Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

खो खो....

खो खो....

1 min
335


माझा आवडता खेळ... खो खो...

आवडता खेळ म्हंटले की आमची वयस्क पिढी आपले सारे खेळ एका झटक्यात आठवते.. अगदी गोट्या पासून सुरू होणारी खेळांच्या नावाची मालिका त्यात ज्ञात असणाऱ्या क्रिकेट पर्यंत येऊन ठेपते...

आमच्या बालपणी आणि जाण थोडी येई पर्यन्त बरेच सांघिक आणि वैयक्तिक खेळ खेळायचो. त्यात मग लंगडी, भेंडा गोंडा, एक्कट दुक्कट, सूर पारंब्या, सुरकाठी, कब्बडी, क्रिकेट, खो खो, लपंडाव असे अनेक स्वस्त आणि मस्त खेळ आम्ही खेळलो. त्यातल्या त्यात मला खो खो खेळ आवडायचा आणि अजूनही आवडतो. हा खेळ सगळेच सद्गुण विकसित करतो आणि आपले जीवन समृद्ध होते. खोखो मुळे एकसंघ भावना सदैव वास करते आणि सृजनशील जीवन घडते...

पळणे, धरणे पडणे,उठणे, पाठलाग करणे,ओरडणे, बुक्का मारणे सारे सारे लीलया घडते आणि परस्परातील अंतर कमी होऊन एक ऋणानुबंधाची गाठ घट्ट बसते जी जन्मभर मैत्रीची साथ देते. जीवन सुखमय, आनंदी होते हे नक्की...

खो खो खेळ

बसवतो मेळ मैत्रीचा

मी माझे तू तुझे

नष्ट होण्या जीवनी

हाच उपाय खात्रीचा...


Rate this content
Log in