कोरोनाशी लढाई
कोरोनाशी लढाई
एक दोन तीन मे ला सुट्टीच होती आज चार मे ला कामावर जायचे होते. सरकारने सर्व परप्रांतीय लोकांना गावी जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि त्यासाठी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. त्यासाठी आमच्या हॉस्पिटलला अर्धा किलो मीटर ते एक किलो मीटरपर्यंत रांग लागलेली होती. चेहऱ्याचे शिल्ड, (फेस शिल्ड) मिस्टरांच्या कंपनीकडून महिंद्रा अँड महिंद्रा कडून सामाजिक कार्य म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोफत देण्यात आल्या. आम्ही कंपनीच्या गेटवरून 50 नगांचा एक बॉक्स घेतला. त्यासाठी शनिवारी यांनी त्यांच्या लीडरला फोन लावून तसे रिक्वेस्ट केली होती त्यामुळे लगेच ताबडतोब सोमवारी आमच्या ताब्यात शिल्ड
मिळाल्या. आम्ही ठाण्यावरून कारने जाऊन तेथून कलेक्शन केले आणि माझ्या हॉस्पिटल ला मालवणी येथे सर्व स्टाफला शिल्ड वाटल्या सर्व जण खुश झाले कारण त्यादिवशी इतक्या पब्लिकला हँडल करायचे होते फेस शिल्डची ची गरजच होती.
चार वाजता घरी आलो आराम केला त्यानंतर चहा आणि त्यासोबत महाभारत यामध्ये लढाईच्या टप्प्यावर ती आलेले आहे कृष्णाचे गीता सांगण्याचे सुरू आहे.
रामायणामध्ये आज शेवट झाला अखेर लव अंकुशला रामाकडे सोपवून सीता भूमिगत झाली. त्यानंतर लक्ष्मण आणि राम शरयू नदीमध्ये जलसमाधी घेताना दाखवले. त्यांच्याबरोबर जन्माला आलेले सर्व अवतार घेतलेले देव असून ते देखील निजधामाला जाताना दाखवले.