End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

SWATI WAKTE

Others


3  

SWATI WAKTE

Others


कल्पतरू

कल्पतरू

3 mins 192 3 mins 192

साधारण पासष्ट वर्षांचे गृहस्थ एकनाथ या वयातही उत्तमरीत्या नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करतात.

एकनाथ त्यांच्या पत्नीसमवेत आपल्या गावी राहतात. त्यांचे गाव जिल्ह्याचेच ठिकाण आहे. तिथे सकाळी चालायला जाणे , व्यायाम करणे, वाचन करणे, शेती करणे असे स्वतःचे आयुष्य घालवितात.वास्तविक एकनाथ कृषी विभागात मोठ्या पदावर नोकरी करत होते. आणि निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करण्याचे ठरविले. त्यांचे एम.एस, सी. कृषी पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे.

वास्तविक त्यांची परिस्थिती लहानपणी एकदम हलाखीची होती. त्यांचे वडिल एक शेतमजूर होते.कुळाच्या घरात ते राहत होते. घरात हा सर्वात मोठा लहान भावंडांपैकी एक मुलगा होता. आईला एक दोन वर्षांच्या अंतरानेच मुले होत गेली.त्यामुळे लहान भावंडांना सांभाळून घरात दुसरे कुणी नसल्यामुळे घरकामाची मदत आईला करावी लगे. त्याकाळी त्यांच्या कडे वीजही नव्हती. हा मुलगा अभ्यासात मात्र एकदम हुशार होता. तो छोट्या भावंडांना सांभाळून आईला घरकामात मदत करून शाळेत जाई. गावात शाळाही पाचवीपासून नव्हती बाजूच्या गावात जे साधारण सहा सात किमी अंतरावर छोट्या भावंडांनाही सोबत घेऊन चालत जाई..घरी आल्यावर एखाद्या छोट्या भावंडाला मांडीवर घेऊन अभ्यास करी. हा मुलगा अभ्यासात एकदम हुशार होता.तो वर्गात नेहमी पहिलाच येई.

कालांतराने त्याच्या वडिलांना कुळकायद्यात जमीन मिळाली पण तरीही नऊ जणांचा खर्च त्यांना झेपत नसे. म्हणून बोर्डात पहिला येऊनही एकनाथचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. वडिलांना खर्च झेपणार नव्हता म्हणून त्यांचा मानस अपूर्ण राहिला. त्यांनी बी. एस. सी. कृषी ला प्रवेश घेतला व तोही खर्च वसतिगृह,फी,पुस्तक,मेस घरच्यांना झेपत नव्हता.म्हणून स्वतः शिक्षणासाठी कर्ज काढले व त्यातीलही पैसे घरी पाठवून होस्टेलवर काम करून त्याबदल्यात त्याला मेस मोफत मिळत असे आणि दुष्काळाच्या काळात पूर्ण शिषुववृत्ती वडिलांना देऊन स्वतः एक जोडी कपड्यावर राहिला आणि महाविद्यालयातही पदव्युत्तर शिक्षण प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला. नंतर शिक्षणानंतर निकालापर्यंत दोन महिने घरी असतांना स्वतःच्या शेतीवर कामला जात असे.नंतर तीन महिन्यानंतर एका बँकेत मुलाखतीसाठी गेले असता लेखी परीक्षा पास होऊन कपडे नीट नसल्यामुळे ती नोकरी मिळाली नाही. नंतर इंडियन बँकेत मुंबईला नोकरी मिळाली. पण त्याकाळात फोनची सुविधा नसल्यामुळे व घरच्यांची जबाबदारी यांच्यावरच असल्यामुळे एक वर्ष मुंबईला नोकरी केल्यानंतर स्वतःच्या गावाजवळ बँकेची नोकरी पत्करली व नंतर लहान भावंडांचे शिक्षण केले व बहिणीचे लग्नही केले.

दरवर्षी घरी पैसे पाठवून स्वतः काटकसरीत राहिले व घरच्यांचे पूर्ण कर्ज फेडले. गावी घरी वीज आणली. त्यांना घर घेऊन दिले. स्वतःला चार मुले झाल्यावर त्यांनाही सर्वकाही पुरविले. आईवडिलांचे तीर्थ करून दिले. त्यांचे आजारपण केले व प्रत्येक माणसाला मदत केली. स्वतःच्या मुलांना स्वतःच्या कर्तृत्वाने चांगले संस्कार दिले'

मुलेही हुशार निघाली.पत्नी कर्मठ असल्यामुळे घरी सतत मोठे कार्यक्रम अन्नदान करतात त्यामुळे घरात एक शिस्तीचे संयमाचे वातावरण आहे. पत्नीचीही या गृहस्थाने सर्व इच्छा पुरविल्या. तिला लग्नानंतर शिकविले .तिला कुठल्या गोष्टींसाठी कधी नाही म्हटले नाही. स्वतःच्या घरच्यांचं नाही तर खूप लोकांना त्यांच्या अडीअडचणींत मदत करतात. कुणाला शेतीसाठी मदत करतात .कुणाला शिक्षणासाठी मदत करतात.

एकनाथ ला आयुष्यात एकदा मोठा आजार झाला पण त्याही आजाराचा बाऊ न करता धीरगंभीरपणे त्याला सामोरे गेले व अत्यंत स्थितप्रज्ञ राहून त्या आजारावर मात केली. अशा अनेक प्रकारांचा सामना धीरगंभीरपणे केला.

मुलांना पुण्याला स्थिरस्थावर करून देण्यासाठी तिथे बदली करून घेतली व मुले स्थिरस्थावर झाल्यावर आपली अडचण नको म्हणून आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतला.

सर्व मुले सुना एकत्र याव्या म्हणून घरी गावीच गौरी गणपतीचा सण उत्साहाने साजरा करतात. दिवलीही गावीच एकत्र करतात त्यानिमित्ताने सर्व मुले सुना एकत्र जमतात व गोडवा आणि आपुलकी कायम राहते. हेही अधूनमधून एक दोन महिने मुलांकडे जाऊन राहतात तिथे नातवणंदांना खेळवतात. अशाप्रकारे मुलांशी,सुनांशी,जावयाशी पारदर्शी नाते जपतात.असा मनुष्य फक्त दुसऱ्यांचाच विचार करतो.स्वतः दुसऱ्यांकडून काही अपेक्षा करत नाही. हा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येकासाठी कल्पतरूच आहे. अजूनही हा गृहस्थ त्यांच्या भावांच्या मुलांना सांभाळतो. त्यांना अडीअडचणीत मदत कतो. कुणी दुःख सांगितले तर त्यांना सढळ हाताने मदत करतो.घरात नेहमी काहीतरी कार्यक्रम जसे भागवतपूजा,भजन करून अन्नदान करतो. अत्यन्त उत्साहपूर्वक व चांगल्या रितेने आयुष्य घालवितो.प्रत्येक नवीन तंत्रज्ञान तितक्याच उत्साहाने आत्मसात करून शिकतो.

"असा हा कल्पतरू " फक्त दुसऱ्यांच्याच आनंदात आनंद शोधतो आणि स्वतः समाधानी राहून आनंदी राहतो.


Rate this content
Log in