शब्दसखी सुनिता

Children Stories Others Children

4.0  

शब्दसखी सुनिता

Children Stories Others Children

कोंडलेली फुलपाखरे

कोंडलेली फुलपाखरे

3 mins
176


     कोरोना वाढल्यामुळे सरकारने लाॅकडाऊन जाहीर केला. शाळा बंद ठेवण्यात आल्या. घरीच ऑनलाईन शिक्षण सूरू झाल. जेव्हा लाॅकडाऊन सुरू झाला तेव्हा पार्थ, स्नेहल, श्री आणि आदीतीला खुप आनंद झाला. हे चौघेही एकाच बिल्डींगमध्ये राहायला होते. रोज एकत्रच खेळायचे. पार्थ तर खुप मस्तीखोर मुलगा होता. त्याला तर शाळेत जायला नको, सकाळी लवकर उठायच नाही. ऑनलाईन क्लास, अभ्यासाच फार टेन्शन नाही म्हणून खुप आनंद झाला. आता घरी आपल्याला गेम्स खेळता येईल, खुप टीव्ही पाहता येईल आणि खुप सार मनासारख खेळता येईल तो खुप आनंदीत झाला. पण हा आनंद त्याचा फार काळ टिकु शकला नाही. पार्थ सारखीच या तिघांची अवस्था होती. प्रत्येकजण आपल्या अपार्टमेंटमध्ये असायचे. कुणीही बाहेर खेळायला येत नव्हते. त्याला हे सगळ नको वाटायला लागल. इतक जवळ असुन कुणीही एकमेकांच्या घरी येत जात नव्हते. कारण त्यांच्या आजुबाजुला बरेचसे कोरोनाचे रूग्ण सापडत होते. त्यामुळे प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांची काळजी घ्यायचे. त्यांना काय हव नको ते बघायचे  पाहीजे ते आणुन द्यायचे. त्यांनाही मुलांची अवस्था कळत होती. पण पर्यायही नव्हता काही उलट सगळे देवाला ही परिस्थिती लवकर संपू दे अशी प्रार्थना करायचे.     


पार्थला लाॅकडाउनचा कंटाळा आला होता. यातच त्याचे सहा महीने निघून जातत. तो घरातच होता. आईबाबा त्याचे त्यांच्या ऑनलाईन कामात बिझी असायचे. तो त्यांच्या खिडकीतुन रस्त्याकडे बघायचा. कुणीही एवढे लोक दीसत नव्हते. रस्ताही निर्मनुष्य दिसत होता. सगळीकडे शांतता होती. पार्थ इकडे तिकडे बघत राहायचा. कधी कधी आपल्या बाल्कनीतुन खाली डोकावून बघायचा. कुणी आपले शेजारचे फ्रेन्ड्स दिसतात का खेळण्यासाठी पण कुणीही बाहेर येत नव्हत. तेव्हा त्याला आई आणि बाबा समजुन सांगायचे. कोरोना विषाणु आणि त्याच्यामुळे माणसांवर काय परिणाम होतो आणि सद्या काळजी घेण, घरात थांबण किती गरजेच आहे, हा लाॅकडाऊन का केलय सगळ त्याला सांगीतल. तो पाचवीत शिकत होता. त्याला समजल असल तरी त्याला आता लाॅकडाउनचा कंटाळा आला होता.    


पार्थ आपल्या सर्व मित्र - मैत्रिणींना काॅलवर बोलायचा. मग तो सगळच त्यांना शेअर करायचा. खुप गप्पा मारायचे. तर त्याला तेवढच बर वाटायच. कुणालाही एकमेकांच्या घरी येता येत नव्हत. बरेच दिवस झाले होते. ते एकमेकांना भेटले नव्हते. खेळलेही नव्हते. एकाच परिसरात राहुन ही भेट होत नव्हती. त्या लहान मुलांना ऑनलाईन शाळेपेक्षा ऑफलाईन शाळाच बरी आता अस झाल होत. त्यांच्यात खुप बदल झाले होते. सगळेच समजदार झाले होते. स्वतःचा अभ्यास करायचे. आईबाबांना त्रास देत नव्हते. बरीचशी काम स्वतः करायचे. घरीही शांत बसायचे, एरव्हीसारखे कुठल्याही गोष्टींसाठी हट्ट करत नसायचे. एक दिवस दिवस पार्थ आपल्या मित्राला बोलत असताना त्याचे आईबाबा ऐकतात. ते ही त्याला समजुन घेतात. दोघेही आपल्या पार्थसोबत खेळायचे. त्याला गोष्ट सांगायचे. त्याला काहीतरी करायला लावायचे,शिकवायचे जेणेकरून त्याला त्यातुन आनंद वाटेल. तो असा उदास , एकटा असल्यासारखा वाटु नये म्हणुन ते छान छान त्याच्यासाठी मूव्हीज कींवा लहान मुलांसाठी असणार्‍या फिल्म दाखवायचे. त्याला छान वाटु लागल. आईबाबा त्याच्यासोबत आहेत वाटु लागल.   


लाॅकडाऊन मध्ये घरात बंद असताना प्रत्येक व्यक्तीच आयुष्य बदलल. पार्थसारख्या अश्या अनेक लहान मुला मुलांची जवळ जवळ लाॅकडाउन मध्ये हीच अवस्था झाली होती. आईबाबा त्याच्यासोबत खेळत होते. सगळ छान चालल होत पण तरीही पार्थ वाट बघत होता की कधी आपली पुन्हा शाळा सूरू होईल आणि कधी एकदा सर्व फ्रेन्ड्स ला मी भेटतो. त्यांच्यासोबत खेळायच, मस्ती करायच अस सगळच तो खुप मिस करत असतो. त्यांच्या फ्रेन्ड्स मध्ये नेहमी कोरोना कधी जाईल आणि हा लाॅकडाऊन कधी संपेल याविषयी चर्चा व्हायची... पण आज सर्वांनी मिळून आपल मनातल देवबाप्पाला सांगायच ठरवल...         


अरे देव बाप्पा        

कोरोना लवकर जाऊ दे        

पुन्हा मला एकदा        

माझ्या शाळेला जाऊ दे        


नको आता ऑनलाईन        

मला ऑफलाईन शिकू दे        

थोडीशी मस्ती पुन्हा        

मित्रांसंगे करू दे        


माझी शाळासुद्धा         

वाट माझी पाहते         

तिथल्या प्रत्येक भिंतीला         

आठवण माझीही येते         


आठवणींचे हे चक्र         

आता लवकर लवकर थांबू दे          

पुन्हा एकदा मला         

माझ्या शाळेला जाऊ दे


Rate this content
Log in