Shubhankar Malekar XII C 360

Children Stories

4.3  

Shubhankar Malekar XII C 360

Children Stories

कॉलेज 3

कॉलेज 3

3 mins
337


    कॉलेजमध्ये आता चाहुल लागलेली ती म्हणजे पहिल्या चाचणी परीक्षेची.सर्व मुले परीक्षेची तयारी करत होती. पण आमचा ग्रुप अभ्यासापेक्षा जास्त मस्तीच करायचा.आम्ही दररोज प्रमाणे कॉलेजला आलो. पहिल्याच lecture ला वर्गमध्ये चाचणी परिक्षेची सुचना आली “दिनांक 1/9/2019 ते 3/9/2019 पर्यंत अकरावीची पहिली चाचणी परीक्षा असणार आहे. परंतु ती परीक्षा OPEN BOOK TEST असणार आहे”.हे उच्चारताच आमच्या वर्गातील सर्व मुले खुश झाली. कारण कॉलेजच सगळ्यांच पहिलच वर्ष आणि पहिलीच परिक्षा सगळी मुले घाबरुन गेले होते.

      

आम्ही दररोज प्रमाणे मधल्या सुट्टीमध्ये कॉलेजच्या कैंपसमध्ये फेरफटका मारायला गेलो. तेवढ्यात समोरुन वैशाली आणि तिचा ग्रुप येताना दिसला. ते आम्हाला येउन बोलले की “आम्हाला सुद्धा तुमच्या ग्रुप मध्ये यायच आहे.” आम्ही त्यांना बोलला की “हो नक्कीच स्वागत आहे. पण आधी तुझ्या ग्रुप मधल्या मुलींची ओळख करुन दे.” तीने तिच्या ग्रुप मधल्या मुलींशी आमची ओळख करुन दिली. आमचा ग्रुप आता 5 व्यक्तिंचा न राहता 9 व्यक्तिंचा झाला होता. वैशाली व तिच्या 3 मैत्रिणी एक पूजा ती खेळात उत्तम होती, वीणा ही अभ्यासात कमी पण गाण बोलण्यात उत्तम होती आणि तिसरी होती ती प्रज्ञा सगळ्याच गोष्टीत उत्तम.

      

बोलता बोलता परीक्षेचा दिवस जवळ येत होता. पहिल्याच दिवशी आमचा सगळा ग्रुप कॉलेजला येताच सगळ्यांचा चेहरा पडलेला. सगळे कॉलेजला येताच आपल्या आपल्या वर्गात निघुन गेले. पेपर संपल्यावर आम्ही सगळे बाहेर भेटलो. तेव्हा सगळे खुश होते त्यांना पेपर खुप छान गेला होता. आम्ही सगळे आता आपल्या घरी निघुन गेले होते. पुढच्या दिवशी आमचा गणीतचा पेपर होता.

      

आम्ही नेहमी प्रमाणे कॉलेजमध्ये आपल्या आपल्या वर्गात जाऊन बसलो. परंतु त्याच दिवशी कुणाल ला आमचे वर्गशिक्षक मुख्यधपाकांच्या ऑफिस मध्ये घेऊन गेले. आम्ही सगळे आश्चर्यचकीत झालो होतो. आमच्या मनात खुप प्रश्न होते. त्या दिवसाचा आमचा पेपर खुप वाईट गेला होता. आम्ही बाहेर आलो.

      

तिथे एका झाडा खाली कुणाल बसला होता. तो खुप घाबरलेला होता. आम्ही त्याला विचारल काय झाल तर तो बोलला “माझ्या मागचा अभिषेक त्याने माझ्यावर खोटा आळ घेतला.त्याने पेपरमध्ये कॉपी करण्यासाठी एका कागदावर एक गणित लिहुन आणला होता. सर जवळ येताच त्याने तो कागद माझ्या bench वर फेकला, तेवढ्यात सरांच लक्ष त्या कागदावर गेला. त्यानी तो कागद उचलला आणि त्या वर एक गणित लिहिला होता. सरांना वाटला की ते मी copy करण्यासाठी आणला होता. मी सरांना खुप समजावल परंतु सरांनी माझा काहीच ऐकल नाही. मी त्यांना सांगितल की हे अभिषेक ने माझ्या बैंच वर फेकले. मग अभिषेक बोलला की नाही सर तो खोटा बोलतोय. सरांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मला मुख्यधापकांकडे घेऊन गेले. ते मला खुप ओरडले आणि उद्या पालकांना घेऊन यायला सांगितले आहे.”

     

आम्ही त्याला खुप धीर दिला.त्याला वचन दिले की तुला आम्ही खरे सिद्ध करुन दाखवू.

(क्रमशः)


Rate this content
Log in