किरण
किरण
माझ्या जुण्या मित्रा पैकी एक शाळेतील वर्ग मित्र. तो आज ही त्याच आमच्या जन्म गांवी राहत असतो. सन 2020 मध्ये आम्ही सर्व वर्ग मित्र एकत्र जमलो होतो. आणी आम्ही सार्वजनिक एकसठवीं त्या कार्यक्रमात मनवली होती.त्याच्या सहकार्याने हा कार्यक्रम आमच्या शाळेत संपन्न झाला होता. आम्ही सर्व मित्र-मैत्रीनीना या कार्यक्रमाच्या सफलते मुळे फार आनंदी झालो होतो.जवळ-जव्ळ सगळेच वर्गमित्रा आम्ही भेटलो होतो. या वर्षि पण आम्ही काही ठराविक मित्रांनी त्या कार्यक्रमाचा वर्धापन दिवस फरवरी -2021 मध्ये साजरा केला होता. आणी नंतर त्याच्या मुलीच्या जवळ्या शेतात पिकनीक मनवली होती.त्यात आम्ही सर्वांनी त्याचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले होते. आणी असाच संयोग दर वर्षि तु करत जा म्हणजे आपली दर वर्षि भेट होत राहिल.
अचानक एक दिवस एका मित्राचा फोन आला. अरे तुला माहित आहे काय, किरण ला कोरोना झाला आहे आणी तो वेंटीलेटवर दत्ता मेघे मेडिकल कॉलेज सावंगी वर्धेला भरती आहे. त्याची प्रकृति फार नाजुक आहे.काही सांगता येत नाही. आम्ही सर्वच मित्रा वरिष्ठ नागरिक असल्यामुळे कोरोनाच्या बिघडलेल्या परिस्थिमुळे आम्हाला त्याला भेटायला जाने शक्य नव्हते. आणी प्रयत्न केला असता तरी परिवारवाल्यानी आम्हाला जावु दिले नसते. त्यामुळे आम्ही सर्वजन लाचार होतो. फ्क्त आमच्या जवळ प्रकृतिला प्रार्थना करण्या शिवाय दुसरा कोणताच विकल्प उरला नव्हता. नंतर बातमी मिळाली कि तो तबल अठ्ठविस दिवसाच्या असाधारण संघर्षा नंतर यमराज्या तावडितुन सुटुन घरी परतला आणी सध्या स्वास्थ लाभ घेत आहे. हे ऐकुन फार समाधान वाटले.
काही दिवसा नंतर मी त्याला फोन लावला. अरे किरण तु आता कसा आहे ?. त्यानी सांगितले मी आता अरुण, माझी प्रकृति फर उत्तम आहे. मी आता पहिले सारखाच झालो आहो. तु आता चिंता करु नको. यमराजाला चकमा देवुन पुन्हा आलो आहो. मी म्हटले अरे यमराजाला चकमा देने अवघड आहे. हे कसे शक्य झाले. तेव्हा त्याने आपला पूर्ण सविस्तर घडलेला इतिहास सांगितले.
