कोरडे अश्रु
कोरडे अश्रु


श्रीकलाचे लग्न मोठ्या थाटामाटात होते. प्रत्येकजण खूप आनंदी होता. श्रीकलेला तिच्या पतीच्या रुपात आपला आवडता वर मिळाल्यामुळे खूप आनंद झाला. सर्व पाहुणे निघून गेले. निरोप देताना काही जवळचे नातेवाईक होते . प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी भरुन गेले. श्रीकलाचे हृदयही रडू लागले. सर्व नातेवाईक रडू लागले. आई, आणि धाकटा भाऊ पण रडू लागले.
पण तिथे एकच माणूस होता जो खूप शांत होता. ते श्री गजेंद्र मेनन होते. हे पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटले की तो मुलीच्या निरोपानंतर इतका शांत कसा राहू शकला आणि मुलगीला लग्न झाल्यावर निरोप देताना त्याच्या पापण्यांमध्ये जरा सुध्दा ओलावा नव्हता. प्रत्येकजण आपापसात कुजबुज करीत होता. ही कुजबुज श्रीकलाच्या कानांत पोहोचली. श्रीकलेने हे देखील पाहिले की तिच्या वडिलांनी दोघांना आशीर्वाद दिला आणि स्मितहास्य केले आणि कार पर्यंत त्यांच्याबरोबर गेले. तीला आपल्या वडिलांचा मनाचा खूप समतोलपणा वाटला. न त्यांच्या आवाजात होत असलेल्या दुꓽखाचा प्रभाव दिसला, ना त्यांच्या डोळ्यात ओलावा दिसला. मुलगी लग्न करुन जात आहे याची जाणिव त्यांच्या लक्षात न आल्यामुळे ती आश्चर्यचकित झाली. तिच्या मते, वडिलांपण तिच्यापासुन दुरावत असताना रडायला हव होत.पण पुरुष रडत नाही हे कुणालाच ठाऊक नव्हते . वडिलांच्या भावना तिला दिसल्या नाही म्हणून तिने रागातच माहेर सोडलं. तिला वाटले. इतक्या लवकर मी वडिलांसाठी परकी झाले .
दुसर्या दिवशी गजेंद्र मेनन आपल्या धाकट्या भावासोबत परतपरतावणीच आमंत्रण देण्यास तिच्या सासरी गेले . श्रीकलाची आई देविका आपल्या मुलीला फोन करुन सांगू इच्छित होती. पण तीने नाराजीमध्येच फोन उचलला. नाही . आई देवकीने एक दोनदा प्रयत्नही केले पण नंतर तिला परतपरतावणीच्या विधीची तयारी करणं अति आवश्यक होत म्हणून ती फोन सोडुन कामाला लागली.
(2)
पण देविका गजेंद्रला चांगली ओळखत होती. तिच्या पतिच्या न रडण्याचा अर्थ असा नाही की त्याला मुलगीपासून विभक्त होण्याचे दुःख नाही पण तो त्याला दाखवायचा नव्हता. तिला हे माहित होते आणि तिला त्यात काही वेगळस काही वाटल नाही. कारण तीला हे माहित होत की पुरुष रडत नाही पण मुलीला वाईट वाटलं.
तीन तासांच्या प्रवासानंतर ते दुपारी समधींच्या घरी पोहोचले. स्वागतानंतर गप्पा-गोष्टी झाल्या . दुपारच्या जेवणानंतर थोड्या विश्रांती नंतर आणि संध्याकाळी दोघे भाऊ वधू-वराला घेऊन निघाले. परत येताना तीन तासाच्या प्रवासानंतर घरी पोहोचल्यावर वधू-वरांचे मोठ्या धूमधामाने स्वागत केले.. येथे. आल्या क्षणीच प्रत्येकाने त्यांना घेरल. खुप छान मेजवानी पण झाली. नवरदेव रात्री विश्राम करण्यास गेल्यानंतर श्रीकला आईला भेटायला आली . जेवणानंतर आई आणि मुलगी दोघेही घराच्या मागील अंगणात बोलू लागल्या . त्यानंतर देविकाने तीला समजावले, मला माहिती आहे की तू तुझ्या वडिलांवर रागावली आहे कारण ते तुझ्या निरोप समारंभात जरा सुध्दा रडले नाही . पण तुला माहिती नाही की ते मनातल्या मनांत एवढे रडले असतील की कोणीही तितका रडल नाही.तू गेल्यावर ते सतत दोन तास त्यांच्या खोलीत रडत बसले. हे फक्त सवय मलाच माहित त्या वेळेस सगळेच झोपले होते . त्यांची सुरुवातीपासुन अशीच सवय होती की ते कधीही आपलं दुख सांगत नाही आणि आपली व्यथा व्यक्त करत नाही. कितीही दुःख त्रास असले तरी ते पचवतात. पण कोणालाही याबद्दल माहिती नाही. नेहमी हसत असतात. आपल्याला असे वाटते की मुलगीच्या निरोपात समारंभात सुद्धा ही व्यक्ती कशी रडली नाही. पण त्यांनी आयुष्यात किती अश्रू वाहिले हे कोणालाही माहिती नाही. जेव्हा ते लहान होते , तेव्हा दारिद्र्य आणि पालकांच्या आजाराने आणि भावंडांच्या भूकेने त्याला खुप रडवलं.. पण त्याने आपले अश्रू पुसले, दिवसा काम केले, पैसे मिळवले, भावंडाचा व पालकांचा सांभाळ केला आणि रात्री भर जाग्रण करुन अभ्यासपण केला. परिस्थितीला सामोरे जाऊन प्रत्येकाची जबाबदारी पार पाडली. पालकांचे उपचार करण्यात आले. पण ते आता राहिले नाहीत. मोठी झाल्यावर भावंडानी निष्ठुरपणाने त्यांना किती रडवल हे कोणालाही माहिती नाही. त्यांचे अश्रूसुद्धा वाळुन गेले, आणखी किती रडतील आणि किती अश्रू पुसतील. जर ते हसत आहे तर आपल्या कुटुंबाकडे पाहून . . जर आम्ही दोघे त्यांच्या आयुष्यात नसतो तर ते रडतच रहायचे. आपल्याला पण झालेल्या गोष्टींचा त्याना विसर पाडुन त्यांना आनंदी ठेवणं आपलं कर्तव्य आहे . हे सर्व जाणून घेतल्यावर श्रीकलेची गैरसमज दूर झाली. तीने धाव घेतली आणि माफी मागितली. दुसर्याच दिवशी परत परतावणीची विधी संपल्यानंतर ती या घराच्या गोड आठवणीं घेऊन आनंदाने तिच्या सासरच्या घरी गेली.