Gangadhar joshi

Others

3  

Gangadhar joshi

Others

कळलं। च नाही

कळलं। च नाही

2 mins
805


खरच 


सुरवंटा पासून फुलपाखरू कसे झाले कळलं च नाही

फुल पाखरा च मिलन झालं की नर मरतो मादी जगते... होय खरय मादी जगते ती वंश वृद्धी साठीच

खरच

माझं गाव तस मोठंच होत पण गाव सोडलं गावात खूप बदल झाला.. तालुका झाला ..आनन्द वाटला, गावची वेष होती तशीच अजुनी आहे.

रस्ते / गटारी अद्यावत झाल्या होत्या कैक घरानी रुपडं बदललं होत कळलं च नाही. 

मातीची घरे जाऊन दुमजली इमारती वसल्या होत्या काही गल्ल्या मोहल्ले अजुनी तशीच होती 

घरे / गटारी / रस्ते / भिंती बदल झाला कळलं च नाही

गावातील एक पिढी सम्पली कळलं च नाही नवी पिढी नव्या रुबाबात दिसत होती कळलेच नाही काही माणसे तग धरून होती खचली होती त्यांच्या त व त्यांच्या मनात बदल झाला होता कळलं च नाही

काही नाती मध्ये सोईस्कर रित्या बदल झाला कळलं च नाही

काही माणसे कशी बदलली कळलं च नाही गावच रुपडं बदललं पण माझं जून घर तसच होत घराला कुलूप ज्या घरानी अभ्या गताना ओळखीचे असोत वा दूर नात्यातील त्यांचं आगत स्वागत केलं होतं आलेला पाहुणा कधी रिकाम्या पोटानी व रिकाम्या हातानी गेला नाही 

स्वयंपाक घरची धुनी सदैव पेटलेली च होती माय माऊली ला अन्नपूर्णे ची उपाधी कशी चिकटली ते कळले च नाही 

येणारी जाणारी शेतातील गडी नवीन येणार पाहुणा किंवा भिक्षेकरी सुद्धा पोटभर ढेकर देऊन मायेन जुनी पानी धोतर धडु ता मागून घेऊन जात 

भिक्षेकरी साठी च 1पोत जोंधळे 

देवडीवर ठेवले जायचे 

त्यात छोटं सूप पण असायचं 

घराचा राबता खूप असायचा ते सगळं सगळं बंद झालं कळलं च नाही 

पोशिंदें कधी गेले दिवस कसे बदलले ते कळलं च नाही

आज मात्र घरी जायला नको वाटते ते सर्व दिवस कसे सरले कळलं च नाही 

शेती tenant ऍक्ट मध्ये कशी गेली ते कळलं च नाही

सगळे बदलतील पण मित्र बदलणार नाहीत असं वाटत असतानाच ते बैलगाडी सोडून कार 🚖 गाडीत कधी बसले कळलंच नाही

कळलं च नाही ह्या क्रियाशील क्रियापदाचा आता तिटकारा येऊ लागला आहे 

कित्येक गोष्टी कळतच नाही 

का आम्ही डोळे झाकुन बसतोय म्हणून कळत नाहीत

मित्रानो, ही जग राहाटी अशीच असते 

मुसफिर हूं यारो ना घर है ठिकाणा

मुझे चलके जाना है बस 


मंझीले अपनी जगा

रास्ते अपनी जगा

हे बच्चन च गाणं आठवत रहाणे तेवढं च आपल्या हातात आहे

परिवर्तन ये संसार का नियम 

जुनी पान गळणार नवीन पालवी येणार 

झाड मात्र तेच बी पण तेच

हाच सृजन शील श्रुष्टीचा नियम

कळलं न कळल हा आपले प्राक्तन


Rate this content
Log in