ज्ञानरचनावाद...
ज्ञानरचनावाद...


हल्ली प्रत्येक शाळेत ज्ञानरचनावाद चालू आहे.
प्रत्येक शाळेत भिंती रंगवलेल्या आहेत. भिंतीवर पाढे, शब्द, गणिती क्रिया, वाक्ये, नकाशा, सुविचार, चित्रकथा इत्यादी समावेश असतो.
तसेच छोटी फ्लॅशकार्डस करून त्याला लॅमिनेशन केले आहे. हे साहित्य मुलांना हाताळता येते. खराब होत नाही.
नाणी, नोटा, बिया, गोट्या, मणी, निसर्गातील झाडांची पाने, खडे इत्यादींचा वापर करून संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे समजावून दिले जाते.
अक्षरकार्डस, वाक्यकार्डस यांचा वापर करून वाचन लेखन शिकवले जाते. शिक्षक मुक्त हस्ते शैक्षणिक साहित्य निर्मिती करतात. वापर करतात, यामुळे विद्यार्थी लेखन, वाचन, गणिती क्रिया यामधे उत्तम तयार होत आहेत.
इंग्रजीच्या अध्यापनात देखील या फ्लॅशकार्डसचा विविध रितीने वापर केला जातो.
हल्ली नेटवर हवे ते शैक्षणिक साधन पाहता मिळते. मुलांना दाखवता येते. तयार करता येते. त्याचप्रमाणे नवनिर्मिती करून आनंद मिळवता येतो.
प्रकल्प, उपक्रमांची तर रेलचाल असते. त्यामुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळते. नवकल्पना सुचायला लागतात.
ज्ञानरचनावादामधे मुलांच्या कलाकृतीला प्राधान्य आहे. नवनिर्मिती करायला शिक्षक मदत करत आहेत. शाळा सजवल्या जातात. मुले तयार होतात.