Deepa Vankudre

Others

3.6  

Deepa Vankudre

Others

कृष्णप्रिय आम्ही (बकुळ व प्राजक्त ललित संवाद)

कृष्णप्रिय आम्ही (बकुळ व प्राजक्त ललित संवाद)

1 min
231


प्राजक्त :- आज या छकुलीच्या तळव्यांवर भेट झाली आपली! नाही तर, मी प्रभातीचा सडा, तू संध्याकाळचा गालिचा.

बकुळ:- हो पण मी कधी मुलींच्या ओंजळीत, कधी तरुणींच्या वेणीत, कधी आजींच्या देव्हा-यात....

प्राजक्त:- मी ही कृष्ण प्रिय आहे तुझ्याच सारखा, सकाळच्या शुद्ध ऊन्हाची शुभ्रता मी, गंध दरवळतो हलका आणि परिसर करतो रम्य, सात्विक, आणि प्रणयी ही!

बकुळ:- पण तुझं आयुष्य? शापच जणू तुला....कुणी हातात धरलं की कोमेजून जाण्याचा! पण मी मात्र दरवळत रहातो.... दिवसेंदिवस.... कोमेजलो तरी सुगंधात पडत नाही खंड...हरवत नाही परिमळ......संपत नाही सौंदर्य....मी धुंद, मादक....

प्राजक्त:- पण आपण आयुर्वेदीक औषधं ही आहोत आणि आपली पाने, फळे, झाडाची साल सगळं किती उपयोगी आहे....नुसतेच सुगंधी नाही!

बकुळ:- हे किती जणांना माहित आहे? भारतात जवळ जवळ प्रत्येक वनस्पतीत औषधी गुणधर्म आहेत. भारत आयुर्वेदाची मायभूमी, पण विस्मरण होते आहे....

प्राजक्त (खंतपणे):- मग आपण साहित्य आणि देवघरापूरते का रे?

बकुळ:- आपलं कर्तव्य देत रहाणे, कधी दीर्घ काळ.....

प्राजक्त:- ......कधी काही क्षण!

बकुळ (हसत):- हो ना! मी न उरतो माझ्यात...माझे काम देत राहणे......

प्राजक्त (हसत):- मी जरी सरतो माझ्यात.....घेणा-याच्या हातात माझे जगणे.......


Rate this content
Log in