मागच्या महिण्यात एका मित्राच्या आईचे निधन झाले. त्यामुळे मला त्या दिवसी फार धावळ-पळ झाली. व दोन-तिन वेळा स्नान करावे लागले. दुसरया दिवसी मला फार अस्वस्थ वाटत होते. मी डॉकटरला दाखविले. त्याने माझा प्राणवायु तपासला. आणी सांगितले की सावंगी मेघे वर्धेला जावुन लगेच भरती व्हा. मला डॉकटरचे म्हणने फार से पटले नाही. कारण मला काहीच त्रास नव्हता. रोज चार-पाच किलोमीटर फिरने, व्यायाम करने एकदम सुरुच होते.काही अजुन त्रास नव्हता. त्यामुले मी दुसरया डॉकटरला दाखविले आणी पहिल्या डॉक्टर चा सल्ला त्यांना सांगितला. त्यांनी मला दोन –चार टेस्ट करण्यासाठी सांगितल्या. रिपोर्ट त्यादिवसी संध्याकाळी उशिरा मिळाली. आणी मी ती लगेच डॉक्टर दाखवली. त्यांनी पण मला भरती होण्यासाठी सांगितले. पण त्यादिवसी रविवार असल्यामुळे मी आणी घरच्या सदस्यानी उद्या भरती होण्याचा निर्णय घेतला.आणी दुसरया दिवसी मी मेडिकला गेलो. तपासनी नतंर मला भरती करण्यात आले. नंतर मला कळले कि माझी कोरोना चाचनी पॉजिटिव आहे. आनी प्राणवायु स्तर सामान्या पेक्षा कमी झाल्याने मला वेंटीलेटर वर ठेवन्यात आले. मला काहिच खावयाशे वाटत नव्हते.माझी प्रकृति जसे –जसे दिवस जात होते, तशि-तशि माझी प्रकृति ढासळत जात होती.मला वेंटीलेटर व सलाईन वर ठेवन्यात आले होते. रोज आठ-दहा इंजक्शन देण्यात येत होते. मला अतिसंवेदंशिल कक्षेत ठेवण्यात आले होते. तरी माझी प्रकृतित फारसा सुधार होत नव्हता. त्यामुळे मला आता मृत्यु कक्षा वार्ड मध्ये स्थानांतरित करण्यात आले होते. मला झोप येत नव्हती. रोज माझ्या वार्डात एक दोन रुग्ण मरत होते. हे सर्व दृष्य बघुन मी हादरुन गेलो.पण मनाशी पकका निर्यण केला होता कि यातुन आपण बाहेर पडयाचे. या महामरिला हरवयाचे आहे. मग माझ्या बाजुला महिला रुग्ण आली. तीला फार असधारण वेदना होत होत्या. त्यामुळे ती फार ओरडत होती. आणी शेवटी ती महिला रुग्ण दगावली. मला वाटले आता यमराज आपल्यापाशी येवुन ठेपला आहे. आणी आता त्याचा समोरचा भक्ष्य आपणंच असाणार. त्यामुलळे मी आपली सर्व शक्ति पणाला लावली आणी वेंटिलेटर ला जसा प्रतिसाद पाहिजे तसा देत गेलो. शेवटी माझा प्राणवायु स्तर वाढायला लागला. आणी आवशयक स्तर त्यानी गाठला होता. पण पोटात काही जात नसल्यामुळे मी फार अशक्त झालो. शेवटी बेशुध्द पडलो. डॉकटरांनी परिवारजनाला सांगितले कि हा मागच्या 48 तासापासुन बेशुध्द आहे जर हा येता 24 तासात जर शुध्दी वर आला नाही, तर रुग्ण दगावण्याची शभंर प्रतिशत संधी असल्यामुले आपण तयारित असावे. पण प्रकृतिने चमत्कार घडविला आणी मी पुन्हा शुध्दीवर आलो. त्यामुळे संपुर्ण मेडिकल स्टाफला आणी सोबत परिवाला फार आनंद झाला. त्यांच्या परिश्रामाला यश आले. आणी मी शेवटी सगळ्यांचा मदतीने कोरोना युध्द जिंकलो. आता मला मृत्युची भिति काहिच वाटत नाही. हे सत्य आहे जेव्हा कोणी मनुष्य, मृत्युच्या तावडितुन सुटतो. त्याला नंतर कधीही मरणाची भिती वाटत नाही.
मित्र किरण ,तु दाखवलेल्या आत्मविश्वासामुळे आमचा पण आत्मविश्वासा वाढला आहे.आणी प्रत्येक भारतीय कोरोना रुग्ण याच आत्मविश्वासाने कोरोनाला मात देईल याची मला खात्री आहे. तुझे नांव आई-वडिलांनी विनाकारण किरण ठेवले नाही. त्यांना ठाऊक होते कि तु एक दिवस नक्कीच इतरांन साठी आशेची किरण बनशील.
