जाव्यात असे मला तरी वाटते.
वसुधा वैभव नाईक
मो. नं. 9823582116
