कामगार :- बाबासाहेबांचे योगदान
कामगार :- बाबासाहेबांचे योगदान
एक काळ असा होता कि जिथे जातीयतेनुसार वर्णव्यवस्था ठरवली जायची आणि याच जातीयतेतील वर्णव्यवस्थेमुळे प्रत्येकामध्ये त्या - त्या जातीनुसार कामाचे वाटप केले जात असे.
तो काळचं असा होता जिथे कामगार वर्गाला अपमानास्पद वागणूक मिळायची, कामगारांची पिळवणूक केली जायची. कामगारांना खुप राबवले जायचे. दिवसाचे बारा तेे अठरा तास त्यांना काम करावेे लागत असे. आठवड्ययाचेे सात ही वार, सात ही दिवस न चुकता कामासाठी राबावे लागत असे आणि तरीसुद्धा त्यांंना त्याचा योग्य तो मोबदला मिळत नसे.
अशातच कामगारांचे प्रश्न आपल्या संघटनेमार्फत मांडता यावेत यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केेेला. त्या मजुर पक्षाद्वारे बाबासाहेबांनी कामगार वर्गाच्या हितासाठी नोकरी, बडतर्फी व पगारवाढ यावर सरकारी नियंत्रण असण्याबाबत, तसेच कामाच्या तासाच्या मर्यादा, योग्य वेेेतन, भरपगारी रजा तसेच बोनस, निर्वाह वेतन या संबंधीचे कायदे या पक्षाद्वारे करण्यात आले.
अपघात प्रसंगी कामगारांना सहाय्यभुत विमा योजना, कामगारांसाठी भाड्याच्या घराची व्यवस्था, शिवाय शेेतकर्यांना व कामगारांना सुुुुधारित राहणीमान लाभण्यासाठी त्यांना योग्य उत्पन्न वा कमाई व्हावी यासाठी किमान मिळकतिची तरतुद या पक्षाद्वारे करण्यात आली.
अशाप्रकारे देेशातील कामगारांच्या हितरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आबंडकरांनी विविध योजना राबवल्या.
