STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

खेळ अन् खेळणी शिकवती बरेच

खेळ अन् खेळणी शिकवती बरेच

3 mins
230

मनू सगळ्या भावंडांमध्ये लहान असल्याने सगळ्यांची खेळणी मनूच्या वाट्याला आलेली. मोठ्या बहिणीची भातुकली,काही सॉफ्ट टॉईज,मोठी बाहुली. भावांच्या कार, aeroplane अशा सारखी बरीच खेळणी अगदी ती जन्माला यायच्या आधीपासूनच तिच्या साठी राखीव असलेली.


मनू आजी आजोबांच्या देखरेखीत अगदी त्यांनाही त्यात सामील करून घेत ती खेळायची.

अतिशय लाडकी असल्याने ती स्वतः च आजी आजोबांसाठी एक खेळणेच होती की ! अगदी आवडते खेळणे! त्यामुळे तिला किती जपू अन् किती नको असे त्यांना झालेले.


मनू च्या birthday ला गिफ्ट म्हणून मिळालेला मेकॅनो च सेट आणि प्राण्यांचे चित्र जोडणाऱ्या पझल्स चा सेट तिला खूप आवडायचा. बालसुलभ भांडी वगैरे पेक्षा तिला असेच खेळ जास्त आवडायचे. मेकॅनो सेट सोबत असलेल्या चित्रांपेक्षाही अजून नवनवे प्रकार बनवायला तिला आवडायचं अन् मग नवे काही बनले की अगदी नाचून तो नवनिर्मिती चा आनंद व्यक्त करायला तिला आवडायचं. puzzles जोडतांना एक एक तुकडा शोधत जोडत मेळ घालत चिकाटीने तो जोडणे तसे किचकट च! पण मग रोजच्या सरावाने किंवा त्यातली आयडिया कळल्याने तिला अगदी ते अगदी सहज जमायचं. ती जुनी गोष्ट नाही का? एका माणसाला भारताचा नकाशा जोडायला सांगितला तुकड्यांमधून. काही केल्या तो पूर्ण जमेचना. शेवटी त्याने हार मान्य केली. जोडणाऱ्याने सगळे तुकडे उलटे केले अन् एका माणसाचे चित्र जोडले. जसा माणूस पूर्ण जोडल्या गेला तसा दुसऱ्या बाजूला भारताचा नकाशा बनला.

अशा छोट्या छोट्या गोष्टी तून हसत खेळत जीवनाचं शिक्षण पोरांना दिलं जातं.


मनू सहसा खेळण्यांसाठी हट्ट न करणारी. पण एकदा इतकी मागे लागली की विचारूच नका.मग आईने तिच्या साठी नवीन खेळणं आणून दिलं ring toss game. विशिष्ट अंतरावरून अंदाज घेऊन रिंग त्या खुंटीत अडकवायची. त्या खेळातून मनू अचूक पणा,एकाग्रता शिकली.


एकदा मावशीकडे गेली असता मावशीनी तिला हुला हूप्स फिरवून दाखवलं आणि तिचं हूला हुप्स मनू ला दिलं मनू ला तो प्रकार इतका आवडला की काही दिवसातच ती अगदी सराईतपणे हुलाहूप फिरवायला लागली. शरीराचा तोल सांभाळत एकाग्रतेने रिंग फिरवताना आयुष्यात तोल सांभाळत जगणं शिकवून गेली.


लगोरी सारख्या खेळातून मनू टीम वर्क शिकली. चेंडूला चुकवत आपला कार्यभाग साधत लगोरी मांडायला शिकली. यू


मनूची च काय कोणत्याही मुलांची शिक्षणाची प्राथमिक सुरुवात ही खेळण्यां द्वारेच होत असते. खेळण्यांचे रंग,त्यांचे आकार ,त्यांचे प्रकार ह्यातून रंग ,आकार,छोटे ,मोठे ह्याचे शिक्षण मुलांना सहजच हसत खेळत मिळत असते. आकारमानानुसार चढत्या अन् उतरत्या क्रमाने खेळणी लावता लावता आरोह अन् अवरोह सहज कळतो मुलांना!


वर्ड गेम्स असतात त्यातून मुलांना एका शब्दापासून बनणारे अनेक शब्द,एका शब्दाच्या शेवटापासून सुरू होणारा दुसरा शब्द असे अनेक प्रकार सहजगत्या शिकवून जातो.मुलांची शब्दांची ओळख वाढते.


बिझनेस गेम सारखी काही खेळ मुलांना पैसे सांभाळून वापरणं, खरेदी ,विक्री ,फायदा ,तोटा अशा गोष्टींशी सहजच तोंड ओळख करून देते.


साधी बाहुली सुद्धा तीच्याप्रती असणारा जिव्हाळा,तिला नीटनेटके ठेवणे तिला सांभाळणे आदी जबाबदाऱ्या शिकवत असते. बरेचदा तर मुलं खेळताना बाहुलीला तसेच जपतात अगदी त्यांची आई त्यांना जपत असते तसे..


खेळणी अन् खेळ मुलांना आनंद देतात. ज्या गोष्टी शिकायला मुलांना वर्षानुवर्षे लागली असती ती मुलं खेळांच्या माध्यमातून शिकतात. अगदी सहज ,हसत खेळत मुलांचं बाल्य जपत शिक्षण द्यायचं काम खेळ करत असतात.

म्हणून तर मनू चे आजी आजोबा मूल बनून तिच्या सोबत सोबत खेळत असतात तिचं भावविश्व जपत तिला जीवन शिक्षण देण्यासाठी..!


हो आणि मनूची आई मनूला पुन्हा हे सांगत असते आपले काम झाले ,आपलं ते खेळणे खेळून मन भरलं की उगाच त्याचा संग्रह न करता ते दुसऱ्या गरजवंताला नक्की द्यावे जेणे करून त्याला खेळण्याचा आनंद मिळेल अन् आपल्याला देण्याचा...


सोबतच मैदानी खेळ तर शरीरा बरोबर मनाचीही मशागत करत असतात. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् | या सूत्रानुसार शेवटी शरीर हेच तर माध्यम आहे सर्व साध्य करण्याचे . मग हे शरीर सुदृढ हवे असेल तर खेळ हे आलेच. मनोनिग्रह, मेहनत,सराव,टीम वर्क अशा बऱ्याच गोष्टी खेळातून अगदी सहजपणे शिकता येतात.


बघा ना साधी गोष्ट खेळण्याची पण बरेच काही शिकवून गेली नाही..!


Rate this content
Log in