STORYMIRROR

Varsha Gavande

Children Stories Others Children

4.4  

Varsha Gavande

Children Stories Others Children

कन्या

कन्या

2 mins
437

गर्भवती पत्नीने पतीला विचारले तुम्हाला मुलगा व्हावा की मुलगी याबद्दल काय वाटते.....

त्यावर पती ने सांगितले,आपल्याला मुलगा जर झाला तर त्याला मी हात धरून फिरायला घेऊन जाईल,त्याला मी बोलणे,हसणे,खेळणे शिकवणार, मी त्याच्यासोबत खेळायला जाईल.......

 मुलगी झाली तर, आपल्या घरात मुलगी जन्माला आली तर समजून जाईल आपल्यावर देवाची कृपा झाली,आता आपल्यावर सदैव देवाची कृपादृष्टी राहील....

  मुलगी स्वतः जन्माला येतांना खूप गुण घेऊन जन्माला येते. पती म्हणाला, तिला काही शिकवण्याची गरज पडणार नाही.

मला जे लोक शिकवत होते त्यापैकी एक जन्माला येईल, तीच मला शिकवेल बाबा हे अस करा, ते नका करू, आपण हे घेऊ, तिथे चला,हे वाईट आहे,ते चांगले आहे,तीच माझा हात धरून बाहेर घेऊन जाईल. ती माझी मोठी बहिन किंवा माझी आई असणार. 

ती मला तिचा हिरो मानेल. मी केलेले सर्व काम तिला आवडतील. मला पाहता क्षणी तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल, खोटी खोटी रागावणार ती माझ्यावर. मी तिला काही देऊ शकलो नाही तर ती मला समजून घेईल. 

   ती कितीही मोठी झाली तरी तिला वाटेल की आपल्या आई बाबाने आपल्याला एका dall सारखे कायम प्रेम करावे. ती लग्नानंतर ही तिच्या पतीची तुलना माझ्यासोबत करेल

 पत्नी : ती कायम आपल्यासोबत राहणार नाही मग का मुलीचे स्वप्न पाहायचे,मुलगाच बरा कायम सोबत राहील तोही हे गुण शिकेल.

पती : हो तोही शिकेल पण मुलीला शिकवण्याची गरज पडणार नाही ती जन्मतःच या गुणासोबत जन्म घेते. ती सोडून जाईल अपल्याला एक दिवस.पण कन्यादान सारखे पुण्य ही देऊन जाईल. ती परक्या घरात गेली तरी परकी होत नाही. कायम मनात घर करून जाईल ती, प्रत्येक क्षणाला तिची आठवण येत रहील , ती कुठेही राहिली तरी तिच्या मनात आपण आणि आपल्या आयुष्यात तिचे स्थान तेच राहील जे लग्नाआधी होते.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

बर झाल देवा

दिली एक सुकन्या 

तिच्यामुळे कळली 

मला ही दुनिया


तूरू तुरु चाले 

तिचे घरभर, पैंजण बोले

शोभा आली माझ्या घरा

आनंद मिळवून दिला खरा


होता मोठी, घोर लागे जीवा

सुरू होई घरात लगबग 

शोधू पार्वतीसाठी भोळा शिवा 

मिळवू पुण्य करून कन्यादान

ठेवून रूढी परंपरेचा मान सन्मान 


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



Rate this content
Log in